ज्ञान म्हणजे काय
(What Is Knowledge)
प्रपंच-परमार्थ दोन्ही एकाच वेळेस सुन्दर रित्या संपन्न करण्यासंबंधी ऋषिसंस्थेने भारतीय समाजास सदैव मार्गदर्शन केले. अखिल विश्वाच्या कल्याणासाठी चिन्तन करत असताना ब्रह्मर्षिंसमोर त्या आदिमाता चण्डिकेने जे ज्ञानभांडार खुले केले, तेच वेदरूपात प्रकटले. परमेश्वराने निर्माण केलेले जे जे काही जसे जसे आहे ते तसेच्या तसे जाणून घेऊन, तसेच त्यामागील परमेश्वरी हेतु जाणून घेऊन त्या माहितीचा पवित्र मार्गाने उपयोग अखिल विश्वाच्या कल्याणासाठी कसा करायचा याची परिपूर्ण जाणीव आणि कृती म्हणजे ज्ञान. ज्ञान म्हणजे काय, याबाबत श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेच्या विवेचनात सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १८ जून २०१५ रोजीच्या प्रवचनात जे सांगितले, ते आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥