अनिरुद्ध ( बापू ) यांचे अकारण कारुण्य ( Unique compassion of Aniruddha Bapu)

Unique compassion of Aniruddha Bapu

हरि ॐ

बापू करितो अमुची सेवा ।

[caption id="attachment_2149" align="alignleft" width="368"]Aniruddha Bapu बापू अनिरुद्ध बापू[/caption]

आद्यपिपादादांच्या अभंगातील या ओवीची खरी अनुभूती मिळते ती कोल्हापूर मेडिकल कॅम्पमध्ये. २६, २७, २८ जानेवारी २०१३ या तीन दिवसात कोल्हापूर मेडिकल कॅम्प संपन्न झाला. खरं तर गेली ८ वर्षे हा कॅम्प होत आहे. परंतु प्रत्येक कॅम्पमध्ये नाविन्य आहेच. लाभार्थींची वाढती संख्या, तिकडच्या लोकांमध्ये होणारे बदल आणि सुधारणा नियोजनपध्दतींमध्ये दरवर्षी होणारी सुधारणा ह्यामूळे या कॅम्पचा प्रगतीचा आलेख सर्व बाजूंनी चढता राहिलेला आहे. दरवर्षी अनेक जण भारतातून आणि भारताबाहेरूनही ह्या कोल्हापूर मेडिकल कॅम्पसाठी येतात.

या कोल्हापूर मेडीकल कॅम्पवरुन आल्यानंतर अगदी प्रत्येकाला कॅम्पबद्दल भरभरुन बोलायच असते. अनेक मंडळींनी आपले अनुभव माझ्याबरोबर शेअर केले. अनुभव विविध प्रकारचे असले तरी प्रत्येक अनुभवाचा गाभा "भक्ती सेवेची कार्यशाळा" या एकमेव सुत्राला धरुन आहे. तिथे गेलेल्या प्रत्येकाला बापूंनी शिकवलेली भक्ती आणि सेवा कशी करावी हे विविध अनुभवातून, त्या भोळ्या भाबड्या श्रद्धावानांकडून शिकण्यास मिळते. आता तर अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे तिकडचे रिअल टाईम अपडेटस आपल्याला घर बसल्या मिळत होते. हे वृत्त पाहण्याचा आनंदही लोकांनी लुटला.

मुंबईहून २६ तारखेला सकाळी निघालेले सेवेकरी रात्री कोल्हापूरला पोहोचले आणि दुसर्‍या दिवशी पहाटे कॅम्पसाईटवर गेले. तिथे पोहोचल्यावर ताई (नंदाई) आणि सुचितदादांनी त्यांचे सहर्ष स्वागत केले. आपल्या आधी आपली नंदाई व सुचितदादा तिथे पोहोचलेले पाहून सर्व सेवेकरींना आर्श्चयही वाटले आणि आनंदही झाला. कॅम्प कधीही असला तरी त्याच्या दोन दिवस आधीच नंदाई व सुचितदादा कोल्हापूरला पोहोचतात. ह्यात कधीही बदल झालेला नाही. दोघेही स्वत: ह्या कॅम्पच्या प्रत्येक बाबतीत लक्ष घालतात. त्यांच्या देखरेखीनुसार व बापूंच्या संकल्पानुसार व मार्गदर्शनानुसार हा कोल्हापूर मेडिकल कॅम्प संपन्न होत असतो.

ह्या कॅम्पमध्ये नंदाई व दादा त्या तिथेल्या गोळ्या भाबड्या श्रध्दावानांनमध्ये प्रेमाने मिळतात. त्या दोघांचेही त्या गावकरी श्रध्दावानांना बरोबरचा संवाद पाहून, त्यांचे इंटरॅक्शनपाहून अगदी कोणाचेही मन भरुन येते. त्यांच्या शुध्द भोळ्या भाबड्या निरागस भावाला कशी ही नंदाई व सुचितदादा भुलतात हे पाहायाला मिळते.

Nandai At Kolhapur Medical Camp

ज्यांनी बापूंना अजूनही ’याची देही याची डोळा’ पाहीलेले देखील नाही पण बापू भेटण्याची त्यांची आस, त्यांची तृष्णा त्यांच्या वागणूकीवरुन, सुधारण्याच्या प्रयत्नावरुन, त्यांनी रचलेल्या अभंगावरुन, त्यांच्या जीवनाबद्दलच्या सकारात्मक दृष्टीकोनावरुन आणि मुख्य म्हणजे त्यांच्या समाधान व आनंदवृत्तीवरुन कळून येते.

ज्यांनी माझ्याबरोबर अनुभव शेअर केले ते ऐकल्यावर मला जाणवले की, इथे सेवेला जाणारा प्रत्येक सेवेकरी खरचं भक्ती सेवेत आपण कुठे आहोत याचे परिक्षण करुन येतो. कोल्हापूर मेडिकल कॅम्पला जाण्यापूर्वी "करितो आम्ही इतुकी सेवा। बापूसाठी धाव धाव॥" या विचारांनी वेढलेला सेवेकरी "करु नका स्ववंचना। बापू करितो अमुची सेवा॥" या अनुभवाने पावन होऊन येतो. आणि तिथे जाणार्‍या प्रत्येकाचे असेच होते.

कोल्हापूर मेडिकल कॅम्प हा तिथल्या सेवेकरी श्रद्धावानासाठी आणि लाभार्थी श्रद्धावानांसाठी महोत्सव असतो. नवीन कपडे, घराची सजावट, दारात सडा-रांगोळी घालणे इत्यादी एखाद्या उत्सवाच्या निमित्ताने करण्यात येणार्‍या गोष्टी ते करतात. महोत्सवाचा रंग त्यांच्यावर चढलेला असतो. अत्यंत नियोजनपूर्व ह्या कॅम्पचे काम सुरु असते खरे मात्र त्या नियोजनाप्रमाणेच निस्वार्थीपणे आणि झोकून देऊन तिथेले स्थानिक सेवेकरी सेवा करतात.

कॅम्पसाईटचा सुमारे दहा एकरचा परिसर शेणाने सारवणे किती मोठे काम. मात्र स्वतः उन्हातान्हात राबून कॅम्पला येणार्‍या प्रत्येकाला काही त्रास होऊ नये म्हणून ही सारवण्याची सेवा झोकून करतात. या कोल्हापूर मेडिकल कॅम्पला येणारा प्रत्येकजण मग तो लाभार्थी असो की सेवेकरी तो सदगुरु अनिरुद्धांचे अकारण कारुण्य अनुभवत असतो.

कोल्हापूर मेडिकल कॅम्पबद्दल लिहावे तितके कमी ठरेल. त्यामुळे काही श्रद्धावान मित्रांनी आपले शेअर केलेले अनुभव मी ब्लॉगवर देत आहे. तसेच कोल्हापूरच्या काही विद्यार्थी आणि लाभार्थींचे मनोगतही देत आहे.

[tabs] [tab title="Kolhapur Medical and Healthcare Camp 2013 – A Life Time Experience of Pramodsinh Karnik"]

Kolhapur Medical and Healthcare Camp 2013 – A Life Time Experience
It was a great honor to be part of the volunteer team.
Everything was exceptional from :
  • Initial Planning
  • Transport Arrangement
  • Accommodation
  • Planning at the Camp Sight – Registration, General OPD, Eye Checking, Specialist OPD, student check-up, distribution of medicines etc.
  • Distribution of items under “ June te Sona “ “Vidya Prakash Yojana’ “Cleaning Material, Quilts etc.
  • “Satsang” in the evening
  • Last but not the least  - the FOOD,  the “Annapurna Prasadam”
During the three day camp, we had an opportunity to interact with volunteers from different centers in Mumbai, to Kolhaur, to Nagpur to Ranchi to Delhi to Muscat. Volunteers were from different age group, different profession. It was a great pleasure to share the experiences with each other.
We heard the way the Kolpaur volunteers put in the efforts to visit the remote villages, without any transport arrangement or even motor-able roads, collect the data (they even trained their spouses to operate the computer, so that the data can be maintained by them as the volunteers themselves were busy with their job and data collection), and finally made the arrangements for distribution. It is not a three day camp for them but an ongoing process.
On 27th – Distribution day, the packets were arranged, – by village - by family, along with other material like Soaps Cleaning powder, Combs, Candles etc. The entire scene was like a big military operation, with each group loading their own truck/tempo and marching to the distribution sight.
The mood at the distribution sight was great, villagers gathered  at the distribution sight, chant songs, of Bapu, their faith on Bapu was visible on their face, at some sights, villagers lovingly  offered snacks/tea/ sarbat etc. to volunteers.
On 28th the camp day, since morning the villagers started thronging the camp, students have lined up for the annual checkup. All the volunteers, after the breakfast went to the respective counter. The camp started after the prayer by Nandai and Suchit dada.
Each villager was treated with respect and guided properly by the volunteers to the respective counter. There was a big queue for the Eye check and Spectacle collection, general OPD, Student check up, as well as Annapurna Prasadam. In spite of such a huge gathering there was no chaos anywhere, everything was well planned.
Towards end of the camp one must ask a question to himself what was my contribution to the camp? Why I am here?
Everybody who comes here is at Bapu’s wish. Bapu wants us to learn how the 13 point program announced by Bapu is practically applied, the “sava” (dedication, discipline and planning) by local volunteers, devotion of the villagers.
According to me what one can do least is make maximum hanks, contribute towards “Vidys Prakash Yojna” (as there is no light in some villages, power goes off during monsoon in many villages) “ June te Sona” and share the experience with other “bhaktas,” who have not been to Kolhapur Medical Camp.
Pramodsinh Karnik  (AMBADNYA)
Borivali (West)

[/tab] [/tabs]