त्रिविक्रम मठ स्थापना – पुणे व वडोदरा

आई जगदंबा व सद्‍गुरु श्रीअनिरुद्धांच्या कृपाशिर्वादाने, श्रावणी सोमवारच्या मंगल दिनी, म्हणजेच दिनांक ३ सप्टेंबर २०१८ रोजी, पुणे व वडोदरा येथे स्थापन होणार्‍या त्रिविक्रम मठासाठी शंख, ताम्हन, पीतांबर, तीर्थपात्र व तसबिरी श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌ येथून देण्यात आल्या. अत्यंत भक्तिमय, प्रसन्न व जल्लोषपूर्ण वातावरणात, संस्थेचे महाधर्मवर्मन डॉ. योगींद्रसिंह व डॉ. विशाखावीरा जोशी यांच्या हस्ते या आध्यात्मिक गोष्टी त्रिविक्रम मठासाठी श्रद्धावानांकडे सुपूर्द करण्यात आल्या. ह्या सोहळ्यादरम्यान पुण्याहून सुमारे ६५ श्रद्धावान व वडोदरा येथून सुमारे ४५ श्रद्धावान श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम् येथे उपस्थित होते.


गुरुवार दिनांक ६ सप्टेंबर २०१८ रोजी पुणे व वडोदरा येथे त्रिविक्रम मठाची स्थापना झाली. 

स्थापनेच्या वेळेस प्रार्थनेत मंगलाचरण, श्रीगुरुक्षेत्रम् मंत्र, श्रीरामरक्षा स्तोत्र, श्रीआदिमाता शुभंकरा स्तवनम्, त्रिविक्रम ध्यानमंत्र व त्रिविक्रम स्तोत्र, त्रिविक्रमाची १८ वचने आणि त्रिविक्रमाचा सार्वभौम मंत्रगजर घेण्यात आला. त्यानंतर उपस्थित श्रद्धावानांनी अनिरुद्ध ’भक्तिभाव चैतन्य’ चा अनुभव घेत विविध गजर करत जल्लोष केला. ह्या सोहळ्याची क्षणचित्रे आपण पुढील व्हिडिओ द्वारे पाहू शकतो. 

आता अनेक ठिकाणी उदा. जळगाव, औरंगाबाद, मिरज-सांगली, अमळनेर व बोरिवली (मुंबई) येथे त्रिविक्रम मठासाठी श्रद्धावानांचे जोरदार प्रयास सुरू झाले आहेत.

त्रिविक्रम मठ स्थापना – पुणे 

त्रिविक्रम मठ स्थापना – वडोदरा 

। हरि ॐ । श्रीराम । अंबज्ञ ।
। नाथसंविध्‌ ।

पत्ता  :

पुणे – क्रमांक 11/2, प्लॉट नं  5, वर्धमान नगरी, कर्वेनगर, पुणे, महाराष्ट्र ४११०५२

वडोदरा – सी-५४, निर्माण पार्क, प्रमुख प्रसाद चोकडी के पास, मांजलपुर, वडोदरा – ३९००११
हिंदी

Related Post

1 Comment


  1. Hari Om,

    Ambadnya Naathsamvidh. I was fortunate to witness the opening ceremony at Pune for the Trivikram Mutt. The atmosphere was really serene and peaceful. Difficult to express in words but I felt that I should leave everything and just sit in the mutt and enjoy the bliss.

    Sanjaysinh Nesarikar

Leave a Reply