त्रिविक्रम आमची प्रार्थना ऐकतोच
(Trivikram Listens To Our Prayers)
एक दिवस शान्तपणे बसा. सारे व्याप बाजूला सारून थोड्या वेळासाठी बसा आणि आठवा की माझ्या जीवनात मी किती चुका केल्या आणि तरीही भगवंताने मला किती चांगल्या गोष्टी दिल्या. न मागतासुद्धा भरपूर मिळालं आणि जे चुकीचं होतं ते मागूनसुद्धा मिळालं नाही. यज्ञयाग, तीर्थयात्रा, जपजाप्य, मोठमोठ्या उपासना न करतासुद्धा त्रिविक्रमाने आणि आदिमाता चण्डिकेने माझी प्रार्थना ऐकलीच याची खात्री यातून पटेल. त्रिविक्रम (Trivikram) आमची प्रार्थना ऐकतोच, याबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १८ जून २०१५ रोजीच्या प्रवचनात जे सांगितले, ते आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥