चण्डिकाकुलाच्या तसबिरीचे आम्ही श्रध्देने व विश्वासाने दर्शन घेत असतो, ही चांगलीच गोष्ट आहे पण जेवढे जमेल तेवढे चण्डिकाकुलास प्रेमाने न्याहाळण्याने काय लाभ मिळतो याबद्द्ल परम पूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक १७ एप्रिल २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे स्पष्ट केले.
Chandikakul
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥
Permalink
हरि ओम. आज बापूंचे २४-०५-२०१२ चे प्रवचन आठवले , तेव्हाही बापूंनी सद्गुरुंच्या तसबिरीला प्रेमाने न्याहाळायचे का हे खूप
सोप्या शब्दांत सांगितले होते की आपण देवाकडे बघताना फक्त ४ च हेतू ठेवून बघतो एकतर नमस्कार करताना बघायचे म्हणून, दुसरे काही चुकले असेल तर माफ कर म्हणून सांगायला, तिसरे रडण्यासाठी आणि आणि चौथे काही मगायला . तेव्हा बापूंनी १९ व्या अध्यायात साईनाथ सांगतात “तू माझ्याकडे पहा, मीही तसाच तुझ्याकडे पाहीन” सगळ्यात सोपी गोष्ट साईनाथांनी सांगितली आहे ह्याची आठवण करून दिली आणि सगुणाची भक्ती करताना “त्याला” केवळ प्रेमाने पाहणे खूप काही देऊन जाते असे सांगितले.
“न करिता सगुणाचे ध्याना भक्तीभाव कदा प्रगटेना
आणि सप्रेम जव भक्ती घडेना कळी उघडेना मनाची ”
आज बापूंनी परत चण्डिकाकुलास प्रेमाने न्याहाळायला सांगितले आणि त्याच प्रेमाने बघण्याने , न्याहाळण्याने काय अचिंत्यदान पदरात पडू शकते ह्याची महती परत पटविली आहे.
माघी गणेश चतुर्थीला बापूंनी नमन करायचे ते कसे खरोखरी हे सांगितले होते की काही मागण्यासाठी म्हणून उभे नाही राहायचे “त्या”च्या दारी तर “त्या” लाच मागायचे, तू किती किती प्रेमळ आहेस, तू माझ्यासाठी किती कष्ट घेतोस, तुझे माझ्यावर किती प्रेम आहे असे प्रेमाचे हितगुज करायचे म्हणून शिकविले.
आपण कायम काम्य भक्तीत अडकतो देवा मला हे हवे , ते हवे, हे दे आणि ते दे. पण “त्या:च देवाशी प्रेमाचा संवाद आपण कधीच साधत नाही, बापू आम्हांला ह्या मार्गाने निष्काम भक्तीच्या वाटेवर कसे पाऊल ठेवायचे हेच जणू काही हाताला धरून गिरवून घेतात.
श्रीसाईसच्चरितात साईनाथ स्वत: सांगतात की माझ्या गुरुने मला हीच एक्मात्र सेवा दिली
“तुझे रूप मी पाहणे दुजे काही न दिसणे” हे सांगणारे आद्यपिपाही रात्री झोपतांना असेच साईनाथांना खूप प्रेमाने न्याहाळायचे आणि म्हणूनच “त्या साई-अनिरुध्दाने ” त्याचीच ग्वाही “अखंड राम लाधाल ” ही काकांच्या अंतिम चरणीं पूर्तता करवून पटविली,
कर्दम ऋषी आणि देवहूतीने आदिमातेचे प्रथम चरण पृथ्वीवर पडताना हेच फक्त प्रेम आणि प्रेम ओतले तिला पाहताना , न्याहाळताना आणि त्याच सर्वश्रेष्ठ प्रेमभावातून जन्मास आला तो “विच्चैकार”
बापूराया तुझी ही शिकवण आचरणात आणून तुला आणि चण्डिकाकुलास असेच फक्त प्रेमाने न्याहाळता येऊ दे हेच मागणे….जेणेकरून मोठ्य़ा आईचे रुप नयनी दाटेल आणि तिचे गुण आठवून प्रेमाचे भरते येइल…
अंबज्ञ !!!
सुनीतावीरा करंडे