वैश्विक वास्तव (The Universal Truth)

`सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या (Shree Aniruddha) ‘तुलसीपत्र’ ह्या अग्रलेखमालिकेत आतापर्यंत बापूंनी (Bapu) अनेक विषयांचे विवेचन केलेले आहे. तुलसीपत्र-९९७ पासून एक वेगळ्याच आणि अद्भुत वाटाव्या अशा विषयाची सुरुवात झाली आहे. तुलसीपत्र-९९६ मध्ये मूषक हा श्रीगणपतीचे वाहन म्हणून अनसूयामातेच्या आश्रमात सिद्ध होतो आणि देवीसिंह असणाऱ्या परमशिव, चण्डिकाकुल वाहने आणि नारदांसह कैलास शिखरावर जातो. त्रिपुरासुराशी होणाऱ्या युद्धाची तयारी म्हणून आदिमाता (Aadimata) महालक्ष्मी (Mahalaxmi) एक अत्यंत विलक्षण असा नकाशा कैलासाच्या भिंतीवर काढते व त्याविषयी परमशिव आणि त्याच्या पुत्रांस समजावून सांगते. त्यावेळी किशोरावस्थेतील श्रीगणपति म्हणतो की ‘ह्या विश्वातील प्रत्येक ज्ञान हे शिव-पार्वती संवादातूनच मानवांसाठी प्रगट होत असतं. पण माता पार्वतीचे प्रश्न व परमशिवाने दिलेली त्यांची उत्तरे यामुळे मानव चण्डिकाकुल सदस्यांना स्वत:च्या पातळीवर आणून ठेवतो व कथांचे चुकीचे अर्थ लावून अधिक अज्ञानात पडतो’ आणि म्हणूनच मानवांच्या अज्ञानाचे निराकरण माता पार्वतीने करावे अशी प्रार्थना करतो व परमशिवही त्यास अनुमोदन देतात. ….आणि तिथूनच माता पार्वती ‘मानवांचे अज्ञान नष्ट करण्याचे’ कार्य सुरू करते. कैलासाच्या शिखरावर सर्व ब्रह्मर्षि, ऋषि व शिवात्मे ह्यांना बोलावून घेतले जाते आणि गणपतिने विचारलेल्या ‘कैलास पर्वताच्या चार विचित्र व विलक्षण बाजूंचे रहस्य काय?’ या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देण्यासाठी माता पार्वती कैलासच्या उत्पत्तीची कथा सांगण्यास सुरुवात करते. त्याच क्षणी तेथे उपस्थित असणाऱ्या ब्रह्मर्षि कश्यपांना जाणीव होते की ‘आता सृष्टीतील एक खूपच विशाल व व्यापक असे सत्य विशद केले जाणार आहे’ व हा इतिहास शब्दबद्ध करून ठेवण्याची अनुज्ञा मागितली जाते. त्यावेळी आदिमाता आपले ‘श्रीविद्या’स्वरूप धारण करून नित्यगुरु याज्ञवल्क्यांना हा इतिहास मन:पटलावर कोरण्याची आज्ञा करते आणि इथूनच सुरुवात होते त्या इतिहासाची….खरं तर वसुंधरा पृथ्वीवर प्रजापती ब्रह्माने मानवी जीवन निर्माण केल्यापासूनच्या इतिहासाची. आतापर्यंत म्हणजे दिनांक २०-११-२०१४ पर्यंत प्रकाशित झालेल्या तुलसीपत्रांतून सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी आपल्यासमोर हा इतिहास उलगडला आहे. हा इतिहास अतिशय विलक्षण, विस्मयचकित करणारा, रोचक आणि उत्कंठावर्धक आहेच, पण त्याचबरोबर आपल्या विचारांना चालना देणारा आहे. ह्या इतिहासाचे वाचक असणाऱ्या श्रद्धावानांची वैचारिक देवाणघेवाण व्हावी म्हणून आज ह्या फोरमची (forum) सुरुवात होत आहे. हा इतिहास समजून घेताना त्यात उलगडत जाणारी कथा, त्यात असणाऱ्या पात्रांच्या परिचयाने अधिक सोपी होते. म्हणूनच आज आपण ह्या फोरमची सुरुवात निंबुरा नामक पृथ्वीचा(earth) सम्राट असणाऱ्या झियोनॉदसच्या वंशाची (फॅमिली-ट्री) ओळख करून घेऊया. फोरमच्या पुढील पोस्टमध्ये सम्राट झियोनॉदस व त्याची सम्राज्ञी बिजॉयमलानाच्या वंशाची (फॅमिली-ट्री) ओळख करून घेऊया. 

Anunaki-Family-Tree-01-For-FORUM