परमपूज्य सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २८ मे २०१५ च्या मराठी प्रवचनात ‘ सुवर्ण आणि चांदी या धातूंचे गुण ’ (The Properties of Gold & Silver) याबाबत सांगितले.
चांदी आणि सुवर्ण यांचे अतूट नाते आहे. मानवाच्या शरीरात उचित बदल होण्यासाठीची ताकद सुवर्णामुळे मिळते. हे बदल घडवण्यासाठी जी ताकद शरीराला आवश्यक असते ती जर नसेल, तर तात्पुरती का होईना, पण ती ताकद पुरविण्याचे काम रौप्य म्हणजेच चांदी करत असते. त्यामुळे सुवर्ण आणि चांदी यांस सूर्य (Sun) आणि चंद्र (Moon) मानले जाते. ब्रह्मवादिनी माता लोपामुद्रा ही आपल्याला सांगते की या जगदंबेने सुवर्णाबरोबर चांदीचेही दागिने घातले आहेत, याचा अर्थ ह्या आईकडे, तिला काहीही करायला न लागता सुवर्ण आणि चांदीचे गुणधर्म आमच्या शरीरात देण्याची क्षमता आहे, याबाबत आपल्या बापूंनी सांगितले ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥