श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ – भाग ९
(The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam-Part 9)
जातवेद अग्निला हिरण्यवर्णा श्रीमातेला घेऊन येण्याचे आवाहन केले आहे. श्रीमाता सुवर्णाची कांती असणारी आहे. व्यक्तीच्या दिसण्यातून, वागण्यातून जे तेज प्रकट होते, त्याला कांती असे म्हणतात. जिच्या केवळ उपस्थितीतून तेज प्रकटते अशा श्रीमातेला हिरण्यवर्णा म्हटले आहे. श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेच्या अर्थाबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १६ एप्रिल २०१५ रोजीच्या प्रवचनात जे सांगितले, ते आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥