श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ – भाग ७
(The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam-Part 7)
एक विश्वास असावा पुरता। कर्ता हर्ता गुरु ऐसा॥ ही ओवी आम्ही श्रीसाईसच्चरितात वाचतो. जातवेदावर पूर्ण विश्वास असणे हेच श्रद्धावान बनणे आहे. शून्यानां शून्यसाक्षिणी असणार्या आदिमातेस म्हणजेच ‘श्री’स घेऊन हे जातवेदा, माझ्या जीवनात ये, हे अत्यंत विश्वासाने जातवेदास सांगितले आहे. आदिमातेचा वर्ण सुवर्णवर्ण आहे असे श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेत म्हटले आहे. सुवर्णाचे महत्त्व काय आहे हे सांगताना आयुर्वेद म्हणतो की सुवर्ण हे सर्व प्रकारच्या विषांचा नाश करणारे औषध आहे. श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेच्या अर्थाबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १६ एप्रिल २०१५ रोजीच्या प्रवचनात जे सांगितले, ते आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥