ब्राह्ममुहूर्ताचे महत्त्व – भाग २
रोज ब्राह्ममुहूर्तावर उठून उपासना करणे ज्यांना शक्य आहे त्यांनी अवश्य करावे, पण आजच्या धकाधकीच्या काळात सर्वांनाच हे करणे सहज शक्य होणार नाही, तरीही महिन्यातून एकदा तरी ब्राह्ममुहूर्तावर उठून उपासना करणे हे अचिन्त्य लाभ देणारे आहे. ब्राह्ममुहूर्ताच्या वेळी आत्माराम साक्षीरूपात न राहता चेतन स्वरूपात आमच्या सत्प्रवृत्तीला प्रेरणा देतो, हे लक्षात घेऊन ही संधी साधली पाहिजे. ब्राह्ममुहूर्ताच्या महत्त्वाबद्दल परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ३१ मार्च २००५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥