गुह्यसूक्तम् आणि हीलिंग
(The Guhyasuktam And The Healing)
श्रीश्वासम् उत्सवाचा आनन्द मी स्वत: घेतला आणि तुम्हालाही तो आनन्द घेताना मी पहात होतो. सर्वांचाच या उत्सवात भावपूर्ण सहभाग होता. श्रीश्वासम् गुह्यसूक्तम् ऐकताना प्रत्येक जण तल्लीन होत होता. हे गुह्यसूक्तम् तुम्ही जेवढ्या प्रेमाने शान्तपणे बसून ऐकाल, तेव्हा त्याचा सर्वाधिक उपयोग होईल. ‘गुह्यसूक्तम्’चा अधिकाधिक लाभ आणि त्याद्वारे होणारे हीलिंग यासंबंधी मार्गदर्शन सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २१ मे २०१५ रोजीच्या प्रवचनात जे सांगितले, ते आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥