आनंदाचा उत्सव.. आत्मबल महोत्सव(The festival of Happiness Aatmabal Mahotsav)

ll हरि ॐ ll

आत्मबल महोत्सव
आत्मबल महोत्सवाच्या सरावादरम्यान नंदाई सर्व सख्यांबरोबर
 
 
रोबर एक वर्षापूर्वी ५ व ६ नोव्हेंबर २०११ या दोन दिवशी श्रीहरिगुरूग्राम येथे दिवाळीचा जल्लोष साजरा होत होता. हा जल्लोष होता उत्सवाच्या आनंदाचा आणि आनंदाच्या उत्सवाचा… म्हणजेच २ दिवस चालणार्‍या आत्मबल महोत्सवाचा. ह्या महोत्सवाची संपुर्ण संकल्पना होती नंदाईची आणि त्याच बरोबर होते तीचे अविरत श्रम आणि तीच्या टीमची अतोनात मेहनत.  

स्त्रियांचे आत्मबल विकास केंद्र हा उपक्रम बापू आणि नंदाई ह्यांच्या मार्गदर्शनाखाली १९९८ साली सुरू करण्यात आला. अतिशय आगळ्या वेगळ्या अशा ह्या उपक्रमात सामील होण्यासाठी स्त्रियांच्या रांगा लागल्या . पण आपल्याला प्रश्‍न पडेल की हा उपक्रम  बापू  आणि नंदाई ह्यांनी का सुरू केला असेल?

नक्कीच हा उपक्रम कोणत्याही प्रकारची स्त्रियांची चळवळ उभी करण्याच्या ध्येयाने सुरू झाला नाही. तर कुठल्याही प्रसंगाला धैर्याने आणि आत्मविश्वासाने समोरी जाणारी सक्षम, स्वावलंबी कुटूंब वत्सल अशी खंबीर स्त्री घडविणे हा ह्या मागचा हेतू होता व आहे.

“पावित्र्य हेच प्रमाण” ह्या बापूंच्या मूळ सिद्धांतावरच आत्मबलचा हा वृक्ष आज दिमाखात उभा आहे. पहिला आत्मबलचा वर्ग सुरू झाला तो अवघ्या २८ स्त्रियांच्या सहभागाने, पण नंदाईने रूजवलेल्या ह्या छोट्याशा बीजाचे रूपांतर तिच्या प्रेमाने, कारूण्याने आणि अपार श्रमाने सुंदर रोपट्यात झाले व बघता बघता, त्याचा वृक्ष आज १३ वर्षानंतर १३०० स्त्रियांना बरोबर घेऊन गगनाला भिडायला निघाला आहे. लवकरच हा वृक्ष अधिकाधिक फोफावत जाऊन त्याचा वट वृक्ष होईल ह्यात शंका नाही. आता केवळ मुंबईतच नाही तर पुण्यातदेखील आत्मबलचा उपक्रम सुरू झाला आहे.

आत्मबल विकास वर्गात सहभागी झालेल्या प्रत्येक स्त्रीला विकासाची दिशा मिळते ती नंदाईच्या बोलांमधूनच. नंदाई प्रत्येक स्त्रीशी, तिच्या प्रत्येक लेकीशी हितगुज करते. जणू तीच्या मनातले ओळखून तिला आत्मविश्‍वास देते. घराचा उंबरठाही कधीही न ओलांडलेली स्त्री असो वा कॉर्पोरेट सेक्टरमधील मोठ्या हुद्यावरील एखादी स्त्री असो, प्रत्येकीची जडण-घडण वेगळी. म्हणूनच प्रत्येक लेकीच्या विकासासाठी नंदाईची शिदोरीही वेगळीच असते.

येथे शिकविले जाणारे क्राफ्ट, व्यक्तिमत्त्व विकास, इंग्लिश आणि त्याच बरोबर केले जाणारे विविध विषयातील प्रोजेक्ट्स आणि इतर भरपूर काही हेच प्रत्येक स्त्रीला भौतिक आणि त्याचबरोबर पारमार्थिक प्रगती पथावर नेणारे असते.

आत्मबलमध्ये शिकविलेल्या इंग्लिशमुळे काही स्त्रिया परदेशातही आत्मविश्‍वासाने इंग्लिश बोलू शकल्या. तसेच अनेक स्त्रियांनी आपले अनुभव, आत्मबल महोत्सवातील, आत्मबल ते आत्मबदल, ह्या सदरामध्ये व्यक्त केले आहेत, ज्यामुळे त्यांच्या जिवनात आत्मबलमधील आईच्या बोलांमुळे अमूलाग्र फरक पडून जीवनाला नवीन दिशाच मिळाली.इथे शिकविलेल्या क्राफ्टवर अजून परिश्रम घेऊन काही स्त्रियांनी आपला व्यवसाय सुरू केला व त्या त्यांच्या व्यवसायात यशस्वीही झाल्या. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करणारी स्त्री कुटुंबवत्सल असूनही वेळेअभावी घराकडे लक्ष देऊ शकत नसे. परंतु, आत्मबलमध्ये शिकवलेल्या टाईम मॅनेजमेंटमुळे ती स्त्री आज तिचे घर व करियर अशा दोन्ही आघाड्या समर्थपणे सांभाळू शकते. अशी एक ना अनेक भरपूर उदाहरणे सापडतील.
 
अशा सर्व स्त्रियांना भेटण्याची नंदाईची आस, तिची ती ओढ…
“कशा असतील माझ्या लेकी?”
“कुठे असतील त्या आज?”

ह्या भावनेने नंदार्ईचे व्याकूळ झालेले मन आणि “आई, तू आम्हाला कधी भेटणार?”, “पुन्हा कधी भेटणार?” अशी लेकींकडून सातत्याने घातली गेलेली साद ह्यातून साकार झालेल स्वप्‍न म्हणजेच उत्सवाचा आनंद आणि आनंदाचा उत्सव…

आत्मबल महोत्सव!


आणि अशा पद्धतीने आत्मबल महोत्सवाचा घाट घातला. सर्वच्या सर्व आत्मबल बॅचच्या स्त्रियांना बोलावणं धाडलं गेलं. एवढ्या स्त्रिया एकत्र येणं… हीच खूप कठीण आणि अशक्यप्राय गोष्ट आहे असे अनेकांना वाटत होते, पण आईसाठी तीच्या लेकी आणि लेकींसाठी त्यांची आई बस्स!!! आई बरोबर पुन्हा एकदा यायला मिळणार ह्या एका गोष्टीने…. स्त्रिया पुन्हा एकत्र आल्या, आणि त्यांनी ४-५ महिने फक्त निख्खळ आनंद आणि तोही अतिशय सहज सोप्या मार्गाने उपभोगला नंदाईच्या सानिध्यात.

संपूर्ण आत्मबल महोत्सवाची रायटर, डायरेक्टर, कोरिओग्राफर फक्त नंदाईच होती. विविध नाटकं, डान्सेस्‌, चुटकुले ह्यांनी कार्यक्रम सजला होता. कार्यक्रमाची संपूर्ण तयारी आईच्याच मार्गदर्शनाखाली होत होती.

एक स्त्री जेव्हा आनंदी आणि समाधानी होते तेव्हा ती हेच आनंद आणि समाधान तिच्या कुटुंबाला द्विगुणित करून देते आणि ह्याचाच प्रत्यय आला तो प्रत्येकीला तिच्या परिवाराकडून मिळणार्‍या उदंड प्रतिसादाने.

आणि मग बघता बघता आत्मबल महोत्सव येऊन ठेपला. महोत्सवाचा पहिला दिवस ५ नोव्हेंबर २०११. दोन दिवस उत्साहात सहभागी झालेली प्रत्येक स्त्री स्टेजवर येऊन आपली भूमिका सादर करत होती. अगदी सहजपणे, एखाद्या सराईतालाही लाजवेल अशा पद्धतीने आणि त्यांना पावती मिळत होती ती बापू, नंदाई, सुचितदादा ह्यांच्या कौतुकभरल्या नजरेतून आणि प्रेक्षक कुटुंबींयांच्या टाळ्यांच्या कडकडाटातून.

पाच महिने नंदाईची चाललेली अविरत मेहनत आज प्रत्यक्षात येत होती, जणू नंदाई तिच्या लेकींना सांगत होती…

या बाळांनो या रे या !
लवकर भरभर सारे या
मजा करा रे मजा करा

आज दिवस तुमचा समजा!


ह्या शाळेत शिकलेल्या कवितेच्या ओळी माझ्या मनात रेंगाळत राहिल्या.

Aatmabal_Mahotsav_with_Bapu_And_Aai


आज खरच वाटत नाही की हा महोत्सव संपून एक वर्ष पूर्ण झाले. ह्या आठवणी प्रत्येकाला कायम जपता याव्या म्हणून त्याच्या डी.व्ही डी. ही काढल्या गेल्या. आज ही डी.व्ही डी. त्या प्रत्येक स्त्रीच्या जीवनातला अनमोल ठेवा बनली आहे. माझी खात्री आहे असा हा भव्य व तेवढाच दिव्य कार्यक्रम क्वचितच कुठे झाला असेल. बापू व नंदाईच्या ह्याच आत्मबलमुळे सर्व सामन्य आयुष्य जगणारी स्त्री ही आज ताठ मानेने एखाद्या राजहंसाप्रमाणे आकाशात भरारी घेती झाली आहे. 


ll हरि ॐ ll

Related Post

7 Comments


 1. Dearest Dada …

  You have really put up so much affectionate article. Shriram to you.
  Yes, without Nandai,Bapu and Suchitda's efforts the “veera”s wouldnt have become strong and self-confident.
  I had been to the Atmabal Mahotsav last year, and got to see the Veeras speaking their experiences. It really got tears in my eyes, that the ladies face so much challenges in daily life and have to bow down many opportunities coming their way, for their family. So much they have to do/ are doing just for the love & affection towards their loved ones.
  And Nandai is doing just the same, for her daughters. Her invlovement means a lot, really.

  This transformation is really – Ek Stree Samarth tar ticha akkha ghar Samarth …

  This is awesome .. this is ” The Magic “.

  Many words & praises .. but all fall short for our Beloved Bapu Nandai and Suchit Mama.

  Shriram Dada .. Shriram. :-)


 2. हरि ॐ पूज्य दादा,
  आत्मबल….. आत्मबल….. आत्मबल…. आणि फक्त आईचे आत्मबल….. बस हेच आम्हा सर्व श्रद्धावान स्त्रीयांच्या आयुष्याला एक खूप चांगले वळण देऊन जाते….. खरचं आत्मबलचे ते दिवस आठवले की मन एकदम शहारऊनच जाते….. आणि आत्मबलाचे अनुभव सांगायचे म्हटले तर मग दिवस सुद्धा कमी पडेल…. आत्मबलचे दिवस ते आजही खास काही आठवायची गरजही लागत नाही नुसता उल्लेखाने ही अख्ख्ये आत्मबल आणि त्यासंलग्न सर्वच्या सर्व त्या ६ महीन्यात घडलेल्या सर्व गोष्टी, प्रसंग जसेच्या तसे ऊभे राहतात…. खरचं मी खूप भाग्यवान समझते कारण माझे आत्मबल झाले आहे,,,,,,
  मी आत्मबल केले त्यावेळचे फोटो किंवा व्हिडीओ काहीच मिळाले नाहीत. व्हिडीओ तर त्यावेळी नव्हते आणि फोटो काही कारणामुळे गेले….. त्यामुळे मनाला खूप रूखरूख वाटत होती…… आताच्या आत्मबलचे किती छान फोटो वैगरे सर्व आहेत…. अर्थात हळूहळू सर्व बदल होत जातात…..
  माझी आत्मबलची एक सखी आहे ती जेव्हा जेव्हा भेटेल तेव्हा म्हणायची आपले परत आत्मबल झाले पाहिजे….. मी तिला म्हणायची अग कसे शक्य आहे एकदाच नंबर लागायल कीती कठिण आहे आणि तू तर म्हणतेस की परत आत्मबल करायचे….. अग नवीन स्त्रीयांनासुद्धा संधी मिळू दे की….. अर्थात मी असे म्हटले तरी मनात मलाही खूप इच्छा होतीच…
  आईसच आमची काळजी….
  आईने जेव्हा सांगितले की आपण सर्व बॅच मिळून परत कार्यक्रम करणार्‍याचा विचार आहे…. त्या दिवशी रात्री घरी गेल्यावर आईच्या फोटो समोर खूप खूप रडले खरचं आई ती आईच…..श्रीराम आई……
  पूर्वी एवढी आता तब्येत चांगली नव्हती…. पण आपापल्या कुवतीप्रमाणे तिने सर्व करून घेतले आणि सर्व बॅच मिळून १३०० सख्यांसाठी उत्सवाचा आनंद आणि आनंदाचा उत्सव… 'आत्मबल महोत्सव’ घडवून आणला….. आणि हे फक्त आईच करू शकते….. एकटी तिनेच आम्हा सर्व सख्यांकडून करून घेतला….. प्रत्येकीला आलेल्या अड्चणींवर ती स्वत: मदत करीत होती…. त्यामुळे हे सर्व शक्य झाले……
  ते ४-५ महीने आम्हा सर्व सख्यांना अक्षरश: स्वप्नात असल्यासारखे होते…… तो आईचा सहवास आणि ती आई आई आणि फक्त आईच……
  आम्हा सर्व सख्यांबद्दल बाबांना सांगताना ती किती उत्साहात होती….. आणि बाबांनीही त्यांच्या सर्व सख्यांचे खूप कौतूक केले…. आणि त्यांच्या सर्व लेकी भारावूनच गेल्या…..
  उत्सवाचा आनंद आणि आनंदाचा उत्सव… 'आत्मबल महोत्सव’च्या सीडीही काढल्या त्यामुळे पुढचे अनेक वर्षे सर्वांना त्या बघता येतील आणि त्यावेळच्या विश्वात परत जाता येईल…
  बापू आणि आई दोघांनी मिळून आमच्यासारख्या सामान्य बदकाचे रुपांतर राजहंसात करून….. त्या राजहंसाला ऊंच भरारी घेण्यासाठी सोडले….. खूप खूप श्रीराम बापू, आई आणि दादा……
  ही पोस्ट टाकून तुम्ही आम्हाला परत उत्सवाचा आनंद आणि आनंदाचा उत्सव… 'आत्मबल महोत्सववाच्या’ आठवणींना उजाळा दिलात त्याबद्द्ल श्रीराम……


 3. हरी ओम दादा

  उत्सवाच्या आनंदाचा आणि आनंदाच्या उत्सवाचा…खरच खूप मजा आली , सगळे दिवस आठवतात, आई ने आमच्या सुखासाठी केलेले अविरत परिश्रम आठवले, प्रत्येक लेकीसाठी ती परिश्रम घेत असते. Love U आई उत्सवात सहभागी करून घेतलास व आम्हाला अविरत आनंद दिलास व आनंद वाटायला सांगितलास. श्रीराम श्रीराम


 4. Hari Om Dada

  Shree Ram to Aai for giving us a wonderfull treat in the form of Aatmabal Mahostav and we enjoyed to fullest extent then and still memories are with us in the form of DVDs…

  Just few days back listened a experience of Rajivsinh Kadam on our you tube channel where he mentioned the changes he experienced in his wife after attending the Aatmabal Mahotsav…..and definitely others experience also not different than that…..
  AAI has given a confidence to all house wives that they can also do small small things confidently like banking, travelling, english speaking etc…and there is nothing to fear about it. And as you said many of them are now doing it very well..

  HATTS of to our beloved AAI!!!..

  Shree Ram


 5. Hari om Dada

  Truely Aai has transformed lives of many families and the society near around them.

  The love showered by Nandai on her daughters and the confidence built in them not only helped them but also their family members , as a woman makes or breaks the family,… and Nandai's teaching has only helped to bond the families together.

  Salute to our beloved Naandai and Project Atmabal.


 6. हरि ओम. बरोबर एका वर्षापूर्वी म्हणजे ५ आणि ६ नोव्हेंबरला आमच्या लाडक्या नंदाईच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत आगळा वेगळा , कदाचित अखिल समस्त मानव जातीतील हा एकमेवा अदभुत असा अनोखा आत्मबलाचा महोत्सव केवळ आमच्या प्राणप्रिय आईमुळेच शक्य झाला. अर्थातच आई म्हणजे साक्षात परमात्म्याची आल्हादिनी, आदिमातेची कन्या !!! परंतु मानवी अवतारात सगुण साकार झालेली परमेश्वरी असुनही ,तिने अर्थातच मानवी मर्यादांचे पुरेपुर पालन करायचे कसे हेच आम्हांला शिकविले ते अथक परिश्रम घेउनच ! आमची सर्वांची आई किती किती आम्हां सर्वांसाठी राबत होती ते प्रत्यक्ष अनुभवले होते अगदी प्रत्येक पावलावर, प्रत्येक क्षणाला. सतत चोहों बाजुंनी आईने सतत , अविरत प्रेम पान्हा पाजला आणि जणु काही हेच तत्त्व ठ्सविले तिच्या प्रत्येक लेकीच्या मनावर –
  बांध माझ्या मना घट्ट तुझ्या (अनिरुद्धा) पदा , सर्व ये त्यागता ना तुला, ना तुला !!!
  बापूंच्या स्वस्तिक्षेम तपश्चर्येबरोबर आमच्या आईची ही अत्यंत खडतर अशी जणु सहोपासनाच होती, जणु तिने तिच्या १३०० लेकींना साक्षात त्या आदिमातेच्या, चण्डिकाकुलाच्या चरणी अर्पणच केले होते !!!
  स्त्रियांना – दोन स्त्रिया कधी एकत्र गोडी-गुलाबीने नांदुच शकत नाही हा मिळालेला शापच खोटा ठरविण्याचा आमच्या नंदाईने चंग बांधला आणि तो सत्यात उतरवुनही घेतला आपल्या लेकींकडुन …
  आज आमच्या लाडक्या बापू,नंदाई आणी सुचितदाऊंच्या ह्याच आत्मबलमुळे सर्व सामान्य आयुष्य जगणार्‍या आमच्यासारख्या स्त्रिया ह्या आज ताठ मानेने एखाद्या राजहंसाप्रमाणे आकाशात भरारी घेत्या झाल्या आहेत.
  दादा, तुम्ही आज ब्लोगवर हे सारे शब्दांकित करुन नव्याने पुन्हा त्या मधुर स्मृतींचा सुगंध मनोपटलावर दरवळविण्यास सह्ज सुलभ वाटच दाविली. आदिमातेने आम्हांला ह्या परमात्मत्रयीच्या पदरात घालुन आणि समीरदादांसारख्या भक्ती-सेवेचा प्रेमळ आचार्याच्या हाती सोपवुन अनंत जन्मांचे ऋणी केले आहे…. आता फक्त उंच आकाशात हे राजहंस भरारी घेतील ते रामराज्याचे २०२५ चे बापू, आई, दादांचे स्वप्न साकारण्यासाठीच …. उडु रे लावुनी पंखु माझिया सावळ्या भेटु !!!!ह्या दुर्दम्य आकांक्षेने प्रेरित होउन आणि आईने दिलेल्या आत्मबळाच्या जोरावर, आईला हा शब्द देत की सर्व जगी आम्हां बापूंचा आधार , नाही मोडणार संकटात , मग ती तिसर्‍या महायुध्दाची डाकिण का असो …कारण एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता बापू ऐसा …. हे विजयाचे गमक देण्या ,भक्ती धेनुचे दोहन परिपूर्ण करण्या आमचे सुचितदाऊ आणि समीरदादा आहेतच आमच्याच सवे, आम्हांला आद्यपिपांच्या ढोरवाटेवरुन चालवित , देवयान पंथावर नेण्यास तत्पर…

  श्रीराम….


 7. Sarvapratham khup khup shriram dada. Tya anmol athvanina ujala detana dolyachya kada kadhi panavlya kallach nahi. Aatmabal Mahotsav ha ek shabdateet anubhav hota. Ani aaichi maya itkya luvkar malahi anubhavayla milel asa swapnatahi vatla navhta. pan to anand utsav baghtana khup khup manapasna Aaila ghatleli saad tine aikli..”Aai malapan ghe na ga tujhyajaval”.. Ani tine kharach aikla ani Aatmabal 2012-13 madhe select kela.. Hach ayushyatla saglyat motha theva. Ani mhanun kadachit tumhi lihilela pratyek shabda aaj mihi mazya sakhyansobat jagu shakle. Tichi maya..tichi odh anubhavu shakle. Punha ekda khup khup shriram dada. Love you AAI..

Leave a Reply