परम पूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक २७ मार्च २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे श्री साईसच्चरितात नानासाहेब चांदोरकरांच्या मुलीच्या प्रसुतीच्या वेळेस साईनाथांनी अदभुतलीला करुन उदी पाठवली. याची कथा आपण वाचतो, त्या कथेच्या आधारे बापूंनी सद्गुरुतत्त्वाचे अदभुतसामर्थ आणि भक्ताचा पूर्ण विश्वास याबद्द्ल सविस्तर सांगितले. काळ, दिशा आणि अंतर या त्रिमितीला वाकवून भक्तासाठी अदभुतलीला करण्यास सदगुरुतत्व समर्थ आहेच. फक्त गरज असते ती भक्ताच्या विश्वासाची ही गोष्ट बापूंनी स्पष्ट केली. जी आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकतो.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥