संस्कृती मूल्यांवर अवलंबून असते (The Culture Depends On Values) – Aniruddha Bapu Marathi Discourse 19 Feb 2015

संस्कृती मूल्यांवर अवलंबून असते
( The Culture Depends On Values )
परदेशात गेलेल्या व्यक्तींनी आपल्या मातृभूमीशी म्हणजेच भारताशी जुळलेली आपली नाळ तुटू देता कामा नये. कुठेही राहिलो तरी आपली भारतीय संस्कृती (Culture) अवश्य जपा. संस्कृती (Culture) ही बाह्य वेश, खाद्यपदार्थ वगैरे गोष्टींवर अवलंबून नसून संस्कारांवर अवलंबून असते. संस्कृती म्हणजे मूल्यांचे पालन करणे आहे, याबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १९ फेब्रुवारी २०१५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥

Related Post

2 Comments


  1. This is so true bapu, our culture cannot be defined by our clothes but can only be defined by the values instilled in us, whichever part of the world we may be living in


  2. ‎समीरदादा‬
    नुकताच यूटयूबवर अपलोड केलेला बापूंच्या प्रवचनाचा व्हिडिओ पाहिला. बापूंनी त्यात भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय नागरिकांस स्पष्टपणे आपल्या संस्कृतीचा आदर आणि मूल्य जपणे आवश्यक आहेच हे सांगितले. आज खरंतर ज्याला त्याला भारताबाहेर विशेषतः अमेरिका आणि यूरोप मध्ये जाण्याचे आकर्षण असते. पैसा मिळवण्यासाठी ज्यांना जायचे त्यांनी जरूर जावे असे बापूंनी म्हटले आहे. परंतु हे करताना आपला देश, आपली संस्कृती, आपली मूल्य ही जपली गेलीच पाहिजे हे स्पष्ट आणि परखड़ मत बापूंनी मांडले आहे. अमेरिकेचे भुत ज्यांच्या डोक्यात आहे त्यांच्यासाठी बापू असेही म्हणतात की तुम्ही कितीही वर्ष अगदी तिकडे राहिलात तरी तुम्हाला तो देश अमेरिकेचा मूळ / प्राथमिक नागरिक म्हणून स्विकारत नाही. तसेच वर्षानुवर्ष परदेशी राहुनही भारतीय संस्कृतीचा विसर न पडलेल्या काही कुटुंबांचा देखील उल्लेख करण्यास बापू विसरले नाहीत.
    आज आमच्यातील बापूंचे अनेक ‪#‎श्रद्धावान‬ भारताबाहेर स्थायिक झालेले आहेत. खरोखर मला हे येथे नमूद करण्यास अतिशय अभिमानास्पद वाटते की आमचे हे परदेशातील श्रद्धावान मित्र बापूंनी सांगितल्याप्रमाणे खरोखर आपली भारतीय संस्कृती जपून अभिमानाने जगत आहेत.
    सौदी अरेबिया सारख्या कट्टर धर्मीय देशातसुद्धा जेव्हा आमच्या बापूंचे श्रद्धावान मित्र जेव्हा रेस्टॉरेन्टमधे गेल्यावर गाईचे मांस नाकारुन मागविलेले जेवण समोर आल्यावर हात जोडून ‘वदनी कवळ घेता…’ म्हणतात तेव्हा त्यांनी जपलेली महान भारतीय संस्कृती आम्हा प्रत्येकाची कॉलर अभिमानाने कड़क करते!
    हयाच आमच्या बापूंच्या श्रद्धावान स्त्रिया जेव्हा ‘‪#‎Baphomet‬ ‘ चे राज्य जोरात पसरलेल्या अमेरिकेत ‘ श्रीमंगलचंडिकाप्रपत्ति’ पूजन करतात तेव्हा आमच्याच ह्या भारतीय महिला जगातील सर्वात सुंदर आणि पराक्रमी ‘ भारतीय नारी’ असतात…
    मला अभिमान आहे आमच्या देशभक्त ‘बापूंचा’
    मला अभिमान आहे आम्हाला देशभक्त बनविणारया आमच्या ‘ अनिरुद्धसिंहचा’
    मला अभिमान आहे आमच्या ‘भारतीयत्वाचा’
    मला अभिमान आहे आमच्या भारतीय ‘संस्कृतिचा’
    मला अभिमान आहे आमची भारतीय संस्कृती परदेशातही जपणाऱ्या बापूंच्या प्रत्येक ‘श्रद्धावानाचा’

    ।।जय जगदंब जय दुर्गे।।
    ।। हरि ॐ।।
    ।। श्रीराम ।।
    ।। अंबज्ञ ।।

Leave a Reply