॥ हरि ॐ ॥
आज१५डिसेंबर. प्रत्यक्ष चालू होऊन आज सात वर्षझाली. आपल्या परंपरेनुसार दरवर्षीप्रमाणे ह्या ही वर्षी श्रीदत्तजयंतीला“दैनिक प्रत्यक्षचा” वर्धापनदिन विशेषांक, दिनांक २७ व २८ डिसेंबर २०१२ला प्रकाशित होणार आहे. ’प्रत्यक्ष’ त्याच्या स्थापनेपासून आता ७वे वर्ष पूर्ण करत आहे व हा प्रवास अत्यंत अभिनव व असामान्य ठरला आहे व पुढे देखील तो तसाच ठरेल ह्याचा मला विश्वास आहे. प्रत्यक्ष हे फक्त वर्तमानपत्र नसून ते एक “खबरदार पत्र” आहे जे प्रत्येक श्रध्दावानाला सावध ठेवते; येणार्या पुढील काळासाठी. आणि म्हणूनच मला विश्वास आहे प्रत्यक्ष प्रत्येक श्रद्धावानाला मार्गदर्शक ठरेल. बापूंना त्यांच्या श्रध्दावान मित्रांना जे काही सांगायचे आहे ते सर्व प्रत्यक्षमधूनच त्यांच्या श्रध्दावान मित्रांपर्यंत पोहचत राहील आणि म्हणूनच येणार्या काळात ’प्रत्यक्ष’ प्रत्येक श्रध्दावानाला आधार देण्याचे काम करेल.
२००१ ते २०१२ ह्या कालखंडात जगाच्या व जीवनाच्या जवळपास प्रत्येक क्षेत्रात झालेल्या क्रांतिकारी बदलांचे आपण साक्षिदार तर आहोतच पण भागीदार देखील आहोत. सारं काही बदलत चाललं आहे, पण बदलाचा झपाटा पहाता पाहता आपलं आयुष्य व्यापून टाकत आहे. बापूंनी आम्हाला ह्या बदलाबद्दल वेळोवेळी सांगितले देखील आहे व सावध ही केले आहे. हे बदल सुरु झाल्या पासूनच म्हणजे पार २००१ पासून बापू त्याबद्दल बोलत आले आहेत. आणि म्हणूनच ह्या सर्व परिस्थिचं एकंदर अंदाज व भान आपल्याला करुन देणारा हा विशेषांक आहे ज्याचा विषय आहे…. “आरंभ नव्या सहस्त्रकाचा”. वाट पाहूया श्री दत्तजयंतीची, प्रत्यक्षच्या वर्धापनदिन विशषेशांकाची.
॥ हरि ॐ ॥
Permalink
shree ram…
Permalink
प्रत्यक्षला अनिरुद्ध शुभेच्छा..!!!! hariom
Permalink
Shree Ram Dada,
Eagerly waiting to read that :)
Permalink
लाडक्या प्रत्यक्षला पुढील वाटचालीसाठी अनिरुद्ध शुभेच्छा..!!!!
Permalink
लाडक्या प्रत्यक्षला पुढील वाटचालीसाठी अनिरुद्ध शुभेच्छा..!!!!