आद्यपिपांचे सद्गुरु साईनाथ ( Adyapipa’s Sadguru Sainath )
बापू (अनिरुद्धसिंह), सूचितदादा व मी, काकांच्या समाधीस्थानमला नमस्कार करताना आज श्रीकृष्ण जयंती; श्रावणातील कालाष्टमी म्हणजेच गोकुळ अष्टमी. आज सर्व बापू (अनिरुद्धसिंह) कुटुंबीयांकरिता हा एक विशेष दिवस. आजच्याच दिवशी आद्यपिपांचे म्हणजे “काकांचे” निर्वाण झाले; मी, दादा त्यांना “काका” म्हणूनच हाक मारत असू.काकांची एक गोष्ट मी लहान असताना नेहमीच आश्चर्यकारक वाटायची. रोज झोपताना ते साईनाथांच्या फोटोकडे बघत झोपायचे आणि दिवा बंद करायला सांगायचे. हे दिवा बंद करायचं काम ब-याचदा माझ्याकडे असायचं. मी