न्हाऊ तुझिया प्रेमे….(Nahu Tuzhiya Preme)
२७ एप्रिल २०१३ चा शनिवार सांगलीकरांसाठी एक पर्वणी होती. सायंकाळच्या सुमारास परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे सांगलीत आगमन झाले आणि सुरू झाला एक आनंदसोहळा, एक जल्लोष. प्रत्येक श्रद्धावानाचे मन आनंदाने एखाद्या मोरासारखे थुईथुई नाचत होते आणि हा आनंद उत्तरोत्तर वाढतच जाणार होता. २८ एप्रिलला बापू श्रद्धावानांशी त्यांच्या प्रवचनातून संवाद साधणार होते आणि २८ एप्रिलचा रविवार उजाडला. खरं तर परमपूज्य बापूंच्या आगमनानंतर प्रत्येकाला इच्छा होती बापूंचे दर्शन घ्यायची, बापूंचे बोलणे ऐकण्याची