विजयादशमी (दसर्याच्या) दिवशी करावयाचे श्रीमहासरस्वती व श्रीसरस्वती पूजन
विजयादशमी म्हणजेच दसर्याच्या दिवशी सद्गुरु अनिरुध्द बापूंनी सांगितल्याप्रमाणे श्रध्दावानांनी श्रीमहासरस्वती व श्रीसरस्वतीचे पूजन करणे श्रेयस्कर असते. ते कसे करावे व का करावे ह्याची माहिती स्वत: बापूंनी गेल्या वर्षी प्रवचनामध्ये सांगितल्याप्रमाणे खाली देत आहे. पूजनासाठी एका दगडी पाटीवरच श्रीमहासरस्वती व श्रीसरस्वती च्या खाली दिलेल्या प्रतिमा प्रेमाने काढाव्यात व त्यांचे मन:पूर्वक पूजन करावे. ही दोन्ही चित्रं बाजू-बाजूला काढायची असतात. आपल्या जीवनाचे भाग्य आपण घडवतो. पण त्यासाठी लागणारी उर्जा ह्या प्रतिकांमधून आपल्याला मिळते.