गुरुपौर्णिमा – २ (Gurupournima 2)
रात्र होत आली तरी सद्गुरु बापूंच (अनिरुध्दसिंह) दर्शन घेणारी गर्दी काही संपत नव्हती. अनेक भक्त सद्गुरुत्त्वाच प्रतिक असणार्या त्रिविक्रमाचं पूजन करुन दर्शनाला येत होते. अस सर्व सुरु असताना शेवटी आरतीची वेळ झाली. सर्व प्रथम बापूंनी (अनिरुध्दसिंह) त्यांच्या गुरुंची (करवीता गुरु – श्रीगुरुदत्त) आरती केली. या आरतीच्या वेळेस मात्र माझे सद्गुरु पूर्णपणे ’भक्ताच्या’ भूमिकेत शिरतात व आरती करताना तेव्हढेच भावविव्हळ होतात. बापूंच्या (अनिरुध्दसिंह) आरतीतील ’आर्तता’ बापूंच्या (अनिरुध्दसिंह) चेहर्यावरील भावांवरुन समजून येते.