श्रीदत्तकैवल्य याग सेवा ( Shree Datta kaivalyayag Seva )
सद्गुरु बापूंच्या (अनिरुद्धसिंह) कृपाशिर्वादाने शनिवार, दि. १७ एप्रील २०१०, म्हणजेच अक्षयतृतियेच्या दिवसापासून श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम् येथे “श्रीदत्तकैवल्य याग सेवा” सुरू करण्यात आली. श्रीगुरुदत्तात्रेय श्रद्धावानाच्या मनात असलेली सद्गुरुतत्वाची भक्ती दृढ करण्याचं कार्य करत असतात. श्रीदत्तकैवल्य यागात सहभागी झाल्यामुळे श्रीदत्तात्रेयांचा आशिर्वाद श्रद्धावानांना लाभतो आणि त्यांची सद्गुरुभक्ती दृढ होते. मनात सतत सदगुरु स्मरण राहण्याच्या दिशेने तो प्रगती करतो…आणि श्रीगुरुचरित्रातील १४व्या अध्यायात म्हटल्याप्रमाणे, ज्याचे हृदयीं श्रीगुरुस्मरण। त्यासी कैचें भय दारुण। काळमृत्यु न बाधे जाण। अपमृत्यु काय