हेमाडपंतांची व यवनाची भेट (Hemadpant’s tryst with Mohammedan gentleman)
हा प्रसंग हेमाडपंताच्या आयुष्याला वळण देणारा आहे. हेमाडपंतांनी साईनाथांना बघितलेलं ही नाही, फोटो ही पाहिलेला नाही. उलट काकासाहेब दिक्षीतांनी त्यांना सांगितल्यानंतरही शिर्डीला जायचा विचार हेमाडपंत सोडून देतात. कारण मनात प्रश्न उद्भवलेला असतो की ’सद्गुरूचा उपयोग काय?’ पण त्यानंतर नानासाहेब चांदोरकरांच्या विनंतीनंतर हेमाडपंत शिर्डीस जायला निघतात. हेमाडपंतांची शिर्डीला जाणारी गाडी सुटू शकते हे जाणून, तसेच साईनाथ त्यांच्या भक्ताचा म्हणजेच नानासाहेब चांदोरकरांचा शब्द राखण्यासाठी आणि सद्गुरुभक्ति मार्गावर येऊ इच्छिणार्यासाठी साईनाथ स्वत: यवनाच्या