होमियोपॅथी

सारांश, बापुंच्या कुटुंबातच वैद्यकशास्त्राचा अनोखा समन्वय असल्याचे यातून आपल्या लक्षात येते. स्वत: बापू एम्. डी.- मेडिसीन आहेत आणि ऍलोपॅथीचे पदव्युत्तर शिक्षण व पुढे काही काळ अध्यापन आणि वैद्यकीय व्यवसाय करण्याबरोबरच त्यांनी आयुर्वेद व होमियोपॅथी यांचाही सखोल अभ्यास केला आहे.

अभ्यासशील बापू
बापुंचे जाणवलेले एक वैशिष्ट्य म्हणजे ते स्वत: सतत अभ्यास करत असतात, नवीन नवीन गोष्टी शिकत असतात. आयुर्वेदाच्या बाबतीतही बापुंचे अनेक प्रकारे अभ्यास व संशोधन कार्य सुरूच असते. सुरुवातीच्या काळात कै. वैद्य श्री. वेणीमाधवशास्त्री जोशी, कै. वैद्य श्री. धों. स. अंतरकर यांसारख्या आयुर्वेदातील मान्यवरांसह बापुंनी वारंवार सांगोपांग चर्चा, संशोधन, प्रयोग आदि करून आयुर्वेदाच्या विविध पैलूंचा अभ्यास केला आहे. बापुंनी होमिओपॅथीचा सखोल अभ्यास स्वस्तिक्षेम तपश्‍चर्याकाळात केला आणि होमिओपॅथी कॉन्फरन्समध्ये जिज्ञासू छात्रवृत्तीने उपस्थित राहून तज्ञ डॉक्टरांशी संवादही साधला.

बापुंनी स्वत: आयुर्वेदाची विविध औषधे बनवली आहेत, त्यांचा स्वत:च्या प्रॅक्टिसमध्ये ते वापरही करतात आणि त्यांचा वैद्यकशास्त्राच्या सर्व ज्ञानशाखांचा अभ्यास सतत सुरूच असतो. आजही हॅरिसनच्या इंटरनल मेडिसीन पुस्तकाची नवीन आवृत्ती आल्याचे कळताच बापु स्वत: ती ताबडतोब विकत घेऊन अख्खीच्या अख्खी उत्साहाने वाचून काढतात. ती आवृत्ती बापुंच्या हातात पडल्यावर त्यांच्या चेहर्‍यावरचा विलक्षण आनंद पाहण्याजोगा असतो. एका छात्राची ही ज्ञानपिपासा, जिज्ञासा त्यांच्याठायी अखंड असते आणि ते नवीन गोष्टी जाणून घेण्यास, स्वत:चे ज्ञान अद्ययावत् करण्यास अत्यंत उत्सुक असतात. ही ‘छात्रवृत्ती’ आम्ही बापुंकडून नक्कीच शिकायला हवी.

कृत्स्नो हि लोको बुद्धिमतां  आचार्य: शत्रुश्‍च अबुद्धिमताम्|

                                         – चरकसंहिता विमानस्थान ८-१४

‘जे खरे बुद्धिमान आहेत त्यांच्यासाठी अवघे विश्‍व गुरु आहे, तर मूर्खांसाठी शत्रु’ असे चरकाचार्य म्हणतात. याचाच अर्थ हा आहे की खरा बुद्धिमान मनुष्य विश्‍वातील प्रत्येक गोष्टीकडून काही ना काही शिकतच असतो. ‘बालादपि सुभाषितं ग्राह्यं’ या न्यायाने बापू प्रत्येक नवीन गोष्ट शिकत असतात आणि त्यामुळेच आपल्यापेक्षा वयाने लहान असणार्‍यांकडून संगणकक्षेत्रातील, माहिती-तन्त्रज्ञान क्षेत्रातील आधुनिक प्रणाली जाणून घेताना त्यांना जराही संकोच वाटत नाही. माणसाने स्वत:ला ‘अपडेट’ करत रहायलाच हवे, हे त्यांच्या आचरणातून आम्ही शिकतो.

Bapu’s visit to Nashik

   Our beloved Sadguru, Param Pujya Aniruddha Bapu visited Shri Guruji Rugnalaya managed by the institute, ‘Dr. Babasaheb Ambedkar Vaidyakiya Pratishthan’. During this visit, Bapu visited the ICU, Dialysis Room, General Ward, Special Rooms, X-Ray, CT Scan, Pharmacy, OPD, Pathology, Cancer Radiation Room and other various sections of the hospital. After this, ‘Special Ayurvedic packages for a healthy lifestyle’ created by the hospital’s Ayurvedic Department, were inaugurated by Bapu at

बापूंची नाशिक भेट - Bapu's visit to Nashik

आपले लाडके सद्गुरु परमपूज्य अनिरुद्धबापू, ह्यांनी नुकतीच नाशिक येथील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान’ संचालित ‘श्रीगुरुजी रुग्णालया’ला भेट दिली. ह्या भेटी दरम्यान बापूंनी रुग्णालयातील आयसीयू, डायलिसिस रूम, जनरल वॉर्ड्स, स्पेशल रूम्स, एक्स-रे, सी टी स्कॅन, फार्मसी, ओपीडी, पॅथॉलॉजी, कॅन्सर रेडिएशन रूम इत्यादि विभागांची पाहणी केली. त्यानंतर ‘कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहा’मध्ये रुग्णालयाच्या आयुर्वेदिक विभागाने सुरु केलेल्या ‘आरोग्यसंपन्न जीवनशैलीसाठी उपयुक्त अशा पॅकेजेस’च्या शुभारंभ बापूंच्या हस्ते संपन्न झाला. ह्या प्रसंगी रुग्णालयातील काही डॉक्टरांचा