भक्ती

मी सहजच असं एकदा विचारलं होतं की ‘बापू बर्‍याचदा चळवळ अशी पुढे गेल्यानंतर, हा सगळा भक्ती मार्ग पुढे गेल्यानंतर, भक्तच त्या चळवळीचा पराभव करतात. मग ती चळवळ फसते’. पण बापू ठामपणे म्हणाले की ‘याबाबतीत असे होणे नाही.’ मग त्यांनी मला त्यांची १३ कलमी योजनेची संकल्पना सांगितली. व्यवसायाच्या निमित्ताने मी नेहमी बापूंच्या प्रवचनांना येऊ शकत नव्हतो. पण या बापूंच्या चळवळीशी आपणही संलग्न असावं अशी इच्छा होती. पत्रकार म्हणून आपल्याला असलेल्या माहितीद्वारे, माहितीच्या आदानप-प्रदानाद्वारे आण काही योगदान देऊ शकतो का, याचा मी विचार करीत होतो. पण एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटतो. बापूंनी चकार शब्दाने आमच्या या कामाची माहिती प्रेसमध्ये यायला हवी, असं सांगितलं नाही. उलट लोकप्रभेत मुलाखत छापून आल्यानंतर अनेक वर्तमानपत्रांनी, बापूंकडे मुलाखतीसाठी चौकशी केली होती. ‘आम्हालाही त्यांची एक मुलाखत हवीय’, असं सांगून यासाठी मलाही गळ घातली. मी बापूंच्या कानावर ही गोष्ट घातली. बापू म्हणाले, मला त्याची काही गरज वाटत नाही.

 पुढे ज्यांंनी बापूंच्या मुलाखतीबद्दल विचारले, त्यांना मी बापूंचा निरोप दिला. तुमची इच्छा मी बापूंच्या कानावर घातलेली आहे. जर तसेच काही असेल तर त्यांना पत्र लिहून कळवा, त्यांना वाटलं तर ते नक्कीच प्रतिसाद देतील. त्यावेळी बापूंनी सगळ्यांना तो लोकप्रभेचा अंक देऊन, ‘मला जे काही म्हणायचे होते, ते मी या लेखात सगळं म्हटलेलं आहे. माझ्याकडे इतक्यात तरी काहीही नाही’ असे सांगितले. कुठल्याही क्षेत्रातल्या व्यक्तीची मुलाखत घेताना, मी एक प्रश्‍न त्यांना आवर्जून विचारायचो. तुमच्या चळवळीचं किंवा क्षेत्राचं पुढच्या पाच वर्षात काय होणार आहे? या प्रश्‍नाच्या उत्तरातून त्या व्यक्तीच्या दृष्टीचा आपल्याला अंदाज येतो. बापूंच्या १३ कलमी योजनेतून बापूंकडे असलेली दूरदृष्टी दिसते. त्या १३ कलमी योजनेने मला, वाचकांना आणि महाराष्ट्राला प्रभावित केले. १३ कलमी योजनेवेळी बापूंनी सगळी परिस्थिती समग्र विचार करून कार्यक्रम मांडला होता. आजही त्यांच्या धाडसाबद्दल कौतुक करावसं वाटतं. मी त्यासाठी त्यांना कुर्निसात करायला तयार आहे. कारण, हे एवढं सोपं नव्हतं.

  बापू आणि आमच्यातील दूवा होता, ते म्हणजे  खुद्द बापूच. खुद्द बापू म्हणजे, बापूजी ज्यांना आम्ही मोहनदास करमचंद गांधी ह्या नावाने ओळखतो. मला ह्या देशातील आवडलेलं, भावलेलं व्यक्तीमत्व असेल तर ते महात्मा गांधीजी. आम्ही गांधी समजवून घेण्याचा प्रयत्न करतो, पण ते एवढं सोपं नाही. महात्माजींना ह्या देशाला, आम्हाला सर्वकाही दिले. ब्रिटिशांनी आम्हाला लाचलुचपत शिकवली. कर्झनसारख्या निर्दयी मंडळींनी व्यक्तिगत पातळीवर एवढी लूटमार केली. इतिहास कोणी वाचत नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. पण गांधीजींनी आम्हांला मुल्य दिली, सचोटीने वागा, प्रामाणिकपणे वागा आणि सत्य बोला. त्यांचा सत्याग्रह इतका सोपा नाही. त्याच धर्तीवर १३ कलमी योजना जाहीर करण्याचा बापूंचा निर्णय धाडसी होता. यामध्ये चरखा चालविण्याचा, सूतकताईचा बापूंचा निर्णय माझ्यासाठी मोठा होता. लोकांना चरखा चालवायला भाग पाडणं एवढं सोपं नव्हतं. यासाठी बापू मणिभवन येथील व्यक्तींच्या संपर्कात होते. किती प्रकारचे चरखे असतात, चरखा कसा चालवायचा, एवढंच नव्हे तर बापू स्वत: चरखा चालवायला शिकले. आपल्या कार्यकर्त्यांना तयार केले, मग पेळू कुठून आणायचे, इत्यादींची माहिती १३ कलमी कार्यक्रमात आहे. हा कार्यक्रम बापूंनी सर्वांसमोर जाहीर केला तेव्हा मला आश्चर्य वाटले. कारण चरखा चालवायचा, सूत कातायचे हे त्यावेळेला एक कवीकल्पना म्हणून बोलणं ठिक होतं. पण प्रत्यक्षात बापूंवर प्रेम असणार्‍या लोकांनी जेव्हा हे सुरू केले तेव्हा बापू ही व्यक्ती काय आहे. बापूंच्या शब्दात किती सामर्थ्य आहे, हे मला कळलं.

 बापूंची ही कृती ‘आऊट ऑफ द वे’ होती. १३ कलमी योजना जाहीर होऊन सात-आठ वर्षे लोटली, त्यानंतर मी माझ्या एका कामाच्या निमित्ताने मणिभवनला गेलो होतो.  तेव्हा तिथे अनिरुद्ध बापूंचा विषय निघाला. त्यांच्या कार्याचा उल्लेख तिथे इतका आदराने केला गेला की बापूजींनंतर म्हणजे महात्मा गांधीजीनंतर, त्यांच्या लेखी दुसरे बापू हेच, असं त्यांचं म्हणणं होतं. याच १३ कलमी कार्यक्रमातील बापूंनी ‘गोग्रास’ ही योजना मांडली होती. ती देखील तशीच शेतकर्‍यासाठी राबविलेली योजना होती. बापूंनी त्यावेळेला, साध्या रद्दीचा, घरातील जुन्या भांडीकुंडींचा वापर, गरजूंसाठी केला. शहरात या गोष्टींना फारशी किंमत नाही, पण या गोष्टी कोल्हापूर, धुळे येथील गरजूंसाठी त्या फार महत्त्वाच्या ठरतात. बापूंनी त्यावेळी राबविलेल्या योजनांना आता गेल्या काही वर्षांपासून फार मोठे महत्व आले आहे. आदिवासी भागात मेणबत्या आणि काडेपेटीचे वाटप हे स्पृहणीय काम आहे. बरंं, हे साहित्य मिळणारी आदिवासी मंडळी काही बापूंच्या प्रवचनाला येऊ शकणार नाहीत, किंवा बापूंना मतं देणार नाहीत, कुठल्याही प्रकारच्या स्वार्थाशिवाय बापू त्यांना या वस्तूंचे वाटप करीत आहेत. आता कुठेही मदतीची भावना, उपकृत केल्याची भावना देखील नव्हती.

Aniruddha Bapu told in Pitruvachanam 28 Apr 2016 that The presiding deity for the Muladhara Chakra is ‘Ekadant’ Ganesha

परमपूज्य सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापू ने २८ एप्रिल २०१६ के पितृवचनम् में  ‘मूलाधार चक्र के स्वामी एकदन्त गणेश हैं’, इस बारे में बताया। यह उच्चारण की क्लॅरिटी (clarity) देनेवाला शस्त्र क्या है? दन्त। दिखानेवाला दाँत है। यही क्लॅरिटी का बेसिक है। क्या हम जो मन में होता है, वही उच्चार करते हैं? नहीं, हमारे खाने के दाँत अलग, दिखाने के दाँत अलग। ये कहता है, दिखाने के दाँत भी एक

मूलाधार चक्र की चार पंखुडियाँ (The four petals of Mooladhara Chakra) - Aniruddha Bapu

परमपूज्य सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापू ने ७ एप्रिल २०१६ के पितृवचनम् में ‘मूलाधार चक्र की चार पंखुडियाँ’ इस बारे में बताया। स्वाधिष्ठान चक्र को देखते समय ध्यान में रखिये की मूलाधार गणपति जो हैं, मूलाधार गणेश जो हैं, उनका जो ‘ॐ लं’ ये बीज है, इंद्र का भी बीज है, जो वसुंधरा का बीज है, ये जानते हैं कि इस वसुंधरा पर सारे विघ्नों का नाश करनेवाले जो मंगलमूर्ति गणेश

`ॐ लं ’ का जप करे (Chant `Om Lam') - Aniruddha Bapu

परमपूज्य सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापू ने ७ एप्रिल २०१६ के पितृवचनम् में  ‘ॐ लं का जप करें’, इस बारे में बताया।  शमनं, दमनं नहीं, destruction नहीं, दमन नहीं है, suppression भी नहीं, नॉर्मल करना। जो हमारे विकार या वासनाएँ हैं, जो भी हमारे षड्‌रिपु हैं, वे सारे षड्‌रिपु कहां से काम करते हैं? तो मूलाधार चक्र से काम करते हैं। और ये जो ‘शं बीज’ है, ये ‘लं बीज’ के

‘ ॐ लं ’ यह कहना ही काफी है - भाग २ (Chanting Om Lam is sufficient - Part 2) - Aniruddha Bapu

परमपूज्य सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापू ने ७ एप्रिल २०१६ के पितृवचनम् में ‘ ॐ लं यह कहना ही काफी है’ इस बारे में बताया। ये जो ‘शं’ बीज है, ये रुद्र का भी है और भद्र का भी है। हमें हमारी जिंदगी में दोनो चाहिए, लेकिन ये स्वरुप किसके लिये हैं? आवश्यकता क्या है? हम कोशिश करते हैं, मैं किसी को ना फसाऊं और मैं अध्यात्म मार्ग पर रहूं, भगवान

Chanting Om Lam is sufficient

परमपूज्य सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापू ने ७ एप्रिल २०१६ के पितृवचनम् में ‘ ॐ लं यह कहना ही काफी है’ इस बारे में बताया। अभी हम लोग यह चक्रों के बीजमंत्र को देख रहे हैं, right? तो यह मूलाधार चक्र हैं । मूलाधार चक्र के ‘ लं ’ बीज को हम देखते हैं। क्या है मूलाधार चक्र? उसके साथ हमें अब देखना हैं, ये जो चार दल हैं इस चक्र

he Shraddhavan is connected to Chandikakul

परमपूज्य सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापू ने ७ एप्रिल २०१६ के पितृवचनम् में ‘श्रद्धावान यह चण्डिकाकुल से जुडा ही है’ इस बारे में बताया। माँ भगवती और उसका जो बेटा है त्रिविक्रम, वो हमारा मन बदलने के लिये सारी सहायता करता है। हमारी बुद्धी को और ताकद देता है, हमारे मन को और सामर्थ्य देता है, हमारे प्राणों में ऐसे ‘बदलाव’ करते हैं, जिससे हम मन कंट्रोल कर सके। लेकिन मन

सुन्दरकाण्ड पाठ, पूजन एवं अभिषेक (Sunderkand Paath) - Aniruddha Bapu

परमपूज्य सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापू ने अपने ०३ मार्च २०१६ के पितृवचनम् में श्रीहरिगुरुग्राम में १७ मई २०१६ से २१ मई २०१६ तक होनेवाले सुन्दरकाण्ड पाठ के बारे में जानकारी दी। १७ मई २०१६ से २१ मई २०१६ तक ५ दिन यहां श्री हरिगुरुग्राम में सुबह ९ बजे से शाम को ७ बजे तक पूरे के पूरे वैदिक पध्दति से उपाध्याय गणों के द्वारा यहां सुन्दरकाण्ड का पठण, पूजन और

सुंदरकांड पठण उत्सव - १७ मे ते २१ मे २०१६

संतश्रेष्ठ श्रीतुलसीदासजी विरचित ‘श्रीरामचरितमानस’ हा ग्रंथ सर्व भारतभर श्रद्धावानजगतात अत्यंत जिव्हाळ्याचा आहे आणि त्यातील ‘सुंदरकांड’ ह्या भागाला श्रद्धावानांच्या जीवनात आगळंवेगळं स्थान आहे. सद्गुरु बापूंसाठीही ‘सुंदरकांड’ ही अतिशय प्रिय गोष्ट आहे. सीतामाईच्या शोधाकरिता हनुमंताबरोबर निघालेल्या वानरांचा समूह समुद्रकाठी पोहोचतो इथपासून सुंदरकांडाची सुरुवात होते. त्यानंतर हनुमंत समुद्रावरून उड्डाण करून लंकेत प्रवेश करून सीतेचा शोध घेतो?व लंका जाळून पुन्हा श्रीरामांच्या चरणांशी येऊन त्यांना वृत्तांत निवेदन करतो. मग बिभीषणही श्रीरामांकडे येतो व श्रीराम वानरसैनिकांसह

सर्वदेवनमस्कार: केशवं प्रति गच्छति (The worship offered to any deity ultimately reaches to the Supreme Being Keshava) - Aniruddha Bapu Pitruvachanam 10 Mar 2016

परमपूज्य सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापू ने अपने १० मार्च २०१६ के पितृवचनम् में ‘सर्वदेवनमस्कार: केशवं प्रति गच्छति’ इस बारे में बताया।  अनिरुद्ध बापू ने पितृवचन के दौरान यह बताया की, हर किसी के दिमाग में एक सवाल उठता है । कि हम लोग कौनसी प्रार्थना करे, कौनसा जप करे गुरुक्षेत्रम का मंत्र दररोज करना बहुत अच्छी बात है, सुंदर बात है, compulsory नहीं है। वैदिक धर्म की महत्ता है भारतीय

प्रदक्षिणा सूर प्रार्थना

सद्‌गुरू श्रीअनिरुद्ध बापूंनी काल गुरूवार, दिनांक १० मार्च २०१६ रोजी ’श्रीशब्दध्यानयोग’ या उपासनेची महती विशद केली व ही उपासना झाल्यानंतर प्रत्येकाला स्वत:च्या सप्तचक्रांची प्रदक्षिणा करता येण्यासाठी म्हणून ’प्रदक्षिणा सूर’ प्रार्थना याविषयी सांगितले. श्रीशब्दध्यानयोगमध्ये मातृवाक्याच्या पठणानंतर ही ’प्रदक्षिणा सूर’ प्रार्थना यापुढे समाविष्ट केली जाईल.    सद्‌गुरू श्रीअनिरुद्ध बापूंनी यापूर्वीच सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाने स्वत:च्या सप्तचक्रांची केलेली ही प्रदक्षिणा असेल आणि त्यासाठी प्रत्येकाने फक्त ही प्रदक्षिणा सूर ऎकल्याने स्वत:च्या सप्तचक्रांची प्रदक्षिणा होते आणि त्याचबरोबर