जातवेद

ॐ त्रातारं इन्द्रं अवितारं इन्द्रं हवे हवे सुहवं शूरं इन्द्रम् । ह्वयामि शक्रं पुरुहूतं इन्द्रं स्वस्ति न: मघवा धातु इन्द्र:॥

त्रातारं इन्द्रं अवितारं इन्द्रं. त्रातारं इन्द्रं म्हणजे जो एकदा रोग झाला की त्याला त्यातून तारण करतो, वाचवतो. संकट आलं की वाचवतो तो त्रातारं इन्द्रं. अवितारं इन्द्रं म्हणजे संकट येण्याच्या आधीच जो वाचवतो, रोग येतायेताच जो थांबवतो तो अवितारं इन्द्रं. ‘ॐ त्रातारं इन्द्रं अवितारं इन्द्रं हवे हवे सुहवं शूरं इन्द्रम् । ह्वयामि शक्रं पुरुहूतं इन्द्रं स्वस्ति न: मघवा धातु इन्द्र: ॥ आंघोळ करताना म्हणायचा मंत्र होता. अनेकांनी आठ दिवस म्हटला. मग सोडून दिला. विसरलो. कोण कोण दररोज म्हणतात? आं हा हा हा (बापूंनी टाळ्या वाजविल्या) मी टाळ्या वाजविल्या प्रेमाने अतिशय कारण मला आनंद वाटतोय. कारण मला आनंद वाटतोय माझ बोलण चूक ठरल्याचा. आनंद आहे मला येस! बरोबर आहे. अरे डेफिनेटली बापाला ह्याचा आनंदच होणार, डेफिनेटली होणार. आय अ‍ॅम सो हॅप्पी हे म्हणत रहा. ह्या मंत्रामध्ये खूप मोठी ताकद आहे बाळानों! आज लाखो वर्ष…आपण आज इतिहास बघतोय प्रत्यक्षमधून, लाखो वर्ष म्हटले गेलेले मंत्र आहेत. अतिशय पवित्र मंत्र आहे. हा मंत्रसुद्धा आपल्या जीवनात आंघोळ करताना असेल. तर आता त्रिविक्रमाची नाव तुम्हाला सांगतो, ज्यांना पाहिजे लिहून घ्या. त्रिविक्रमाला कुठल्या कुठल्या नावांनी ओळखल जात तर – जातवेद:। जातवेद: हे एक नाव आहे. मघाशी श्रीसूक्तामध्ये तुम्ही ऐकल असेल ‘जातवेदो महावह:’ बरोबर – जातवेद. जातवेद हे एक नाव आहे. दुसर नाव आहे समाग्नि.

शरीरामधला अग्नि सम असणं म्हणजे जास्तही नाही आणि कमी ही नाही. व्यवस्थित असणं, ही स्थिती म्हणजे आरोग्य स्थिती म्हणून ह्याच नाव आहे – समाग्नि. ह्याचं तिसरं नाव आहे – मित्राग्नि. म्हणजे अग्नि जो मैत्रीपूर्ण आहे. जो दाहक ठरत नाही, त्रासदायक ठरत नाही. जातवेद, समाग्नि, मित्राग्नि. चौथं नाव आहे – श्रीशब्द. श्रीशब्द म्हणजे मातेचा शब्द, आदिमातेचा शब्द. त्यानंतर – अंबज्ञ हे सुद्धा त्रिविक्रमाचं नाव आहे. अंबज्ञ म्हणजे त्रिविक्रम. त्यानंतर – क्षमेन्द्र. क्षमेन्द्र – त्रिविक्रमासारखा कोणीच सापडणार नाही म्हणून त्याला क्षमेन्द्र दिलेलं नाव आईने. आणि सातवं नाव आहे – श्रीश्‍वास. सातवं नाव आहे – श्रीश्‍वास. आणि आठवं नाव आहे – इंद्रनाथ. इंद्राचा नाथ जो आहे तो. ओ.के. तर ही त्रिविक्रमाची आठ नाव प्रमुख नाव मानलेली आहेत. ओ.के. आता इथे जे आपण पहिल दाखवल ती हाताची क्लिप दाखवा जरा बाळानों अगदी पहिली, आईच्या नंतरची- जल, पृथ्वी, आकाश, वायु, अग्नी हे लक्षात घ्यायचं हे का दाखवलं बापुंनीं आम्हाला? उगीचच्या उगीच तर नाही. आपल्या हातांमध्ये जबरदस्त पॉवर आहे. आपली सप्तचक्र, आणि आपल्या निरनिराळ्या नाड्या ह्याच्यामध्ये केवळ आपल्या हाताच्या मुद्रा जर आपण शिकलो…आज मी तुम्हा दाखवणार नाही, कॉपी-बीपी करू नका. पुस्तिकेमध्ये तुम्हाला मिळतील. व्यवस्थित काढून मिळतील. इकडे चुकीचं काढलं तर त्याचा काही उपयोग होणार नाही. त्रास काही होणार नाही. पण हाताची पाच बोट ह्या पंचमहाभूतांची असल्यामुळे, त्यांच्या विशिष्ट हालचालींमुळे आपल्या शरीरातला इलेक्ट्रोमॅग्नेटिक चार्ज उचित दिशेने प्रवाहित करण सोप पडत. आलं लक्षामध्ये, त्यामुळे ह्यातली कुठली मुद्रा कशासाठी वापरायची वगैरे मी पुस्तिकेमध्ये सगळ देईन. ते आता मला सांगत बसणं शक्य होणार नाही. पण ही अवधूत मुद्रा आहे. आलं लक्षामध्ये.

ही एका हाताने करायची, दोन हाताने करायची ते मी सगळ सांगीन. अवधूत मुद्रा आहे, आलं लक्षामध्ये? अवधूत शब्द खूप महत्त्वाचा आहे. आपण ‘अवधूत चिंतन’ केलं, मग ‘प्रसन्नोत्सव’ केला आणि आता ‘श्रीश्‍वासम्’ करतोय. आणि आपण नेहमी काय म्हणतो – ‘अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त।’ तर ही ‘अवधूत मुद्रा’ आहे लक्षात ठेवा. नेस्क्ट. ही ‘अंबा मुद्रा’ आहे. त्या आईची मुद्रा आहे ही. ओ.के? हे बोटाचे वेडेवाकडे चाळे नाही आहेत काही. आलं लक्षामध्ये? हे आपल्या शरीरातली शक्ती केंद्र नीट जागृत करण्याची गोष्ट आहे, आणि हे तुम्हाला शिकवण्याची सुद्धा व्यवस्था केली जाईल. काही शिक्षक तयार होतील. ते तुम्हाला इथेही शिकवतील. केंद्रावर येऊन पण शिकवतील. लांब-लांबच्या गावातील केंद्रावर पण येऊन शिकवतील ह्याच्याविषयी. आलं लक्षामध्ये? पण उगीच कोणी आलाय कोठून आणि शिकवतोय असं पण होणार नाही. समजलं? प्लीज. तर ही अंबा मुद्रा. त्यानंतर नेस्क्ट आंजनेय मुद्रा. दत्तात्रेय मुद्रा, अंबा मुद्रा, आंजनेय मुद्रा. बापू ही अशी बोट केल्याने काय होतं? ते काय होत ती जेव्हा एकत्रित येतात तेव्हाच कळत. आलं लक्षामध्ये? आणि कमीतकमी सात मिनीट ठेवायची असतात. जास्तीत जास्त किती वेळ, ते सगळ शास्त्र तुम्हाला शिकवल जाईल. डू नॉट वरी. बाकीचे म्हणतील बापू आम्ही एवढे लांबून आज आलेलो आहोत. तुम्ही ज्या गावाला असाल त्या गावाला येऊन ते शिकवल जाईल. तसच्या तसं निर्धास्त रहा. काळजी करू नका. आलं लक्षामध्ये? कारण एक महत्त्वाची गोष्ट नेहमी मी ऐकतो – ‘बापू तुमची मुंबईची माणस’. मुंबईची माणस जेवढी माझी, तेवढी रत्नागिरिची माणसही माझी, तेवढीच कोल्हापूरची माणस माझी, तेवढीच कर्नाटकातली माणस माझी, तेवढीच उत्तर प्रदेशमधली माणस माझी, तेवढीच तामिळनाडू मधली माणस माझी. ओ.के. सिंपल.

त्यानंतर आंजनेय मुद्रा म्हणजे हनुमंत मुद्रा. त्यानंतर त्रिविक्रम मुद्रा. त्यानंतर शिवलिंग मुद्रा इथे शिवलिंग आपोआप तयार होतय आपोआप अंगठ्याद्वारे तुमच्या, डाव्या हाताच्या अंगठ्यामध्ये शिवलिंग तयार होतय ओके? ही शिवलिंग मुद्रा जी आहे ती सुद्धा खूप महत्त्वाची आहे. ह्या शिवलिंग मुद्रेतून काय काय होत ते शिकवताना समजावल जाईल ते प्रशिक्ष्क प्रत्येकाला नीट जमतय की नाही ते बघतील. काळजी करू नका. त्यानंतर नेक्स्ट रसमुद्रा, रसमुद्रा. शरीर आणि मन, जीवन रसरशीत करणारी मुद्रा आहे. नेस्क्ट. स्वतिमुद्रा किंवा हिला अरुला मुद्रा सुद्धा म्हणतात. अशा एकंदर सोळा मुद्रा आहेत. ह्या मुद्रासुद्धा तुम्हाला शिकवल्या जाणार आहेत. तुम्ही म्हणाल ह्या मुद्रांचा आणि श्रीश्‍वासमचा संबंध काय? तर म्हटल तर संबंध आहे. पण्अ क्करायलाच पाहिके असं काहे आवश्यक नाही. पण ह्या मुद्रा म्हणजे काय आहे? तर आपल्या हातामध्ये जी पंचतत्तव आहेत…दुसरा फोटो काढ…ही पंचमहाभूतांमधूनच सर्व वस्तू बनलेली आहे ना? प्रत्येक शरीर काय, प्रत्येक वस्तू काय, पृथ्वी काय, आकाश काय, ग्रह काय, तारे काय, हे सगळे कशा पासून बनलेले आहेत, पंचमहाभूतांपासूनच बनलेले आहेत. त्यांच्या विविध मिश्रणांपासून हे मूल घटक आहेत सृष्टीचे आणि त्या मूलघटकांची स्थान आपल्या ह्या पाच-पाच बोटांमध्ये आहेत. मनुष्य डावरा असो की उजवा असो त्याने प्रॉब्लेम नाही. पण दोन्ही ह्याच्यामधल्या निरनिराळ्या मुद्रांमध्ये बोटं वेगळी वेगळी जी एकत्र आणली जातात ज्या पोझिशनमध्ये केल्या जातात त्यामुळे बॅलन्स तयार होतो. आजार कधी उत्पन्न होतो जेव्हा ह्या पंचमहाभूतांमध्येच प्रॉब्लेम तयार होतो तेव्हा. आलं लक्षामध्ये? हे कसं हिलिंग कोड तुम्ही ऐकणार…त्यासाठी शांती पाहिजे. पण बसमध्ये बसल्या बसल्यासुद्धा…आलं लक्षामध्ये…त्यातली एखादी जरी मुद्रा तुम्ही कुठली शिकलात…कुठली मुद्रा शिकायची वगैरे तुम्हाला कळेलच…सगळ्या मुद्रा शिकल्यात तर चांगलच आहे. ती मुद्रा करत तुम्ही बसलात बस मध्ये शांतपणे डोळे बंद करून त्याचा फयदा तुम्हाला ़़होणारच आहे, अगदी कानाशी श्रीश्‍वासम असेल चांगल आहे नसेल चांगल आहे पण वाईट नाही.

नामस्मरण करत असाल चांगल आहे, नामस्मरण करत नसाल चांगल आहे. पण ह्या मुद्रा तुमच जीवन पालटवू शकतात. ह्या मुद्रा तुमच्यावर येणार्‍या ज्या वाईट शक्ती असतात बाहेरच्या, जी वाईट स्पंदन असतात त्यांना परतवून लावू शकतात. आलं लक्षामध्ये? तर शिवलिंग मुद्रेचा एवढा प्रखर परिणाम अनेकांना माहित होता, पण आजच्या काळात…ते जर लोकांना जाहिरपणे सांगितल तर मी जर ताईत विकत असेन, आणि जादू आणि भूत काढण्याचे प्रयोग करत असेन तर माझा धंदा चालणार कसा? म्हणून हे योग्य ज्ञान सामान्य गरीब, साध्याभोळ्या माणसांपर्यंत पोहोचवल जात नाही. पण इथे जे सगळ आहे ते आईच आहे. एव्हरी थिंग बिलाँग्ज टू हर.

श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ - भाग १५  (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam - Part 15) - Aniruddha Bapu‬ ‪Marathi‬ Discourse 18 June 2015

श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ- भाग १५ (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam – Part 15) लहान मूल ज्याप्रमाणे आपल्या आईवडिलांकडे, आजीआजोबांकडे हट्ट करते, अन्य कुणा तिर्‍हाइकाकडे हट्ट करत नाही; त्याप्रमाणे श्रद्धावानाने आपल्या पित्याकडे म्हणजेच त्रिविक्रमाकडे हट्ट करावा, त्रिविक्रमाच्या मातेकडे म्हणजेच आपल्या आजीकडे अर्थात श्रीमातेकडे हट्ट करावा. त्रिविक्रमच उचित ते सर्वकाही देणारा आहे. या जगात जे जे काही शुभ, कल्याणकारी, मंगल आहे ते निर्माण करणारा ‘जातवेद’ त्रिविक्रम आहे.

Aniruddha Bapu, Dr. Aniruddha Joshi, Aniruddha Joshi, Aniruddha, Bapu, Sadguru Aniruddha, Aniruddha Bapu Pravachan, faith, teachings, prayer, Lord, devotion, भक्ती, त्रिविक्रम, God, preaching, Bandra, Mumbai, Maharashtra, India, New English school, IES, Indian Education Society, Vedic, Hinduism, Hindu, mythology, Indian mythology, Stuti, prarthana, praise, Praise the Lord, clipping,

श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ – भाग १४ (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam – Part 14) सर्व प्रकारच्या प्रगतीची देवता लक्ष्मीमाता (Laxmi) आहे. ‘हे जातवेदा, लक्ष्मीमातेला माझ्याकडे घेऊन ये’, अशी प्रार्थना ब्रह्मवादिनी लोपामुद्रा श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेत करते. मानवाकडे असणारी सर्वांत मोठी क्षमता आहे- प्रार्थना (prayers) करण्याची क्षमता. प्रार्थना म्हणजे प्रेमाने, विश्वासाने भगवंताला साद घालणे, मनोगत सांगणे. श्रद्धावानाने प्रेमाने, विश्वासाने केलेली प्रार्थना भगवंताने ऐकली नाही असे कधी होऊच

श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ - भाग १३ (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam - Part 13) - Aniruddha Bapu‬ ‪Marathi‬ Discourse 16 April 2015

श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ – भाग १३ (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam-Part 13) भारतवासीयांच्या जीवनात सुवर्ण (gold) आणि रौप्य (silver) यांचे स्थान प्राचीन काळापासून अबाधित आहे आणि ऋषिसंस्थेने भारतीय समाजजीवन सुन्दर रित्या घडवले आहे. (Ramayan) रामायणकाळातील ऋषि हे राजसत्तेसमोर लाचार झालेले नाहीत, हे आम्ही पाहतो. या ऋषिसंस्थेने भारतीय समाजास प्रपंच-परमार्थ दोन्ही सुन्दर रित्या करण्यासंबंधी मार्गदर्शन केले. जातवेद हा मूळ ऋषि आहे आणि पुरोहितही. श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेत

श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ- भाग १२ (The Meaning Of The First Rucha Of Shree suktam - Part 12) - Aniruddha Bapu‬ ‪Marathi‬ Discourse 16 April 2015

श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ- भाग १२ (The Meaning Of The First Rucha Of Shree suktam-Part 12) विविध प्रकारचे सुवर्ण (सोने)(gold) आणि रजत (चांदी)(silver) ‘माझ्या जातवेदा! माझ्या श्रीमातेला माझ्यासाठी माझ्या जीवनात, माझ्या क्षेत्रात घेऊन ये’, असे आवाहन जातवेदास म्हणजेच त्रिविक्रमास करण्याबाबत माता लोपामुद्रा श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेद्वारे आम्हाला सांगत आहे. माझ्यासाठी, माझ्या आयुष्यातील प्रश्न सोडवण्यासाठी, संकटाचे रूपान्तर संधीत करण्यासाठी, हित करण्यासाठी जे मूलभूत सामर्थ्य लागते, ते सामर्थ्य सुवर्ण-रजत या मूलभूत तत्त्वांमध्ये आहे.

श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ - भाग १० (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam - Part 10) - Aniruddha Bapu‬ ‪Marathi‬ Discourse 16 April 2015

श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ – भाग १० (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam – Part 10) जिच्या केवळ उपस्थितीतून तेज प्रकटते अशा हिरण्यवर्णा श्रीमातेला श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेत आवाहन केले आहे. जिचा प्रभाव सदैव वाढतच राहतो अशा श्रीमातेच्या उपस्थितीमुळे माझे भलेच होणार आहे, हा श्रद्धावानाचा भाव असतो. लोपामुद्रेने म्हणूनच पहिला शब्द ‘हिरण्यवर्णा’ असा योजला आहे. सर्व रोग, आधिव्याधि, संकटे, पीडा यांचे हरण करणारी, दुष्प्रारब्धाचे हरण करणार्‍या आदिमाता चण्डिकेला

श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ - भाग ७ (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam - Part 7) - Aniruddha Bapu‬ ‪Marathi‬ Discourse 16 April 2015

श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ – भाग ७ (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam-Part 7) एक विश्वास असावा पुरता। कर्ता हर्ता गुरु ऐसा॥ ही ओवी आम्ही श्रीसाईसच्चरितात वाचतो. जातवेदावर पूर्ण विश्वास असणे हेच श्रद्धावान बनणे आहे. शून्यानां शून्यसाक्षिणी असणार्‍या आदिमातेस म्हणजेच ‘श्री’स घेऊन हे जातवेदा, माझ्या जीवनात ये, हे अत्यंत विश्वासाने जातवेदास सांगितले आहे. आदिमातेचा वर्ण सुवर्णवर्ण आहे असे श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेत म्हटले आहे. सुवर्णाचे महत्त्व काय आहे

श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ - भाग ६ (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam - Part 6) - Aniruddha Bapu‬ ‪Marathi‬ Discourse 16 April 2015

श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ – भाग ६ (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam-Part 6) श्रद्धावानाला भगवंताच्या भक्तीतून विद्या प्राप्त होते. श्रद्धावानाला विश्वास असतो की माझी आदिमाता, माझा भगवंत माझ्यासाठी सर्वकाही उचित करतच आहे. आदिमातेला आणि जातवेदाला प्रत्येक जिवाच्या उन्नयनाची काळजी आहे, माझ्या कल्याणाची काळजी त्यांना आहेच. जातवेद आणि श्रीमाता माझ्या जीवनात सक्रिय असणंच माझ्यासाठी श्रेयस्कर आहे, हा भाव ही ऋचा आमच्या मनात दृढ करते. श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेच्या

श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ - भाग ५ (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam - Part 5) - Aniruddha Bapu‬ ‪Marathi‬ Discourse 16 April 2015

श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ – भाग ५ (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam-Part 5) सुखाची साधने म्हणजे सुख नव्हे. पवित्र मार्गाने परिश्रम करून सुखाची साधने मिळवणे हाच अर्थ पुरुषार्थ सिद्ध करण्याचा राजमार्ग आहे. अपवित्र मार्गाने मिळवलेली प्रत्येक गोष्ट ही अलक्ष्मीकडून आलेली असते. सदैव श्रद्धावान राहून पुरुषार्थ करणार्‍यालाच लक्ष्मी आणि अलक्ष्मी यांतील फरक कळू शकतो. जातवेदच श्रीमातेला माझ्या जीवनात आणणारा आहे, हा विश्वास ही ऋचा आमच्या मनात निर्माण

श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ - भाग ४ (The Meaning Of The First Rucha Of Shree-Sooktam - Part 4)  - Aniruddha Bapu‬ ‪Marathi‬ Discourse 16 April 2015

श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ – भाग ४ (The Meaning Of The First Rucha Of Shree-Sooktam – Part 4) श्रीमातेला घेऊन येण्यासाठी ब्रह्मवादिनी लोपामुद्रा जातवेदास श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेत आवाहन करते. ती स्पष्टपणे म्हणते की माझ्या जातवेदा, माझ्यासाठी माझ्या श्रीमातेला घेऊन ये. ‘माझ्याशी निगडित प्रत्येक क्षेत्रात श्रीमातेला घेऊन ये’, असे येथे जातवेदास प्रार्थिले आहे. हे या ब्रह्मवादिनीच्या अपौरुषेय रचनेचे सौंदर्य आहे. श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेच्या (Rucha) अर्थाबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १६ एप्रिल २०१५

श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ - भाग ३ (The Meaning Of The First Rucha Of Shree-Sooktam - Part 3) - Aniruddha Bapu‬ ‪Marathi‬ Discourse 16 April 2015

श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ – भाग ३ (The Meaning Of The First Rucha Of Shree-Sooktam – Part 3) श्रीसूक्ताच्या (Shree-Sooktam) पहिल्या ऋचेत ब्रह्मवादिनी लोपामुद्रा स्पष्टपणे म्हणते की माझ्या जातवेदा, माझ्यासाठी माझ्या श्रीमातेला घेऊन ये. आदिमातेला, देवाला, सद्‍गुरुला प्रेमाने माझं माझं म्हणण्यात कुठलाही अहंकार नाही. दररोज रात्री झोपण्यापूर्वी, सकाळी उठल्यावर त्या सद्‍गुरुशी, त्या आदिमातेशी अधिक प्रेमाने संवाद साधला जायला हवा. श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेच्या अर्थाबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १६ एप्रिल २०१५ रोजीच्या