श्रावण महिन्यातील घोरकष्टोद्धरण स्तोत्र पठण (Ghorkashtoddharan Stotra Pathan)
श्रावण महिना हा “श्रवण भक्तिचा महिना” म्हणून सर्वश्रुत आहे. म्हणूनच ह्या महिन्यामध्ये अधिकाधिक श्रवण भक्ति (devotion) वाढवून नाम, जप, स्तोत्र पठण करणे हे श्रद्धावानांसाठी श्रेयस्कर असते. परमपूज्य सद्गुरु बापू सुद्धा अनेकवेळा नाम, जप, स्तोत्र पठण तसेच सांघिक उपासनेचे महत्त्व आपल्या प्रवचनातून विषद करतच असतात. ए.ए.डी.एम.(AADM)च्या कार्यकर्ता शिबीरामध्ये परमपूज्य सद्गुरु बापूंनी श्रद्धावान कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले होते की “ए.ए.डी.एम.ची पूर्णपणे उभारणीच मुळी बापूंनी “घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ….” ह्या स्तोत्राचं प्रॅक्टिकल म्हणून केलेली आहे”.