श्रीश्वासम् उत्सवाच्या सुखद स्मृति सदैव स्मरणात (Shreeshwasam Utsav Memories)
४ मे २०१५ ते १० मे २०१५ या कालावधीत आपण श्रीश्वासम् उत्सव आनंदात साजरा केला. या उत्सवादरम्यान अनुभवलेल्या सर्वच अध्यात्मिक कार्यक्रमांची मजा काही औरच होती. या उत्सवातील प्रत्येक गोष्ट मग ती परिक्रमा, पूजन, प्रसाद अर्पण, मुषक (mouse) काढणे, झालीच्या खालून जाऊन दर्शन घेणे, गुह्यसुक्तम् (Guhyasooktam), उषा पुष्करणी वा जलकुंभ असो त्याची स्मृति सदैव आपल्या श्रद्धावानांच्या स्मरणात रहाणारच आहे. या उत्सवानंतर अनेक श्रद्धावानांकडून श्रीश्वासम् उत्सवाचे व्हिडिओ DVDच्या स्वरूपात मिळतील का याबाबत