गणेशोत्सव २०१५
या वर्षीदेखील आपल्या लाडक्या बापूंच्या घरचा गणेशोत्सव एका आगळ्यावेगळ्या आनंदात व उत्साहात पार पडल्याचे आपण सर्वांनीच अनुभवले. या गणेशोत्सवात बापूंनी, येणाऱ्या काळासाठी उचित ठरतील असे काही बदल केले होते. ह्यांतील सर्वांत लक्षणीय बदल म्हणजे दर वर्षी आपल्या भव्यतेमुळे, तरीही शिस्तबद्धतेमुळे सर्वांच्या चर्चेचा विषय ठरत असलेली गणपतीची आगमनाची व पुनर्मिलापाची (विसर्जन) मिरवणूक ह्या वर्षीपासून न काढण्याचा बापूंनी घेतलेला निर्णय! एकंदरीत मुंबईभर नियमीत वाहतुकीची कोंडी होते व पोलिसांवर अतिरिक्त ताण पडतो. हा