स्वस्तिक्षेम संवादम् (swastikshem-sanwad)

aniruddha bapu,

काल परमपूज्य बापूंनी प्रवचनामध्ये स्वस्तिक्षेम संवादम्‌ची संकल्पना सर्व श्रद्धावानांसमोर मांडली; सर्व श्रद्धावानांच्या हितासाठी.

यामध्ये प्रत्येक श्रद्धावानाने चण्डिकाकुलातील कुठल्याही सदस्याशी संवाद साधावयाचा आहे. श्रद्धावानाच्या मनातील भावना, विचार किंवा तो जे काही सांगू इच्छितो ते त्या त्या सदस्यासमोर त्याने मांडावयाचे आहे. 

प्रथम बापू श्रीहरिगुरुग्राम येथे प्रवचना आधी,

“सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके।
शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोस्तु ते।।’

हा श्‍लोक म्हणतील. त्यानंतर कमीतकमी ५ मिनिटांचा काळ असेल, ज्या वेळेस प्रत्येक श्रद्धावानाने डोळे बंद करून, आपण प्रत्यक्ष चण्डिकाकुलासमोर बसलो आहोत हे समजून, जाणून, चण्डिकुलातील कुठल्याही सदस्याशी किंवा सर्वांशी एकत्रितही, त्याला हवा तसा संवाद साधावयाचा आहे. ह्या कालावधीनंतर बापू मातृवात्सल्य उपनिषदातील, हा श्‍लोक म्हणतील.

“नम: सर्वशुभंकरे। नम: ब्रह्मत्रिपुरसुन्दरि।
शरण्ये चण्डिके दुर्गे। प्रसीद परमेश्वरि।।’

बापूंची खात्री आणि ग्वाही आहे की अशा प्रकारे स्वस्तिक्षेम संवादम्‌च्या माध्यमातून चण्डिका कुलाशी किंवा चण्डिकाकुलातील कुठल्याही सदस्याशी साधलेला संवाद त्यांच्यापर्यंत कुठल्याही इतर माध्यमाशिवाय / एजंटशिवाय सहजतेने निश्‍चितच पोहोचेल.

प्रत्येक अधिकृत उपासना केंद्रावरही अशाप्रकारे स्वस्तिक्षेम संवादम् सुरु करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे व त्या संवादम् दरम्यान ते उपासना केंद्र हे हरिगुरुग्रामच असेल हा बापूंचा संकल्प आहे. 

बापूंच्या संकल्पानुसार स्वस्तिक्षेम संवादम् हा श्रीहरिगुरुग्राम येथे व उपासना केंद्रावरच साधता येईल.

Related Post

1 Comment


  1. हरि ओम, दादा. ” स्वस्तिक्षेम संवादम् ” ही परम पूज्य बापूंनी समस्त चण्डिकाकुलाशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची दिलेली अमूल्य सुवर्णसंधी आहे. कोणतेही जप, तप , ध्यान न करता, जे ऋषी -मुनींना दुर्गम अशा तपश्चर्येनंतरही मिळणे दुष्प्राप्य असते ते असाध्य, फक्त आणि फक्त बापूंच्याच कृपादृष्टीने सहज प्राप्त झाले.. अनिरुद्धा तुझा मी किती ऋणी झालो, अनिरुद्धा तुझा मी किती ऋणी झालो…..इतुके अनंत प्रेम फक्त आमचा बापूरायाच करू शकतो…. युगानुयुगे अविरत परिश्रम , अफाट मेहनत घेउनही जे गवसले नसते असा महान खजिनाच बापूंनी बहाल केला आहे… केवळ शब्दातीत असा हा शांती, समाधानाचा अविस्मरणीय ठेवा…..श्रीराम… श्रीराम…श्रीराम….अनंतवेळा मी अंबज्ञ आहे ह्या आदिमातेच्या चरणी, माझ्या देवाच्या बापूंच्या कृपादृष्टीने आणि सदैव अंबज्ञच राहो ही बापूंचरणी प्रार्थना …..

Leave a Reply