सामूहिक बुद्धिमत्ता - भाग २ (Swarm Intelligence) - Aniruddha Bapu Marathi Discourse 8 May 2014

मुंगीसारख्या प्राण्याच्या सामूहिक बुद्धिमत्तेबाबत(swarm intelligence) संशोधन झाले आहे आणि होत आहे व या संशोधनात थक्क करणारी माहिती मिळत आहे. सामूहिक बुद्धिमत्तेने असाध्य ते साध्य होते, हा मुद्दा मुंग्याच्या सामूहिक बुद्धिमत्तेच्या अभ्यासातून स्पष्ट होतो. मुंग्यांनी सामूहिकपणे स्वत:चाच तराफा करून अ‍ॅमेझॉन नदी शिस्तीत कशी पार केली आणि वारुळातील अवघ्या सामग्रीसह सुरक्षित स्थलान्तर कसे केले याबाबतच्या माहितीपटाबद्द्ल सांगून, जर मुंगीसारखा प्राणी हे करू शकतो तर आम्ही मानवही हे नक्कीच सहजपणे करू शकतो असे स्पष्ट करून सद्‍गुरु श्रीअनिरुद्धांनी दिनांक ८ मे २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात सामूहिक बुद्धिमत्तेबाबत सविस्तर माहिती दिली, ती आपण या व्हिडियोत पाहू शकता.

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥