सूर्य, चंद्र आणि अल्गोरिदम (The Sun, The Moon And The Algorithm)

सद्गुरू श्री अनिरुद्धांनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात ‘सूर्य, चंद्र आणि अल्गोरिदम’ याबाबत सांगितले.

हा सूर्य आणि हा चंद्र म्हणजे दिवस आणि रात्र यांची पण प्रतिकं आहेत म्हणजे प्रकाश असणं आणि प्रकाश नसणारी वेळ रात्र म्हणजे काळोख नाही, प्रकाश नसणारी वेळ त्या दोन्ही मध्ये असणारे हे दोन आकाशात लावलेले लोलक आहेत. ज्यादिवशी अमावास्या आहे त्यादिवशी आम्ही काय म्हणतो? आकाशात चंद्र नाही म्हणजे चंद्राचा प्रकाश नाही. पण त्यादिवशी आकाशाकडे बघा उलट त्यादिवशी काय दिसतं? लाखो तारे लकाकताना दिसतात. म्हणजे एक चंद्र नाही आहे पण लाखो तारे लकाकतात आकाशामध्ये, हे विसरून चालणार नाही.

सूर्य, चंद्र आणि अल्गोरिदम (The Sun, The Moon And The Algorithm)

म्हणजे जेव्हा आम्हाला वाटत की आशेचा एक ही किरण नाही तर ऍकच्युअली (Actually) काय असतं? लाखो छोटे-छोटे किरण दूरवरचे दिसायला लागलेले असतात थोडया सबुरीची आवश्यकता असते, पटतयं? म्हणजे ज्याक्षणी आम्ही म्हणतो की आशेचा आता एक ही किरण उरला नाही अरे आकाशाकडे नीट बघा चंद्र नाही आहे पण लाखो तारे जे एरवी दिसू शकत नाहीत पौर्णिमेच्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी एक ही तारा दिसू शकत नाही तर अमावस्येच्या दिवशी मात्र सगळे तारे नीट दिसू लागतात, पटतयं? नक्की बरोबर. म्हणजेच काय? तर सूर्य आणि चंद्र ह्या दोघांशी दिवस आणि रात्र जोडलेले आहेत, बरोबर प्राण आणि क्रमबद्धता जोडलेले आहेत आणि ह्या दोघांचे एकत्रित प्रतिक अशी कुठली गोष्ट आहे? ह्या दोघांची एकत्रित प्रतिक असणारा कुठला मंत्र आहे का? कुठलं नाम आहे का? कुठली काय पूजाविधान आहे का? बाबा सूर्याला अशी आरती ओवाळली, चंद्राला आरती ओवाळली रात्री तर आमचं काम होऊन जाईल, नाही.

त्यासाठी आवश्यकता काय आहे की हे प्राणतत्त्व आणि क्रमबद्धता ह्या दोन्ही शक्ती, प्राणशक्ती आणि निसर्गशक्ती. क्रमबद्धता म्हणजे निसर्गक्रम शक्ती. प्राणशक्ती आणि निसर्गशक्ती ह्या दोन्ही जिकडे एकत्रितपणे गुंफल्या गेलेल्या आहेत आलं लक्षामध्ये. प्राणतत्त्व आणि निसर्गशक्ती म्हणजे क्रमबद्धता ह्या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे गुंफल्या गेलेल्या आहेत अशी गोष्ट म्हणजे सूर्य आणि चंद्र हे एकमेकांना पूरक आहेत एकमेकांच्या विरोधी आहेत का? नाहीत, म्हणजे एकमेकांना पूरक आहेत. तशाच रितीने प्राणतत्त्व जेव्हा निसर्गाला पूरक ठरत तुमच्या शरीरातल्या निसर्गाला, तुमच्या जीवनातील निसर्गक्रमाला, तुमच्या जीवनाचा जो काही क्रम आहे त्याला, तुमच्या जीवनाचा क्रम नाहीसा झालेला आहे तो आणण्यासाठी प्राणतत्त्व जे कार्य करतं ते एकमेकाला अनुकूल असलं पाहिजे पूरक असलं पाहिजे तुम्हाला हानी करणार नसलं पाहिजे. कारण प्राणतत्त्वच भावना चेतवतं, प्राणतत्त्वच माणसाला कृती करायला भाग पाडतं, बरोबर. प्राणतत्त्वावर जय मिळवला की मनावर जय आपोआप आहेच.

सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी प्रवचनात ‘सूर्य, चंद्र आणि अल्गोरिदम’ बाबत जे सांगितले, ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥