अनुचित विचारांना रोखा (Stop unwanted thoughts)

सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २४ जुलै २०१४ च्या मराठी प्रवचनात ‘अनुचित विचारांना रोखा’ याबाबत सांगितले.

 

हा तुमच्या जीवात्म्याशी संवाद होणार लक्षात ठेवा. हा जीवात्म्याशी संवाद होत असतो, जीवात्म्याला प्रेरणा दिली जाते, डायरेक्शन दिलं जातं, दिशा दाखवली जाते, ताकद दिली जाते. पण हे सगळं कधी होऊ शकतं? जेव्हा, बघा, सगळं जग कशातून प्रकटलं? ॐ मधून प्रकटलं. म्हणजे शब्दातून प्रकटलं, बरोबर? या एका शब्दातून, या प्रणवातून प्रकटलं. तशीच आमच्या जीवनसृष्टीमध्ये सगळी ताकद जी आहे, ती सगळी ताकद आमच्या जीवनातली ही त्या भगवंताच्या शब्दातून प्रकटते. भगवंत आमच्या आत्म्याला जे काही सांगतो, जो एक शब्द पुरवतो, जो त्या क्षणाला आवश्यक असेल, त्या शब्दातून, त्या शब्दाच्या ध्वनीलहरींमधून आमच्या जीवात्म्याला ताकद मिळते. ती ताकद आमच्या जीवात्म्याकडून आमच्या मनाला, शरीराला, आमच्या रोगग्रस्त भागाला सगळ्यांना मिळते.

पण तो देवाचा शब्द जो आहे, तो सद्गुरुंचा शब्द जो आहे, मोठ्या आईचा शब्द जो आहे, ह्या महिषासुरमर्दिनीचा जो शब्द आहे, तो शब्द आमच्या जीवात्म्यापर्यंत का पोहोचत नाही? कारण आम्ही सतत विचार करत असतो. Non-stop. बघा, सकाळी उठल्या क्षणापासून झोपेपर्यंत आमचे विचार चालू असतात. बरोबर? आणि कुठल्या विषयावर? काय जगाच्या भवितव्यावर विचार करता? काय प्रत्येक वेळी काय प्रॉब्लेमचं सोल्युशनच घेऊन बसलेले असता? नाही, कुठलेही विचार, दे दणक्यात चालू असतात. पण सतत मनात विचार चालू असतात आणि संत आम्हाला सगळे काय सांगतात? हे विचार पहिल्यांदा बंद करा. अरे कुठून बंद होणार? विचार बंद करायचे म्हटले की अजून १०० विचार येतात.

‘अनुचित विचारांना रोखा’, याबाबत सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी प्रवचनात सांगितले ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥