श्रद्धावानांच्या जीवनातील हनुमानचलिसाचे महत्त्व भाग - ३ (The Significance of Hanuman Chalisa in Shraddhavan's Life Part - 3)

सद्गुरू श्री श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २० जून २०१३ च्या मराठी प्रवचनात श्रद्धावानांच्या जीवनातील हनुमानचलिसाचे महत्त्व (भाग - ३) याबाबत सांगितले.

राजानों, मनुष्य जीवनामध्ये अनेक ठिकाणी हताश होतो, हतबल होतो मला जाणीव आहे, मला मान्य आहे. पण त्यातून बाहेर पडण्यासाठी माझ्या आईने अनेक मार्ग निर्माण करून दिलेले आहेत. तुम्हाला त्याच्यामधला हा सुंदर मार्ग आहे, किती सोपा मार्ग आहे मला सांगा आणि लागतात किती वेळ सात तास, आठ तास, नऊ तास मॅग्झिमम. खरं म्हणजे पाच तासात व्हायला पाहिजे एकशे आठ वेळा म्हणून जर नीट कोणाला पाठ असेल तर, जर नसेल पाठ तर जास्त वेळ लागेल. पण आयुष्यामध्ये दहा तास, बारा तास किती वेळा फुकट घालवतो, बरोबर की नाही? त्याच्या ऐवजी ह्या महिन्यामधून एकदा म्हणजे ह्या महिन्यामध्ये एकदा जर आपण हनुमानचालिसा एकशे आठ वेळा म्हटली तर काय होईल? हा सूर्य आणि चंद्र आपल्या जीवनात येईल. ‘ह’ आणि ‘ठ’ म्हणजे मुलाधारचक्र ते सहस्त्रारचक्र, मुलाधारचक्रामध्ये सूर्य आहे आणि तोच हनुमंत चंद्र रूपाने सहस्त्रारचक्रामध्ये बिंदू म्हणून आहे. 

ह्या दोघांचं एकरूपत्व करणारी ह्या हनुमानचालिसा सारखं स्तोत्र नाही आलं लक्षामध्ये. हे स्तोत्र आपण ह्या महिन्यामध्ये ज्याचा आरंभ वटपौर्णिमेपासून आहे जो अतिशय पवित्र दिवस आहे, पवित्र प्रेमाचा दिवस आहे साक्षात यमाशी लढण्याची गोष्ट आहे, बरोबर. त्या पवित्र दिवसापासून गुरु, सद्‍गुरुतत्त्व जे ‘देव कोपता गुरु तारी। गुरु कोपता कोण तारी॥’ हा प्रश्न साईनाथांच्या चरित्रामध्ये आपण वाचतो बरोबर, ती गुरुपौर्णिमा.

तर मनापासून सांगतो ह्या महिन्यामध्ये जे मी सांगितलय ते खरं लक्षात ठेवून चला आलं लक्षामध्ये. डन, नक्की..व्हेरीगुड. तर आता आज आपण श्रीस्वस्तिक्षेम्‌संवाद करताना काय करणार आहोत? आईला सांगायच आहे माझ्या काय? कि आई आमच्याकडून एकशे आठ वेळा हनुमानचालिसा करून घे. आणि मग बाकीचा संवाद करायचा आहे. आलं लक्षामध्ये, नक्की... प्रॉमिस

सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी प्रवचनात श्रद्धावानांच्या जीवनातील हनुमानचलिसाचे महत्त्व भाग - ३ (The Significance of Hanuman Chalisa in Shraddhavan's Life Part - 3) याबाबत जे सांगितले, ते आपण या व्हिडिओत पाहू शकता

 

ll हरि: ॐ ll ll श्रीराम ll ll अंबज्ञ ll