गुरुक्षेत्रम् मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील महत्त्व – भाग १३

सद्गुरू श्री श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या ०८ एप्रिल २०१० च्या मराठी प्रवचनात ‘गुरुक्षेत्रम् मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील महत्त्व’ याबाबत सांगितले. 

 

त्यानंतर येतो अंकुरमंत्र, एकदा हा ‘विच्चे’ सकट असणारा मंत्र आमचा ध्वजा घेऊन पुढे निघाला. ह्या बाकीच्या बाधाप्रशमनं, पापप्रशमनं, कोपप्रशमनं, सर्वसमर्थं सर्वार्थसमर्थं, त्रिविक्रमनिलयं ही तीन पावलं आम्हाला कळली की त्याच्यानंतर येतो तो अंकुरतत्त्व.

रामाचा आत्मा, जीवनातील महत्त्व, significance of lifeइथे आम्हाला ओळख पटवून दिलेली आहे. दत्तात्रेय कोण? रामाचा आत्मा, सिम्पल. आम्हाला ह्याच्यामधून एकदा हे तीन मंत्र आम्हाला नीट कळले कि आम्हाला बाकीच्या मोठ्या-मोठ्या आध्यात्मिक पोथ्यांची आवश्यकता उरत नाही. मग आम्ही आपलं शंभर ग्रंथ वाचण्याच्या ऐवजी एक पुरुषार्थ, श्रीमद्‍पुरुषार्थ, आमची मातृवात्सल्यविंदानम्‌ची पोथी आणि हा मंत्र घेऊन बसू बस संपलं बाकीची काही आवश्यकता नाही.

हे आम्ही नीट जाणतो कि रामात्मा-दत्तात्रेय, दत्तात्रेय हा रामाचा आत्मा आहे. राम हा आमचा आत्माराम आहे आणि आमच्या आत्मारामाचा आत्मा कोण आहे? दत्तत्रेय आहे. इतकी साधी गोष्ट आम्हाला समजली पाहिजे की प्रभु रामचंद्र हा आमचा आत्माराम आहे, बरोबर आणि ह्या रामाचा जो आमचा आत्मा आहे त्या रामाचा आत्मा कोण आहे? दत्तात्रेय आहे. म्हणजे आमच्या आत्म्याचा आत्मा, आमच्या आत्म्याचा आत्मा म्हणजे आमच्या पित्याचा पिता कोण आहे? हा दत्तात्रेय आहे, सिम्पल. आम्हाला साधी गोष्ट अगदी व्यवस्थितपणे समजली ओ.को.

त्यानंतर दुसरा शब्द काय येतो? रामप्राण, कोण? हनुमन्ताय नम:। तर रामाचा प्राण कोण आहे? तर हनुमन्त हा रामाचा प्राण आहे, हनुमन्त हा रामाचा प्राण आहे बरोबर, म्हणून तो आमचा महाप्राण आहे ओ.के. हनुमन्त हा रामाचा प्राण आहे म्हणून तो आमचा कोण आहे? महाप्राण आहे आणि तो रामाचा प्राण असल्यामुळेच रामाने त्या हनुमन्ताला आमच्याकडे पाठवललेलं आहे, कोण म्हणून? दूत म्हणून, कायमचा रामदूत. तो रामाचा प्राण असल्यामूळे आमच्यासाठी कोण आहे? महाप्राण आहे, समजलं. साधी गोष्ट.

रामाचा प्राण ही काय खायची गोष्ट आहे का? नाही. तो आमच्यासाठी कोण असला पाहिजे? रामाचा प्राण म्हणजे आमच्यासाठी महाप्राण. साधी गोष्ट. किचकट अध्यात्म मला येत नाही, तुम्हाला समजतंय एवढं? मग मी खुशीत आहे. अध्यात्म खूप साधंसुधच असतं आणि अत्यंत सोपंच असतं. इथे कसं आहे, रामाचा प्राण हमुमन्त आहे म्हणून तो आमच्यासाठी महाप्राणच आहे. हनुमन्त हा आमचा महाप्राण आहे, का? ह्याच उत्तर आज आम्हाला सापडलं कारण तो रामाचा प्राण आहे म्हणून सिम्पल, जास्त विचार करण्याची आम्हाला आवश्यकता नाही.

सद्गुरु श्री अनिरुद्धांनी प्रवचनात ‘गुरुक्षेत्रम् मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील महत्त्व’ याबाबत जे सांगितले, ते आपण या व्हिडिओत पाहू शकता.

ll हरि: ॐ ll ll श्रीराम ll ll अंबज्ञ ll

Related Post

Leave a Reply