श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌ मध्ये श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र पाठ

हिंदी     

गुरुवार, दि. ०४ फेब्रुवारी २०१६ ते शनिवार, दि. ०६ फेब्रुवारी २०१६ ह्या दरम्यान श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌ मध्ये श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र पाठ संपन्न झाला. ह्या उत्सवामध्ये २३ पुरोहितांच्या उपस्थितीत श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र पाठ होत असताना, पूजन स्थळी शाळीग्रामावर अनुक्रमे पहिल्या दिवशी ऊसाच्या रसाने, दुसर्‍या दिवशी मधाने व तिसर्‍या दिवशी नारळ पाण्याने अखंड अभिषेक करण्यात आला. त्याचप्रमाणे ह्या प्रत्येक दिवसाच्या पाठाची सांगताना होताना, शेवटच्या आवर्तनाच्या वेळेस, पहिल्या दिवशी तुळशीपत्राने, दुसर्‍या दिवशी गुलाब पुष्पांनी व तिसर्‍या दिवशी कमळ व चाफ्याच्या फुलांनी शाळीग्रामावर अर्चन करण्यात आले.

श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌ मध्ये श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र पाठ श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम्‌ मध्ये श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र पाठ

पूजा मांडणीमध्ये सजावटीचा भाग म्हणून श्रीव्यंकटेशाचा मुखवटा सुंदररित्या सजविण्यात आला होता. तसेच विविध रंगी फुलांच्या माळांनी केलेली प्रासादिक सजावट पूजा मांडणीची शोभा वाढविणारी होती. उत्सवाच्या पहिल्या व दुसर्‍या दिवशी सायंकाळी नैवेद्याच्या वेळी १६ पदार्थांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला व तिसर्‍या दिवशी एकूण ५६ भोगांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. अशा ह्या मंगलमय उत्स्वाचे ५ मिनिटांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग मी ह्या ब्लॉग पोस्टद्वारे माझ्या श्रद्धावान मित्रांसाठी देत आहे.

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥

My Twitter Handle