सद्‌गुरू श्री अनिरुद्ध बापूंचे श्रीश्वासम्‌वरील प्रवचन ( Shreeshwasam)

  हरि ॐ, श्रीराम, अंबज्ञ. पहिल्यांदा आपल्याला आता श्रीसूक्त ऐकायचं आहे. श्रीसूक्त...वेदांमधील एक अशी अनोखी देणगी आहे की जी ह्या...आपण उपनिषदामध्ये आणि मातृवात्सल्यविंदानम् मध्ये बघितलंय की लोपामुद्रेमुळे आपल्याला मिळाली...महालक्ष्मी आणि तिची कन्या लक्ष्मी...ह्या मायलेकींचं एकत्र असणारं पूजन, अर्चन, स्तोत्र, स्तवन...सगळं काही...म्हणजे हे ‘श्रीसूक्तम्’. तर आज पहिल्यांदा...फक्त आजपासून सुरु करायचं आहे आपल्याला ‘श्रीसूक्तम्’. आपले महाधर्मवर्मन म्हणणार आहेत.

Aniruddha Bapu- Shreeshwasam - 12 Mar 2015

  हरि ॐ. अर्थ आज आपल्याला कळला नसेल…काही हरकत नाही. पण ह्या आईचं…माझ्या आदिमातेचं हे जे ‘श्री’ म्हणून ओरिजिनल स्वरूप आहे, त्याच्या रूपाचं, त्याच्या गुणाचं, तिच्या भावांचं…आणि तिची जी ही कन्या लक्ष्मी तिच्याबरोबर तिच्यासाठी कार्य करते. त्या दोघींचं समग्र अस्तित्व ह्या सूक्तामध्ये वर्णन केलेलं आहे. अतिशय पवित्र…आणि हे श्रीसूक्त 9 पातळ्यांवरून, 9 स्रोतसांनी, 9 मार्गांनी कार्य करतं आणि त्या श्रीसूक्तामधूनच रुग्वेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद ह्या तीन वेदांमधला आरोग्य, हेल्थ; आरोग्य म्हणजे केवळ शरीराचं आरोग्य नाही. मनाचं आरोग्य, प्राणांचं आरोग्य, प्रज्ञेचं आरोग्य, अखिल जन्माचं आरोग्य, आपल्या प्रत्येक स्थितीचं आरोग्य, आपल्या सांपत्तिक स्थितीचं आरोग्य, आपल्या वैचारिक स्थितीचं आरोग्य, आपल्या भावनिक स्थितीचं आरोग्य, आपल्या घरातील वातावरणाचं आरोग्य, ह्या सगळ्या प्रकारच्या आरोग्यांना, ह्या आपल्या तीन वेदांनी ठिकठिकाणाहून, वेगवेगळ्या मार्गांनी प्रचंड बळ पुरविलेलं आहे. पण ते वेद एवढे मोठे आहेत, बघायला गेलं तर एवढे एवढे जाड, त्यांचे संस्कृत, ती सुद्धा खूप जुनी संस्कृत, जी आताच्या संस्कृत जाणणार्‍या लोकांनाही फारशी कळत नाही. त्यानुसार ते आह्निक करा, त्यानुसार ती त्रिसंध्या करा, मग त्यानुसार ते सूर्यनमस्कार घाला, त्यानुसार ते सगळं यज्ञकर्म जे आहे ते करा, हे आजच्या काळात शक्य होत नाही. परत त्यामध्ये संस्कृत भाषा जशी वाकवावी, जशी फिरवावी तशी फिरवता येते. कारण कसं कसतं? मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये आपण म्हणतो – ‘राम पिवळा आंबा खातो’ आणि ‘गोपाळ पपई खातो’. हे वाक्य सरळ सरळ येतं. इंग्रजीमध्ये, हिंदीमध्ये तशीच रचना होते. पण संस्कृतमध्ये ‘राम’ शब्द एका टोकाला असेल, पहिला ‘आंबा’ शब्द असेल, मग ‘पपई’ शब्द त्याच्यानंतर दोन शब्दांनी आलेला असेल. आता कोणाला कोणाशी जोडायचं? रामाला आंब्याशी की ह्याला पपईशी, हे ठरवण्याचे नियम आहेत. पण ते नियम आजही अनेकांना माहित नाहीत, किंबहुना जे पंडित म्हणवतात, त्यांनाही माहित नसतात. एकाच शब्दाचे अनेक अर्थ निघतात. मी अनेकवेळा उदाहरण दिलंय की ‘नाग’ शब्द आहे. नाग म्हणजे नाग. ‘कोब्रा’. नाग म्हणजे ‘हत्ती’ आणि नाग म्हणजे ‘जस्त’ – एक धातु. आता कुठेही, अमुक एक व्यक्तीने अमुक एक…बाबा नाग ह्या शब्दापासून अमुक वस्तू बनविली असा उल्लेख असेल तर तिथे ‘जस्त’ हाच अर्थ घ्यायला पाहिजे. पण काही काही वेळेला तो हस्तीदंत म्हणूनही घेतला जातो. मग प्रॉब्लेम होतो. परत गोष्ट कशी आहे की व्याकरण एवढं…थोडंसं कठीण आहे, थोडं नाही बर्‍यापैकी कठीण आहे.

  एक गोष्ट सांगितली जाते, जी मला इथे मुद्दाम सांगाविशी वाटते परत. एक राणी असते जी खूप शिकलेली असते. पण राजा जो असतो, तिचं लग्ग्न झालेलं असतं, तो राजा अतिशय ढ असतो. त्याला संस्कृत अजिबात येत नसतं. बाप राजा म्हणून तो राजा झालेला असतो. एक दिवस तलावामध्ये खेळत असताना…राजस्त्री आणि राजपुरुष सगळे, जलक्रीडा चालू असताना राजा तिच्या अंगावर पाणी उडवतो. राजा पाणी उडवतो, तेव्हा ती म्हणते ‘मोदकेही सिंचयेत’. राणी म्हणते ‘मोदकेही सिंचयेत’. राजा सेवकांना ऑर्डर देतो गुपचुप बोलावून आणि राजाची आज्ञा म्हटल्यावर काय एक ताटभर मोदक येतात. हा मोदक घेऊन राणीला मारायला लागतो. राणीला लाज येते. कारण त्या वाक्याचा अर्थ असतो…‘मोदकेही सिंचयेत’ म्हणजे ‘मा उदकेही सिंचयेत’. ‘मा’ म्हणजे नको. मला पाणी मारू नकोस. आणि राणीची लाज सगळ्यांसमोर जाते…तिच्या माहेरच्या स्त्रिया आलेल्या असतात. त्यांना पण संस्कृत चांगलं येत असतं. तिचा नवरा एवढा ढ आहे हे कळल्यानंतर तिला खूप वाईट वाटतं. तर ‘मा’ म्हणजे नको. पण तेच संधी झाल्यानंतर ‘मोदकेही’ -‘मा उदकेही सिंचयेत’. हे असेच अर्थ निघून आपल्यापर्यंत…ते सुद्धा मुद्दामहून काही काही वेळेला लबाडीने आपल्याला अज्ञानात ठेवतात.

  आजच्या काळामध्ये असं यज्ञ करणं, अमुकवेळा सकाळी उठून ते यज्ञ करणं, त्या यज्ञांचं सत्र चालवणं हे आपल्याला शक्य नसतं. परत आपण खातो ते अन्न किती शुद्ध आहे आपल्याला माहित आहे? अजिबात नाही. आपण घेतो आतमध्ये ती हवा किती शुद्ध आहे – आपल्याला माहिती आहे? अजिबात नाही. आपल्या बाजूचे लोकं कसे आहेत? आपल्याला माहिती आहेत. आपलं मन कसं आहे? आपल्याला माहिती आहे. आणि म्हणूनच ह्या आईच्या आज्ञेनुसार पहिल्यांदा मी तुम्हाला ‘हेल्थ’बद्दल भाषण केलं, समजावून सांगितलं, काय चांगलं खायचं, काय नाही खायचं, अमुक तमुक…तसंच आता सर्वोच्च गोष्ट – ह्या आईची भेट मी तुमच्यापर्यंत आणलेली आहे; ती म्हणजे ‘श्रीश्वासम्’. म्हणजे ‘द हीलिंग कोड ऑफ द युनिव्हर्स’. म्हणजे ‘वैश्विक निरोगीकरणम् गुह्यसूक्तम्’. ‘निरोगीकरणम् गुह्यसूक्तम्’ म्हणजे ‘द हीलिंग कोड ऑफ द युनिव्हर्स’. आणि तो जाणून घ्यायचा आहे आपल्याला, त्याचाच उत्सव आपल्याला साजरा करायचा आहे. तो कसा, काय, आणि त्याच्यामागची भूमिका. मी आज थोडक्यात सगळं सांगू शकतो. सगळं इन डिटेल मी आज सांगायचं म्हटलं तर आपल्याला तीस पस्तीस तास लागतील. ते शक्य नाही. त्यामुळे जेवढं आवश्यक आहे तेवढं मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. आपण त्याच्यामध्ये अनुभवणार आहोत आणि त्यानंतर पहिल्यांदा माझ्या भाषणाची प्रत लोकांना अव्हेलबल होईलच. परंतु ‘श्रीश्वासम्’च्या आधीपर्यंत किंवा त्या दिवसापर्यंत तरी त्याच्यावरची एक छोटी पुस्तिका तयार करून मी स्वत: तुमच्यापर्यंत आणलेली असेल.

  तर लक्षात घ्यायचं की हे विश्व जे आहे, त्या विश्वामध्ये ज्या अर्थी त्या आदिमातेने आणि तिच्या पुत्राने मनुष्य उत्पन्न केला, जीवन उत्पन्न केलं, त्याअर्थी ह्यांचं काय काय आणखी होऊ शकतं हे सगळं त्यांनी बघितलेलं असणार, बरोबर? आई जशी मुलाला शाळेत पाठवणार, त्याच्याबरोबर डबा देते, पाण्याची बाटली देते, एक रुमाल देते, अमुक देते, तमुक देते, ती काळजी जशी तिने घेतलेली असते तशी ह्या मोठ्या आईनेसुद्धा ह्या मानवी जीवांना, आपल्याला सगळ्यांना ह्या पृथ्वीवर, वसुंधरेवर शाळेतच पाठवलेलं आहे. घर आपलं ते आहे. भर्गलोक. भर्गलोकातून आपण ह्या शाळेत आलेलो आहोत. त्या आईने सगळी काळजी घेतलेली आहे, आपल्याला काय काय अडचणी येऊ शकतात त्याची. आपल्याला पहिल्यांदा माहित पाहिजे की ह्याच आपल्या आईला, आदिमातेला जिला आपण माता म्हणतो तिला काही लोकं फक्त शक्ती मानतात, ऊर्जा मानतात. आणि दुसर्‍या बाजूला बघितलं तर तसं खोटं नाहीये. खरं नाहीये पण खोटंही नाहीये पूर्णपणे. तुम्ही मानाल त्याच्यावर आहे. पण ‘आई’ मानणं आणि केवळ शक्ती मानणं ह्यामध्ये खूप फरक आहे. आई मानण्यामध्ये ‘अनकण्डिशनल लव्ह’ आलं. बाळ काही करतं आईसाठी म्हणून आई त्याला दूध पाजत नाही; तिचं बाळ असतं म्हणून ती दूध पाजते. आणि ते आपोआप उत्पन्न होतं. तिला ऑर्डर नाही सोडावी लागत की दूध दे, की औषध नाही घ्यावं लागत. नाही. ते आपोआप उत्पन्न होतं. बाळाची शी जेवता जेवता काढताना सुद्धा तिला जराही घाण वाटत नाही. हे वात्सल्य असतं. तर शक्ती मानलत, की ती फक्त शिक्षिकेच्या भूमिकेत आली. तुमच्या बॉसच्या भूमिकेत आली. आणि मग, ‘जया मनी जैसा भाव, तया तैसा अनुभव’. पण आपल्याला ती आई म्हणूनच हवी कारण तेच तिचं मूळ स्वरूप आहे. तेच तिने सगळं जन्माला घातलेलं विश्व आहे, ह्याचा अर्थ ती विश्वाची माता आहेच. आलं लक्षामध्ये ? ही एनर्जीच, ही ऊर्जाच सगळ्या जगात भरलेली आहे. ह्या विश्वात अनंतकोटी ब्रह्मांडांमध्ये फक्त ऊर्जाच भरलेली आहे. म्हणजे काय? स्पंदनच आहेत. आणि ह्या स्पंदनांमधूनच जगाचा विकास होत गेला. आपल्याला माहिती आहे की निर्गुण निराकार ब्रह्म होतं, त्याला आपण दत्तगुरु म्हणतो. त्याच्यामध्येच ती अदिती म्हणजे अखंड रूपात; मूळ निर्गुण, निराकार रूपापासून अभेद रूपाने, म्हणजे त्याच्यामध्येच राहणारी ती अदिती नावाने होती. जेव्हा त्या परमेश्वराला जाणीव झाली की मी परमेश्वर आहे, ती परमेश्वराची जाणीव गायत्री म्हणून प्रगटली आणि गायत्रीने पहिल्यांदा ध्वनी उत्पन्न केला, बिग बँगमध्ये, कुठला – ॐ म्हणजे प्रणव. त्याच्याचवेळेस ते तीन पुत्र जन्माला आले. बरोबर ? दत्तात्रेय, किरातरुद्र आणि परमात्मा – देवीसिंह. आणि ह्याच्याबरोबर आपण हेही बघितलं की त्रिविक्रम कोण आहे? तर त्या अदिती रूपाचा पुत्र आहे. ती अदिती त्या निर्गुण निराकाराशी संबंधित असली, तरी मानवासाठी ती श्रीविद्या म्हणून प्रगटली – सोळा कलांनी. त्रिविक्रम हा त्या अदितीचा पुत्र आहे म्हणून त्याला ‘आदित्य’ही म्हणतात. आणि तो त्या श्रीविद्येचा पुत्र आहे. असा हा त्रिविक्रम जो आहे, हा आमच्या सगळ्या अरोग्याला, सगळ्या प्रकारची आरोग्य जी आपण वर्णन केली, त्याला बळ देण्यासाठी सदैव तत्पर असतो. आदिमातेची रचना, ही सगळी जी एनर्जी आहे विश्वामध्ये, ह्या आई आदिमातेने केलंय काय, की आधी अन्न आणि मग ते अन्न खाणारा निर्माण केला. कुठलाही प्राणी निर्माण करताना आदिमातेने हे सूक्त सांभाळलं. आधी माणूस निर्माण केला, आधी प्राणी निर्माण केला आणि मग त्याचं खाद्य नाही निर्माण केलं. आधी खाद्य निर्माण केलं. आधी प्राणवायु निर्माण केला. आधी पाणी उत्पन्न केलं, आणि मग त्यांचा आस्वाद घेणारे जीव उत्पन्न केले. त्याच रितीने रोगराई होण्याच्या आधीच तिने सगळी औषधं, तिने सगळ्या काही तयार्‍या करायच्या त्या करून ठेवल्या. आज आपण औषधं निर्माण नाही करत आहोत, औषधांचे शोध लावत आहोत, डिस्कव्हरीज करत आहोत.

  हे हीलिंग कोड आम्ही वापरलं ह्याचा अर्थ आम्ही औषध घेणार नाही का? किंवा ऑपरेशन करून घेणार नाही का कधी काही गरज पडली तर ? असं मुळीच नव्हे. इट इज नॉट द रिप्लेसमेंट कारण ती खूप खालची गोष्ट आहे. ऑपरेशन करणं ही स्थूल पातळीवरची गोष्ट आहे, स्थूल स्तरावरची. डॉक्टरांनी दिलं ते औषध घ्यावच लागेल वेळ पडल्यावरती. ऑपरेशन करावच लागेल. पण त्याला यश मिळणं किंवा न मिळणं, औषधाचा परिणाम होणं किंवा न होणं, आणि उचित डॉक्टर मिळणं, त्याने उचित वेळी ट्रीटमेंट देणं, ती ट्रीटमेंट आपल्याला सोसणं, साइड इफेक्ट न होणं, किंवा धोका न होणं, ह्या सगळ्यासाठी हा हीलिंग कोड आहे, आणि मुख्य म्हणजे ती वेळ येऊच नये म्हणून हा हीलिंग कोड आहे. हा आधी पण आहे, आणि तशी वेळ आल्यानंतर पण आहे. हे आम्हाला कळलं पाहिजे. ही सगळी एनर्जी आहे, त्या एनर्जीमध्ये, आपलं शरीर पण, आज आपल्याला क्वांटम फिजिक्स सांगतं काय आहे ? तर लक्षात घ्यायचं की ही ऊर्जा जी आहे ना, ही ऊर्जा जर सर्वत्र आहे…आता साधी गोष्ट झाली की तुमचा कपडा फाटलेला असेल, तर कपड्यावर प्लास्टिकचं ठिगळ लावून चालेल का ? नाही चालणार. किंवा हिर्‍याचं लावून चालेल काय ? नाही चालणार. कपड्याला कपड्याचच पाहिजे. सोन्याचा तुकडा जोडायचाच झाला भांड्याला तर सोन्याचाच जोडायला पाहिजे. तरच तो एकरूप होणार आहे. मातीचं मडकं घरामध्ये घेतलं आणि त्यामध्ये सोनं टाकलं नंतर, कसं होणार आहे ? तो जोड तिकडच्या तिकडे तुटणार आहे. म्हणजेच काय ? की ज्या प्रकारचा प्रॉब्लेम असतो, त्या प्रकारचाच उपाय लागतो. बरोबर ? नाहीतर आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी. असं होऊन चालत नाही. बरोबर ? आणि म्हणून या आईने, ही सगळी वेगवेगळ्या आजारांना सुद्धा काय ?…तर सगळी गोष्ट फ्रिक्वेन्सी आहे. तुम्ही आणि मी सुद्धा स्पंदनं आहोत. तर त्या स्पंदनांमध्ये बिघाड झाला, शरीरात बिघाड झाला, मनात बिघाड झाला, स्थितीत बिघाड झाला, म्हणजे आपल्या स्पंदनांमध्ये बिघाड झाला. मग त्या स्पंदनांना दुरुस्त करणारी स्पंदनं पण तिने निर्माण करून ठेवलेली असली पाहिजेत. पण ती आम्हाला स्वीकारता येत नाहीत. आणि ती स्वीकारता येत नाहीत, म्हणून आम्हाला ट्रीटमेंट घेता येत नाही. जसं एखाद्या गावामध्ये हॉस्पिटलच नाहीये, तर तो बिचारा काही करू शकत नाही. पैसे आहेत खिशामध्ये, पण त्याला औषध मिळू शकणार नाही. तीच परिस्थिती आमची इथे मोठ्या प्रमाणावर असते. पैशामुळे नव्हे, तर आमच्या अज्ञानामुळे. आमच्यापर्यंत योग्य ज्ञान पुरविलेलं नसल्यामुळे. कारण नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची की लोकांना अज्ञानात ठेवलं की त्यांच्यावर सत्ता गाजवता येते. अनेकांना, जाणकार असतात त्यांना भय वाटतं की मी ह्यांच्यासमोर सगळं उघडं केलं, तर मला विचारणार कोण ? काही विचारण्याची आवश्यकता नाही. प्रत्येकाचं भलं होणं ही त्या आईची इच्छा आहे. तिने कशावर स्टॅम्प मारलाय का ? नाही. मग आम्ही माणसांनी का म्हणून मारावा ? तिचा पुत्र कधी स्टॅम्प मारतोय का ? नाही मारत. आज ह्या भावनेने मला बघायचं आहे की हे काय कसं घडतं ? आणि हा ‘श्रीश्वासम्’ आपल्यापर्यंत कसा येऊन पोहोचतो ? व आपल्याला कसा घ्यायचाय?

  तर ह्या ‘श्रीश्वासम्’ने काय होतं ? हे आपल्याला बघायचंय. तर ह्या ‘श्रीश्वासम्’चं जे काही असणार आहे ते मी शेवटी सगळ्यात सगळं समजावून सांगणार आहे. पण ह्याने काय होतं ? तर जे लिहीतायेत ते नीट लिहून घ्या. काय काय गोष्टी…तर 12 गोष्टींवर उपाय होतो लक्षात ठेवा. 12 मार्गांनी 12 गोष्टींवर उपाय होतो. कारण 12 आदित्य आहेत. आणि मी काय म्हटलं ? हा त्रिविक्रम ह्या अदितीचा पुत्र असल्याने आदित्यच आहे. आदित्य म्हणजे केवळ सूर्य ह्या नावाने नव्हे. सूर्याचं आदित्य हे एक नाव आहे, पण आदित्य म्हणजे सूर्य नव्हे. आदित्य म्हणजे अदितीचा पुत्र. म्हणजे मूळ रूपाचा पुत्र; आदिमातेच्या. तर ह्याने काय चांगलं होतं ? तर

Dis-ease (म्हणजे व्यधी, सर्व प्रकारच्या व्याधी) Dis-comfort (म्हणजे पीडा, सर्व प्रकारच्या पीडा दूर करण्याचं सामर्थ्य ह्या गुह्यसूक्तामध्ये आहे, ह्या हीलिंग कोडमध्ये आहे.) Dis-couragement (म्हणजे निराशा, उत्साहभंग, साहसहीनता, ह्यांचा नाश होऊ शकतो ह्याने) Des-pair (म्हणजे नाउमेद होणे, किंवा भग्नाशा, आशेचा पूर्ण नाश झालेला असतो) Depression (म्हणजे खिन्नता, न्यूनता, मंदी, किंवा उदासपणा, औदासीन्य नाही – उदासपणा) Fear (म्हणजे भय) Weakness (म्हणजे दुर्बलता, हे केवळ शारीरिक Weakness नाही, सगळ्या प्रकारचा Weakness लक्षात ठेवा) Deficiency (म्हणजे कमतरता, आपण म्हणतो ना की त्याच्यामध्ये विटॅमिन Deficiency झालेली आहे, म्हणजे विटॅमिनची कमतरता आहे, ही दुरुस्त केली जाऊ शकते) Unrest & Trouble (म्हणजे अशांती आणि त्रास, हे दोघेही जुळे आहेत, हे एकत्रच असतात) Grief (म्हणजे शोक) Conflict (म्हणजे संघर्ष) Feebleness (म्हणजे कमकुवतपणा)

  आणि ह्या सगळ्या…ह्याच्यासाठी हीलिंग आहे ते आपल्या ह्या गुह्यसूक्तामधून प्रत्येकाला मिळू शकणार आहे लक्षात ठेवा. ह्या गुह्यसूक्तामधून प्रत्येकाला मिळणार आहे. जो वापरू इच्छिल त्याला. मग हे कसं मिळू शकेल हे आपल्याला आता बघायचय. ह्यातून काय मिळतं हे आपण बघितलं. आता हे कसं मिळणार हे आपल्याला बघायला हवं. तर पहिल्यांदा आपल्याला बघायला पाहिजे की आदिमातेची शक्ती, ऊर्जा ह्या विश्वातील प्रत्येक…हवेमध्ये, प्रत्येक पदार्थामध्ये, औषधामध्ये, कृतीमध्ये, विचारांमध्ये जी भरलेली आहे, ती जी हीलिंग पॉवर जी आहे, तिला आपण म्हणतो ‘अरुला’. ही हीलिंग पॉवर म्हणजे ‘अरुला’. Arula. ‘अरुल’ हा तमीळ भाषेत शब्द आहे. पण त्याचाही अर्थ तोच आहे – ‘Grace’. ‘अरुला’ म्हणजे Grace संध्या भाषेमध्ये. ही संस्कृतच्या आधी बोलली जाणारी भाषा होती जी आज फक्त हिमालयन योगी बोलतात. ‘अरुला’ म्हणजे ‘द हीलिंग पॉवर’. तर ही जी आहे ती आपल्याकडे येते कशी ? तर ही आईनेच निर्माण केलेली आहे. परंतु ही पॉवर, ही हीलिंग पॉवर जी आहे, ही हीलिंग ऊर्जा जी आहे, जी निरोगीकरण ऊर्जा आहे, ती ऊर्जा मानवाला हनुमंताकडून प्राप्त होते, महाप्राणाकडून. म्हणजे आईने उत्पन्न केलेली ही ऊर्जा, आदिमातेने, तिचा जो ज्येष्ठ पुत्र महाप्राण आहे, म्हणजे हनुमंत, तोच फक्त आपल्या शरीराची सप्तचक्र आहेत, त्या सप्तचक्रांना पुरवु शकतो. म्हणजे आपल्याला एक कळलं की वातावरणात सर्वत्र ही हीलिंग पॉवर आहे. ‘अरुला’ आहे. पण ती आपल्या शरीरामध्ये आणून सोडायचं काम कोण करू शकतो – हनुमंत म्हणजे महाप्राण. आणि आपल्या सप्तचक्रांमध्ये जिथे आवश्यक आहे तिथे; सातही चक्रांना आवश्यक आहे, की एकाला कमी आवश्यक आहे, की एकाला जास्त आवश्यक आहे, हे सगळं तो हनुमंत जाणतो नीट. महाप्राण आहे तो. ओके ? हनुमंताबद्दल वचनच काय सांगितलं आहे आपल्याला ? सुंदरकांडमध्ये ? ‘उमा न कछु कपि कै अधिकाई, रामदूत जो कालही खाई’. शिवशंकरच स्वत: सांगतात उमेला की ‘‘उमे ह्या हनुमंताचं काही खरं नाही. ह्याची ताकद एवढी आहे, की हा काळाला पण खाऊ शकतो’’. ‘काळाग्नी काळरुद्राग्नी देखता कापती भये, ब्रह्मांडा भोवते वेढे वज्रपुच्छे करू शके, तयासी तुळणा कैची ब्रह्मांडी पाहता नसे’. असा हा हनुमंत. मग ब्रह्मांडाभोवती त्याच्या शेपटाचं टोक जर फेर्‍या मारू शकतं, तर आपली सात चक्र काय मोठी आहेत ? ती हीलिंग पॉवर तो बाहेरच्या वातावरणातून, सगळ्या अगदी, अखिल ब्रह्मांडातून जिकडून जिकडून आवश्यक आहे, तार्‍यांमधून, ग्रहांमधून, वनस्पतींमधून, भूगर्भातून, नद्यांतून, सागरांतून, वनातून, कुठूनही ! ती सगळी एनर्जी आकर्षण करून घेऊन ऊर्जा आपल्या सप्तचक्रांमध्ये आणून सोडायचं काम कोण करतो ? हनुमंत करतो, लक्षात ठेवा. म्हणजे हनुमंत हा त्या ऊर्जेचा प्रवाह आहे लक्षात ठेवा. आईच्या ऊर्जेचा प्रवाह आहे. हा महाप्राण म्हणजे काय आहे ? आईच्या शुभ ऊर्जेचा प्रवाह आहे. आईची ऊर्जा शुभच आहे. पण आईच्या ऊर्जेचा शुभ प्रवाह. शुभ ऊर्जेचा म्हणण्यापेक्षा आईच्या ऊर्जेचा शुभ प्रवाह, म्हणजे हे आपल्यासाठी ह्या ठिकाणी, म्हणजे हनुमंत. बरोबर ? आणि मग ? एकदा ह्या सप्तचक्रांमध्ये आल्यानंतर आपल्या शरीरामध्ये तो ठिकठिकाणी जिथे आजार आहे, जिथे व्याधी आहे, जिथे प्रॉब्लेम आहे, तिथे नीट पोहोचविण्याचं काम आपल्या शरीराच्या नाड्या करतात. आपल्या शरीरामध्ये 72000 नाड्या आहेत. नाड्या म्हणजे ब्लड वेसल्स नाहीत. नाड्या म्हणजे नर्व्हज. तर त्यांच्यामध्ये…कारण एरव्ही आपण नाडी म्हणजे पल्स ह्या अर्थाने घेतो, इथे संस्कृतमध्ये, वेदांमध्ये नाडी ही नर्व्हजच्या अर्थाने घेतलेली आहे. नर्व्हज – पेशी म्हणजे ब्रेन सेल्स – ह्या कमीतकमी 72000 आहेत – प्रमुख. तर त्यांच्यामधूनच हे वाहिलं जाणार ना ? एनर्जी सगळी. एनर्जी काही अन्ननलिकेतून जाणार नाही की रक्तवाहिनीतून जाणार नाही. मग ती एनर्जी वाहून नेण्याचं काम हा त्रिविक्रम करतो. एकदा हनुमंताने शरीरात आणली की त्या अरुलेला हा त्रिविक्रम, आपल्या योग्य जागी, योग्य पेशींमध्ये, योग्य प्रमाणात पुरवायचं काम, आणि त्या त्या चक्राशी, त्या त्या इंद्रीयाला जोडून देण्याचं काम, त्या त्या आपल्या बाह्य परिस्थितीला सुद्धा त्याच्यातून जोडून देण्याचं काम हा त्रिविक्रम करतो. आणि म्हणूनच त्याला ‘शुभ स्पंदनं वाहक प्रणेता’ म्हणतात. ओके ? आणि हे काम तो कसं करतो ? तर आता आपल्याला बघायचय.

  आईचं दर्शन सगळ्यांनी घेतलेलंच आहे. किती छान दिसतेय बघा. हे रूप कधी विसरू नका राजांनो. सदैव तिचा चेहरा डोळ्यासमोर आठवायचा, डोळे डोळ्यासमोर आठवायचे की सगळं कसं छान होतं. पहिली स्लाइड दाखवा. आपला हात आहे ना हा हात. हातामध्ये बघा सगळ्यांना माहिती आहे पंचमहाभूतं आहेत. बरोबर ? तर प्रत्येक बोट आहे ना, उजव्या असो की डावा हात असो, हे प्रत्येक बोट कुठल्या महाभूताशी जोडलेलं आहे हे आपल्याला कळेल. करंगळी जी आहे ती जल महाभूताशी जोडलेली आहे. नंतर रिंग फिंगर जे आहे, म्हणजे अंगुष्ठिका ती पृथ्वीतत्वाशी जोडलेली आहे. मध्यमा म्हणजे मधलं बोट आकाशतत्वाशी जोडलेलं आहे. इंडेक्स फिंगर वायुतत्वाशी जोडलेलं आहे. तर आपला अंगठा म्हणजे थंब हा अग्नीतत्वाशी जोडलेला आहे. ह्याचा अर्थ काय ? तर ह्याचा संबंध काहीतरी आहे ह्या तत्वांशी. ह्या गोष्टींचं मीलन घडवून आणणं हे काय असतं ? हेही आपल्याला पुढे बघायचय. सध्या फक्त एवढंच बघायचय.

  नेक्स्ट…चक्रघटक. तर मूलाधार चक्राचा संबंध कुठल्या महाभूताशी आहे ? पृथ्वी महाभूताशी. आणि तिकडचा राक्षस कुठला ? तिकडे येऊन त्या चक्राचं आरोग्य बिघडवणारी वस्तू कुठली ? तर भय. मी त्याला राक्षस म्हटलं म्हणजे ती त्रास देणारी गोष्ट ह्या अर्थाने. राक्षस म्हणजे खरा राक्षस रावणासारखा समजू नका. मूलाधार चक्रामध्ये द्रव्य पृथ्वी आहे…एलिमेंट…तत्व पृथ्वी आहे आणि तिकडे बिघाड कशामुळे उत्पन्न होतो ? भयामुळे. स्वाधिष्ठान चक्रामध्ये द्रव्य जल आहे. ओके ? आणि तिकडे राक्षस कुठला आहे ? गिल्ट…म्हणजे अपराधीपणाची भावना. अपराधीपणाच्या भावनेमध्ये स्वाधीष्ठान चक्राची वाट लागते. आलं लक्षामध्ये ? नंतर मणिपूर चक्र. म्हणजे परावाणीचं स्थान, आईचं स्थान. त्याचं द्रव्य आहे अग्नी. तिकडे वाट कशाने लागते ? तर अप्रतिष्ठा, शरम, लांछन. ओके ? म्हणजे शेम ज्याला आपण म्हणतो. त्या अप्रतिष्ठेने, शरमेने, लांछनामुळे मणिपूर चक्रामध्ये बिघाड उत्पन्न होतो. अनाहत चक्रामध्ये वायुतत्व आहे. तिथे कशाने प्रॉब्लेम होतो ? तर शोकाने आणि दु:खाने अनाहत चक्र बिघडतं. विशुद्ध चक्र जे इथे आहे, त्याचं द्रव्य आहे ध्वनी. देवाशी असत्य बोलल्यामुळे विशुद्ध चक्र खराब होतं. आणि विशुद्ध चक्र जे आहे, हे विशुद्ध चक्र माणसाच्या सगळ्या हेल्थचं प्रमुख गोष्ट आहे लक्षात ठेवा. म्हणून मी कायम सांगतो की कोणाशीही खोटं बोला पण देवाशी कधी खोटं बोलू नका. हेही सांगितलेलं आहे की तुम्ही उद्या समजा दररोज रामाला भेटताय, राम लक्ष्मण आहेत तुम्हाला. रामाला भेटताय आणि मग रामाच्या फोटोसमोर सांगाल, तर मग डॅट इज गलत. ही पळवाट झाली. आणि मुख्य म्हणजे काय ? की बर्‍याच ठिकाणी माणसाला काय असतं ? चोरी पकडल्याचा, ती चूक पकडली गेल्याचं दु:ख असतं. तसं नसलं पाहिजे. चूक केल्याचं दु:ख असलं पाहिजे. पण मी नव्याण्णव टक्के वेळा बघतो की माणसाला चूक केल्याचं दु:ख कधीच नसतं, उलट चूक लपवायलाच बघत असतो तो सगळ्यांपासून, देवापासून सुद्धा. नाही, नाही, माझा काही हातच नाही म्हणून सांगून टाकतो. अरे कोणाला सांगताय तुम्ही ? तुमच्या मनाला सांगताय, पण तुमचं मन शेवटी तो नीट जाणतो लक्षात ठेवा. असत्य म्हणजे सामान्य माणसांशी तुम्ही काय बोलता ते नव्हे, तर देवाशी तुम्ही जे खोटारडेपणाने वागता, ते असत्य इकडे विशुद्ध चक्राची हानी करतं. आणि मग आजुबाजूचा प्रत्येक जण तुमचा शत्रू बनल्यासारखा होतो. मग तुमचा मित्रही शत्रू बनतो, तुमचा शेजारीही शत्रू बनतो, तुमच्या ऑफिसमधले पण शत्रू बनतात, तुमचे नातेवाईक पण, आप्त पण शत्रू बनतात, तुमचं शरीरपण शत्रू बनतं. म्हणजे तुमच्या शरीरातले घटक ज्याला म्हणतो आपण ‘ऑटो इम्युन डिसॉर्डर्स्’. म्हणजे स्वत:चं शरीर स्वत:च्या शरीराला खायला लागतं. ते सुद्धा ह्याच्यामधूनच उद्भवतात, विशुद्ध चक्र खराब झाल्यामुळे. त्यानंतर आज्ञा चक्र, म्हणजे त्याचं द्रव्य आहे प्रकाश. आणि इकडे कुठला राक्षस काम करतो ? तर भ्रम. आम्ही भ्रमात राहतो…अरे मी काय पण करू शकतो यार. आपल्याला काय देवाबिवाची गरज नाही. वाईट वागलं तरी काय बिघडतं ? काही बिघडत नाही. मी केलेलं देवाला कळलेलं नाही. देवाला काय कळतय ? ह्या ज्या सगळ्या हायर लेव्हलच्या गोष्टी आहेत. ह्या म्हणजे आज्ञाचक्राचा राडा करणार्‍या गोष्टी आहेत सगळ्या. आणि आज्ञाचक्र तुमचं अभ्युदय करणारं चक्र आहे. सगळ्या प्रकारचे विकास थांबतात…एका क्षणामध्ये. त्यानंतर सहस्त्रार चक्र जिकडे द्रव्य आहे भाव. भाव तोचि देव. आणि तिकडे राक्षस कुठला ? तर आसक्ती. म्हणजे देवाची मूर्ती घरात आणलेली आहे गणपतीची आणि मला जाऊन फिश खाऊन गुपचुप यायचय, कोणाला कळतय ? घरात नाही शिजवलं म्हणजे झालं. ही जी गोष्ट आहे ना, ती गोष्ट आसक्ती आहे. दारू प्यायची नाही बापूंनी सांगितलय तरी दारू प्यायची. ही आसक्ती आहे. आलं लक्षामध्ये ? ही आसक्ती वाईट आहे. गोड खावसं वाटतं, चांगलं आहे. पण वजन 400 किलो झालेलं आहे तरी गोड 40 किलो खातोय आणि मग ते 500 किलोचं करणं ही आसक्ती आहे. बरोबर ? बापूंनी सांगितलय आठ आठ तास झोपून पडू नका, ते चांगलं नाही, तरी त्या बिछान्याची आसक्ती आहे. ती सोडायला हवी. आलं लक्षामध्ये?

  तर ही चक्र जी आहेत ती आपलं सगळं आरोग्य सांभाळतात. ह्या चक्रांमध्येच तो हनुमंत येतो. आणि हनुमंताची ती ऊर्जा तिकडे आली की त्या त्या राक्षसाचा नाश होतो. ज्या ज्या चक्रावर राक्षसाने हल्ला केलेला आहे, त्याचा नाश होतो. मग तिकडून ती एनर्जी रिलिज होते, ती त्रिविक्रम घेऊन जो पार्ट आजारी झालेला आहे, शरीराचा, तुमच्या प्रभामंडलाचा किंवा जीवनाचा तिकडे नेऊन पोहोचवण्याचं काम तो त्रिविक्रम करतो. नेक्स्ट स्लाइड. ही सप्तचक्र आहेत. हे नुसतं बघा. नेक्स्ट स्लाइड. हे सहस्त्रारचक्र आहे. नेक्स्ट. हे आज्ञाचक्र आहे ज्याचं बीज ‘उँ’ बीज आहे. त्यानंतर ‘हँ’ म्हणजे विशुद्ध चक्र आहे. नेक्स्ट. त्यानंतर अनाहत चक्र आहे. त्यानंतर मणिपूर चक्र आहे. नेक्स्ट. ‘रँ’ बीज आहे त्याचं. ‘रँ’ म्हणजे अग्नी बीज मणिपूराचं. त्यानंतर ‘वँ’ हे स्वाधीष्ठान चक्र आहे म्हणजे जलाशी संबंधित चक्र आहे. आणि ‘लँ’ हे पृथ्वीतत्वाशी निगडित चक्र आहे.

  ही जी सप्तचक्र आहेत, ती आपण थोडक्यात बघितली. बुकलेटमध्ये तुम्हाला सगळं मिळेल. आपल्या ग्रंथामध्ये मी सगळी चक्र नीट समजावून सांगितलेली आहेत. तर आपल्याला कळलं पाहिजे की आईने ही ऊर्जा जी विश्वात भरून ठेवलेली आहे, त्यातील शुभ ऊर्जेचा प्रवाह जो आहे, तो हनुमंत महाप्राण आपल्या शरीरामध्ये येतो. तो कसा येणार ? आपलं हे जे सूक्त आहे, म्हणजे हीलिंग कोड आहे, ‘श्रीश्वासम्’ आहे, ते ‘श्रीश्वासम्’ करताना आपोआप, तो हनुमंत म्हणजे शक्तीचा शुभ प्रवाह, आलं लक्षामध्ये, म्हणजे हीलिंग पॉवर आपल्या सप्तचक्रांमध्ये येणार, तिकडच्या राक्षसाचा नाश करणार, की लगेच तो त्रिविक्रम उठणार आणि मग बाकी मग तिच्या आड जी पिशाच्च वगैरे सगळी येतील, म्हणजे जे काही दुर्गुण आहेत तिकडे, पिशाच्च म्हणजे भूतं नाही समजायचं लक्षात ठेवा, तर ज्या काही वाईट गोष्टी आड येतील, त्या त्या इंद्रीयांमधल्या, मग त्यांना कधी नाव कॅन्सर असेल, त्यांना नाव कधी हार्ट डेसीज असेल, त्यांना नाव कधी सिरॉसिस असेल, किंवा त्यांना नाव कधी दारिद्र्य असेल, त्यांना नाव कधी नपुसंकत्व असेल, किंवा त्यांना नाव कधी अशक्तपणा असेल, किंवा त्यांना नाव कधी वेड लागणं असेल, किंवा टेंशन येणं असेल, काही असेल, त्याचा नाश करण्याचं काम हा त्रिविक्रम त्याच्या ‘अरुला’ शक्तीने करतो. आलं लक्षामध्ये ? आणि त्यासाठी ह्या त्रिविक्रमाला आणि हनुमंताला येण्यासाठी आपल्याकडे जी ताकद लागते, हनुमंताला आवाहन करण्याची ती वैदिक मंत्रांमधून येते, यज्ञांमधून येते. पण आम्हाला असे यज्ञ सतत करणं, ते नियम पाळणं, तेवढा वेळ आजच्या युगात शक्य नाही. बरोबर ? आणि म्हणून हे गुह्यसूक्तम् आपण बनवलेलं आहे, ते गुह्यसूक्तम् एका सीडीमध्ये असणार. ती सीडी किंवा कॅसेट जे काही असेल ते, किंवा दोन्ही असेल. तर ते आपण ऐकताना, ते गुह्यसूक्त ऐकताना, शांतपणे मात्र, असं कोणी फिशमार्केटमध्ये चाललंय आणि कोणी बाजारभाव करतंय, आणि कानाने ऐकतंय त्याचा उल्लेख, काही फायदा नाही. किंवा नवरा बायको भांडताहेत आणि लावताय, त्याचा काही उपयोग नाही. तेवढा वेळ, अगदी छोटासा वेळ आहे, जास्त वेळ नाही. ते ऐकताना डोळे बंद करून, शांतपणे; तुम्ही मांडी घालून बसा, खुर्चीत बसा, पलंगावर पडलेले असा, किंवा आजारी असल्यामुळे हॉस्पिटलमध्ये असा कोणी मनुष्य, काही हरकत नाही. पण ते केवळ ऐकताना तुम्ही, जो श्वासोच्छवास आपोआप होईल…तुम्हाला मुद्दाम श्वास, दीर्घ श्वसन करा, एक नाकपुडी बंद करा, मग दुसरी नाकपुडी बंद करा, मग असा गच्च धरून ठेवा, असं काही करायचं नाहीये. तर ते गुह्यसूक्तम् ऐकत असताना, तुमचा जो श्वासोच्छवास आपोआप होईल, त्याच्या वाटे आपोआप ह्या हनुमंताचा शुभ ऊर्जा प्रवाह आत शिरून, सप्तचक्रांमध्ये जिकडे पाहिजे तिकडे व्यवस्थित पोहोचणार आहे, तिकडे पोहोचल्या पोहोचल्या, त्या सूक्तामधल्या दुसर्‍या दोन ओळींनी काय होणार आहे ? तो त्रिविक्रम त्यांना सगळ्यांना घेऊन जाणार आहे. एवढी ताकद ह्या गुह्यसूक्तामध्ये आहे. आलं लक्षामध्ये ? अरे जोरात तरी टाळ्या वाजवा. आता तुम्ही म्हणाल बापू एवढी ह्या गुह्यसूक्तामध्ये ताकद का ? केवळ तुम्ही म्हणता म्हणून ? नाही. मी कोण ? मी आधीच म्हटलंय, ग्रंथामध्ये स्पष्ट सांगून ठेवलंय. मी कोणाचाही अवतार नाही. मला चमत्कार करता येत नाहीत. आलं लक्षामध्ये ? बघा मला पण तुमच्यासारखे दोन हात, दोन पाय, बाकी काय ? सगळं चष्माबिष्मा सगळं काही आहे. बरोबर?

  तर महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची की आपण फक्त थोडंसं विचार करूया की व्हाय शुड दे डू इट फॉर अस ? ती आदिमाता, तो हनुमंत, तो त्रिविक्रम, ती त्याची हीलिंग पॉवर ‘अरुला’, ती अनपगामिनी लक्ष्मी, तो महाविष्णु, तो परमशिव, ती अन्नपूर्णा, तो प्रजापति ब्रह्मा, ती सरस्वती, तो किरातरुद्र, ती शिवगंगागौरी, ह्या सगळ्यांना काय गरज पडली आहे आमच्यासाठी एवढ्या सोपं होऊन येण्याची ? ते सोपेच आहेत. त्यांना अनेक दांभिकांनी कठिण करून ठेवलेलं आहे आणि आम्ही आमच्या मूर्खपणाने कठिण करतो. बघा साईबाबांनी आपल्याला सांगितलय ना ? ‘कृतांताच्या दाढेतून, काढीन निजभक्ता ओढून’. कृतांत म्हणजे काळमृत्यु. ‘कृतांताच्या दाढेतून, काढीन निजभक्ता ओढून, करिता मत्कथांचे श्रवण, रोग निरसन होईल’. बाबांचा शब्द खोटा आहे का ? बाबा खोटारडा आहे का माझा ? नाही. मग मी खोटारडा असलो पाहिजे. मी म्हणजे जो मनुष्य आहे तो. की बाबांचे वचन एक तर मला माहित नाही, योग्य वेळी आठवत नाही, किंवा आठवलं तरी माझा त्याच्यावर विश्वास नसतो. आणि तिकडेच आपल्या साईसच्चरितातल्या काही ओव्या हेमाडपंतांनी ज्या दिल्यात, त्या अतिशय उपयोगाच्या आहेत, अतिशय, अतिशय उपयोगाच्या आहेत. आणि त्या कुठल्या ?

1) केवळ बाबांचा शब्द प्रमाण । तेचि औषध रामबाण । एकदा कृष्ण श्वान भक्षिता दध्योदन । जाहले निवारण हिमज्वराचे । 2) जुलाबावर हे काय औषध । परी औषध तो संतांचा शब्द । देतील तो जो मानी प्रसाद । तया न अगद आणीक । पण ते कोणासाठी ? तर जो मानील की ह्या साईचा शब्द हेच औषध आहे. गॉड्स वर्ड हील्स. देवाचा शब्दच तुम्हाला निरोगी करत असतो. 3) सांधे धरले शरीराचे । स्थळ ते वार्‍यापाऊसाचे । ओल तो तेथे ऐशापरीचे । औषध बाबांचे वचन की। दोघांच्या गोष्टींमध्ये ह्या अशा ओव्या येतात. भीमाजी पाटीलाच्या आणि अमीर शक्करच्या. ओले तो तेथे ऐशा परिचे – सांधे धरले असताना ओल्या जमिनीवर राहणं म्हणजे नक्कीच सांधे धरणार. परि औषध बाबांचे वचन – येस्स. 4) तुम्ही जोर काढू लागा । दुधाची काळजी सर्वस्वी त्यागा । वाटी घेऊनि उभाच मी मागा । पृष्ठभागा आहे की । पण तुम्ही म्हणाला, आमची इच्छा काय असते ? बाबांनी जोर मारावे आणि मी दूध प्यावं. ते होणार नाही. 5) ‘साई साई’ नित्य म्हणाल । सात समुद्र करीन न्याहाल । हे सात समुद्र म्हणजे काय ? ही सप्तचक्र लक्षात ठेवा. हीच आपल्याला क्रॉस करण्यास सात समुद्रांसारखी कठीण असतात. ‘साई साई’ नित्य म्हणाल । सात समुद्र करीन न्याहाल । या बोला विश्वास ठेवाल । पावाल कल्याण निश्चयें ।

  अरे काय स्ट्राँगली माझा बाबा सांगतोय सांगा मला आपला. मग हे शब्द आम्हाला का नाही आठवत ? पहिल्यांदा भीती का आठवते आम्हाला ? काही झालं…साधी मुलगी प्रेग्नन्सी…डेलिव्हरी झाली तरी पहिल्यांदा भीती ! अरे हे शब्द आठवा ना ! हे माझ्या देवाचे शब्द आहेत. आणि देवाचा शब्द खोटा असेल तर तो देवच नाही. बाबाचे शब्द खोटे असू शकत नाही. ते खोटे ठरले ह्याचा अर्थ माझं काहीतरी चुकतंय. आम्हाला त्या चुकांच्या वर उठायचंय आता. किती चुका केल्या आयुष्यामध्ये ? भरपूर केल्या. आता थांबूया कुठेतरी. लेट अस स्टॉप इट. आपण विश्वास ठेवायला शिकूयात. मी तुम्हाला काय म्हटलं ? यु आर नॉट जज्ड बाय युअर परफॉर्मन्स, यु आर ऑलव्हेज बिइंग जज्ड बाय युअर फेथ. तुमचा विश्वास. पण इथे विश्वासावर मला नीट सांगायचय. बघा समजा, आपला समजा एक X नावाचा देश आहे आणि एक Y नावाचा देश आहे. दोघांची मैत्री आहे. आपल्या X नावाच्या देशाचा Z नावाचा मित्र आहे आणि आपलं एक B नावाच्या देशाशी वैर आहे. तर B ची सेना चालून येतेय म्हटल्यावर X नावाच्या आपल्या देशाला विश्वास वाटतो, फेथ आहे की माझा जो मित्र Z देश आहे, तो सैनिक पाठवणारच आहे. हा फेथ झाला. पण जेव्हा तो Z चा प्राइममिनिस्टर फोन करून सांगतो की मी सैन्य पाठवलेलं आहे, माझे गुप्तचर माहिती देतात की सैन्य निघालेलं आहे, येऊन पोहोचतय, त्याला काय म्हणतात ? हा विश्वास नाही झाला आता. विश्वासाच्या पलिकडे विश्वास खरा ठरला. म्हणजे ‘ज्ञान’. ज्ञान म्हणजे वेद म्हणतात ती काही मोठी गोष्ट नाही. मला जो विश्वासा वाटतो ते खरं आहे ह्याची माहिती घेणं, ह्याचा अनुभव घेणं म्हणजे ज्ञान. माझा मित्र मला मदत करील हा विश्वास, हा फेथ. पण माझ्या मित्राने मदत पाठवली आहे हे ज्ञान. माझा देव माझ्या पाठीशी उभाच आहे चोहो बाजूला हा विश्वास, पण त्याच्या विषयी खात्री असणं, की तो निघालाच आहे येण्यासाठी चारी बाजूंनी, तो उभा आहेच, आणि वेळ पडल्यावर तो इंटरफियर करणारच आहे, हे ज्ञान. ज्ञान म्हणजे मोठं ब्रह्मज्ञान वगैरे काही नाही. ते गुंडाळून ठेवा. काडी लावून चुलीत जाळण्याच्या पण लायकीची नसते ती गोष्ट. आलं लक्षामध्ये ? ज्यांना मिळवायचं असेल त्यांनी जरूर त्यांचं पांडित्य मिळवावं. मला काही समजत नाही. सगळ्या पंडितांना माझा नमस्कार आहे. आम्ही साधी माणसं. आम्हाला आमचं जीवन सुखी करायचय साधं. पटतय ? त्यामुळे…फेथ पाहिजेच. यु आर जज्ड बाय युअर फेथ, नॉट बाय युअर परफॉर्मन्स. पण तो फेथ सुद्धा कसा असला पाहिजे ? खणखणीत फेथ. करील देव मदत…असं नाही. मला देव मदत करतोच आहे. मला कळत नसेल, पण करतोच आहे हे ज्ञान. आणि दररोज तुम्ही अनुभवत राहिलात ना की त्याने मला आज कुठे कुठे मदत केली की हे नॉलेज-ज्ञान. हा फेथच तुमचं नॉलेज बनेल की देव मदत करतोच. हे नॉलेज आपल्याला मिळवायला पाहिजे. कारण तो तुम्हाला मदत करण्यासाठी आतुरच आहे, गीतेमध्ये काय सांगितलय कृष्णाने, ‘अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जना: पर्युपासते, तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमम् वहाम्यहम्’.

  मीच सर्वकाही आहे असं मानून माझी जो प्रेमपूर्वक भक्ती करतो, अमुक मोठी भक्ती करतो, छोटी करतो भक्ती म्हटलेलं नाहीये, 108 जप करतो की 24 वेळा करतो म्हटलेलं नाहीये. ‘अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जना: पर्युपासते, तेषां नित्याभियुक्तानां…नित्य…मी नित्य त्यांच्या सगळ्या गोष्टींचं रक्षण करीत राहतो…आय गो ऑन क्युरिंग देम कन्टिन्युअस्ली…येस आय अ‍ॅम देअर…आय अ‍ॅम देअर डॉक्टर फॉर एव्हर…आणि हेच शब्द कोणाचे आहेत ? श्रीस्वामीसमर्थांचे आहेत. देहत्याग करतेवेळी शेवटचे…हाच श्लोक त्यांनी पण उच्चारलेला आहे…‘अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जना: पर्युपासते, तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमम् वहाम्यहम्’. बरोबर ? साईबाबांनी तेच सांगितलय. स्वामीसमर्थ तेच सांगताहेत, भगवान कृष्ण आपल्याला तेच सांगतोय. त्यांनी ही ग्वाही कोणा तपश्चर्याला दिली आहे का ? कुठल्या तपस्व्याने तपश्चर्या केल्यांनतर हे शब्द त्यांच्या तोंडून बाहेर आले आहेत का ? नाही. तुमच्या माझ्या सारख्या सामान्य माणसासाठी ते आलेले आहेत. आणि देव कधीही बदलत नाही हे आम्हाला माहित पाहिजे. जर देव सत्ययुगात तसा होता, द्वापारयुगात तसा होता, त्रेतायुगात तसा होता, तर आज कलियुगात तो तसाच असणार आहे, आणि तसाच आहे ह्याची मला खात्री हवी. जर साईबाबांनी मोठमोठ्या आजारांतून इतर भक्तांना बाहेर काढलं, दारिद्र्यातून बाहेर काढलं, दुर्बलतेतून बाहेर काढलं, मग मला का नाही काढणार ? मी काय सावत्र आहे का त्यांचा ? हा विचार केला पाहिजे. दत्तबावनी आपण म्हणतो ना. त्या दत्तमहाराजांनी किती जणांवर कृपा केली आहे ? बरोबर ? ‘वंध्या भेंस दुझवी देव’. ती म्हैस म्हातारी झाली होती. दूध देत नव्हती, तिला बाळं पण होत नव्हती. तरी तिला दूध फोडलं ना त्यांनी ! बरोबर ? हे लक्षात ठेवलं पाहिजे आम्हाला, म्हणून आम्हाला पटलं पाहिजे की देव आमच्याकडून काहीतरी घेईल, आम्ही त्याला काहीतरी देऊ आणि त्याच्या बदल्यात आम्हाला परत मिळेल असं नाहीये. तो द्यायला दोन्ही हातांनी तयार आहे. आणि जसा तो सत्ययुगात देत होता, त्रेतायुगात देत होता, द्वापारयुगात देत होता, तसा तो कलियुगात आत्ताही मला देणार आहे, हा विश्वास पाहिजे. फर्स्ट स्टार्ट बिलिव्हिंग हिम…की तो मला काय देऊ शकत नाही ? तो मला सगळं देऊ शकतो. फक्त उचित वेळ आणि उचित साधनं त्याला माहिती आहेत, मला माहित नसतं.

  तुम्हाला खरंच सांगतो. एकदा घडलेली गोष्ट आहे. एका पेशंटला ओळखीच्या, त्याचा हात दुखत होता, म्हटलं वॉलिनी लाव. दुसर्‍या दिवशी मी आणि सुचितदादा कन्सल्टिंगला चाललो होतो. तर त्याची बायको भेटली. ‘‘काय डॉक्टरांनु तुम्ही दिलत औषध हाताला इकडे लावायला, ताबडतोब दुखायचं बंद झालं. आज सकाळी त्यांच्या पाइल्स दुखायला लागल्या. त्यांना म्हटलं लावा जा’’. म्हटलं ‘‘कुठे आहेत ?’’ ‘‘नाही, आताच गेले संडासामध्ये’’. मी धावत गेलो, संडास ठोकला, म्हटलं थांबा. कारण वॉलिनी जर त्या खालच्या भागाला लावलं, तर बोंबा म्हणजे अख्ख्या जगाला ऐकू येतील अशा बोंबा मारायची वेळ येईल. म्हणजे इकडे त्या बिचार्‍या बाईला खरंच माहित नाही, तिला काय वाटलं, इकडचं दुखायचं थांबलं, तिकडचंही दुखायचं थांबेल. पण ते औषध तिकडे जालीम ठरलं असतं, बोंबाबोंब म्हणजे तीन-चार तास तडफडत राहिला असता. पण सुदैवाने मी वेळेवर जाऊन पोहोचलो, आणि मी नेहमी वेळेवरच पोहोचतो. मी कधी लेट पोहोचत नाही. तर हे लक्षात घ्यायला पाहिजे की कुठे लावायचं हे डॉक्टरंना माहिती आहे तसं त्या देवाला माहिती आहे की कधी औषध द्यायचं. आम्हाला वाटतं, एकदम चार डोस अ‍ॅन्टिबायोटिक्सचे एकदम दिले तर काय बरं होईल ? पटकन् बॅक्टेरिया मरतील. अरे बॅक्टेरिया नाही मरणार, तुमच्याच पेशी मरतील. कारण डॉक्टर बरोबर सिक्स अव्हरली द्यायचं, एट अव्हरली द्यायचं, टेन अव्हरली द्यायचं, डॉक्टरवर सोडा. स्वत: शहाणपणा चालवो नका. बरोबर की नाही ? तसच उद्या बायपास कोणाची चालू आहे आणि डॉक्टरला तो सांगतोय, ‘डॉक्टर आधी पहिली ही वेसल दुरुस्त करा, मग ती करा, आधी इथून हे घाला, तर चालेल का ? नाही. ते तुमचं काम नाही आहे. तसंच हे काम त्या आईचं आहे. त्या महाप्राणाचं आहे. त्या त्रिविक्रमाचं आहे. त्यांना करू द्या. आणि ते करणारच आहेत. का ? बिकॉज ऑफ अव्हर फेथ. आमच्या प्रेमामुळे, आणि मुख्य म्हणजे तिच्या ग्रेसमुळे. अनकंडिशनल, अनमेरिटेड लव्ह. अनमेरिटेड लव्ह ही महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजेच काय, आमची लायकी नसताना सुद्धा, आमची कुवत नसताना सुद्धा जी आमच्यावर कृपा केली जाते – अनकंडिशनल, अनमेरिटेड फेव्हर. हे ट्रान्स्लेशन मला खूप छान वाटतं ग्रेसचं – अनमेरिटेड फेव्हर. आमचं मेरिट नसताना, आमची क्षमता नसताना, जे आम्हाला मिळतं, जो आम्हाला अनुग्रह मिळतो, डॅट इज ग्रेस. आणि ‘ग्रेस’ तिचं नाव आहे. ‘ग्रेस’ तिचं कार्य आहे. आणि अनकंडिशनल, म्हणजे अपेक्षाच काही नाही. फक्त एकच कंडिशन आहे. एक विश्वास असावा पुरता…बरोबर ? हा विश्वास पाहिजे राजांनो.

  तर ही जी सीडी बनवली जाणार आहे, तिच्यातून आपल्याला ह्यातून विश्वास सुद्धा निर्माण होईल लक्षात ठेवा. विश्वास कमी असेल तर तो विश्वास पण वाढेल. नॉलेज कमी असेल, नॉलेज पण वाढेल. म्हणजे तो काय करणार आहे हीलिंग कोड तुम्हाला ऐकताना ? त्या श्वासांबरोबर, इथे महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, परत सगळ्यांनी म्हणायचं आहे, ‘हरि ॐ’, अरे मोठ्याने म्हणा, ‘हरि ॐ, श्रीराम, अंबज्ञ’. कारण हीलिंग कोड एकदा तुम्ही ऐकायला सुरुवात केलीत की त्याच्या मध्ये जो तुमचा श्वासोच्छवास चालू राहणार आपोआप, त्याच्यामध्ये तुमच्या शरीरातून, तुमचा श्वास बाहेर टाकताना, तुमच्या शरीरातील सगळ्या आधी, व्याधी, दुर्गुण, वाईट एनर्जी, वाईट स्पंदनं, वाईट शक्ती, रोगजंतु सगळं बाहेर पडणार…आणि ते ती माझी आई स्वीकारणार तिचा श्वास म्हणून. आणि मग ते तिच्या फुफुस्सातून ती दुरुस्त करून, शुद्ध करून तिचा उच्छवास म्हणून ती जी हवा बाहेर टाकणार स्पंदनं बाहेर टाकणार, ती आपण श्वासाने आपल्या आत घेणार. म्हणजे आई करणार लक्षात ठेवा, की हा हीलिंग कोड आपण ऐकत असताना आपल्या उच्छवासावाटे, एक्झेलेशनवाटे आपल्या शरीरातून ते सगळं वाईट जे आहे, घाणेरडं जे आहे, ते खेचून घेणार आणि त्यातून ती स्वत:चा श्वास घेणार, स्वत:च्या आतमध्ये घेणार आणि मग ती आणि तिचा पुत्र मिळून ते सगळं शुद्ध करणार, कारण तिचा पुत्र हाच तिचा श्वास आहे. तिची लंग्स आहेत. त्यामुळे तिकडे ते सगळं शुद्ध होणार आणि मग तिच्या, सोडला तिने उच्छवासामधून, तिने श्वासाने आपल्या वाईट गोष्ट आत घेतली, तिच्या उच्छवासातून चांगल्या गोष्टी बाहेर टाकणार, चांगली स्पंदनं, शुभ स्पंदनं, शुभ शक्ती, शुभ घटक ते आपण आत खेचून घ्यायचे. हे घडणार. समजतय ? आणि ह्याचसाठी तुम्हाला त्रिविक्रम, हनुमंत, आणि ती आदिमाता, तिघंही तुमच्यासाठी तयार आहेत आणि हे प्रॉमिस माझ्याकडे आहे. हे प्रॉमिस माझ्याकडे आहे आणि त्यामुळे डेफिनेटली आहे. आलं लक्षामध्ये ? ते होणारच आहे. मुद्दाम वेगळा श्वासोच्छवास करण्याची आवश्यकता नाही हे आम्हाला नीट लक्षात घेतलं पाहिजे. आणि ह्याचा दाखला आपण मातृवात्सल्य उपनिषदामध्ये बघितलेला आहे. बरोबर ? मातृवात्सल्य उपनिषदामधील 4थ्या अध्यायामध्ये काय म्हटलेलं आहे ?

  हे उत्तमा! मानवाला दुःख करताना पाहून, रडताना पाहून वृत्राला अतिशय आनंद होत असतो व म्हणूनच तो वृत्र मानवाच्या मनातील दुर्वासनांना बळ पुरवून त्याच्याकडून पापे घडवून आणत असतो. ….आणि म्हणूनच मनुष्याची ही स्थिती जाणणार्‍या चण्डिकापुत्रांची लढाई कुठल्याही मानवाशी कधीच नसून, कुठल्याच पाप्याशीही कधीच नसून चण्डिकापुत्रांची लढाई सदैव वृत्राशीच असते व वृत्राला मानणार्‍या निशाचरांशीच. ….आणि म्हणूनच हे उत्तमा! मनःपूर्वक चण्डिकाकुलाची भक्ती करणार्‍या श्रद्धावानांसाठी चण्डिकापुत्र धावत असतात. मनुष्याच्या देहातील इंद्राचे रूपांतर इंद्राग्निमध्ये झाल्याची चिह्ने (म्हणजे संपूर्ण आरोग्याची, म्हणजे संपूर्ण चांगल्या, शुभ संकल्पाची गोष्ट म्हणजे काय ?) 1) उत्कृष्ट आरोग्यसंपन्नता (Complete pure health, perfect health) 2) शरीराची व मनाची स्ङ्गूर्ति आणि उत्साह, तसेच थकवा व नैराश्य ह्यांचा अभाव 3) धैर्यशीलता (Courage, Confidence) 4) उत्कृष्ट व तीक्ष्ण बुद्धिमत्ता (Highest Intelligence) 5) उचित संयम (Balance) 6) औदार्य 7) सर्व गुणांमध्ये आणि कार्यांमध्ये आदर्श असणे हे एवढे सगळे गुणधर्म प्राप्त होतात. त्यानंतर बघा. 4थ्या अध्यायाच्या शेवटी तो श्लोक आहे, त्याला आपण चतुर्थ विक्रम म्हणतो.

ॐ आदिमाता पश्‍चात्तात विष्णु: पुरस्तात् रुद्र: उत्तरात्तात त्रिविक्रम: अधरात्तात्। त्रिविक्रम: न: सुवतु सर्वतातिं शिव: न: रासतां दीर्घं आयु:॥

  आमचे सर्वस्व असणारी आमची आदिमाता आमच्या मागे, आमच्या पाठीशी उभी आहे. महाविष्णु आमचा नेता, अग्रणी, मार्गदर्शक म्हणून आमच्या पुढे आहे. वरद, अभयमुद्राधारी किरातरुद्र आमच्या मस्तकावर छत्र धारण करत आहे. आम्हाला आधार देणारा, आमचा भार वाहणारा त्रिविक्रम अधोदिशेने आम्हाला धारण करत आहे (विचार करा, किती प्रेम असेल त्या त्रिविक्रमाचं तुमच्यावर ! तो काय करतोय ? तुमच्यासाठी तो…बघा नेहमी काय असतं ? जी उच्च व्यक्ती आहे, मानाची, त्याला आपण उच्चासनावर बसवतो. पायाशी नाही बसवत. हा तुमच्या पायाखाली रहायला तयार आहे. अंडर्स्टॅन्ड हिज लव्ह. तुम्हाला खांद्यावर उचलून घेण्यासाठी, तुमचं तो आसन बनायला तयार आहे, तुमचा रथ बनायला तयार आहे, तुमचा सारथी बनायला तयार आहे. आर यु गेटिंग ? आम्हाला आधार देणारा, आमचा भार वाहणारा त्रिविक्रम अधोदिशेने आम्हाला धारण करत आहे). त्रिविक्रमाने पूर्व, पश्‍चिम आदि दाही दिशा व्यापून टाकल्या असून केवळ त्याच्यावरच आमचे जीवन अवलंबून आहे. हा परमशिवच आमचा चहूबाजूंनी, सर्वथा प्रतिपाळ करो व आम्हाला दीर्घायुष्य देवो.

  काय सुंदर प्रार्थना आहे बघा ! अध्याय 7व्यामध्ये वाक्य येतं, जे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे, ‘अंबज्ञता’ म्हणजे आदिमातेविषयी श्रद्धावानाच्या मनात असणारी व कधीही न ढळू शकणारी असीम कृतज्ञता. त्याच अध्यायामध्ये आपण अदितिमतीची गोष्ट वाचतो, कश्यपांच्या पत्नीची. तिच्या अंबज्ञतेमुळेच प्रथम त्या ध्वजाचा वृक्ष झाला व पुढे तिच्या अंबज्ञतेमुळेच तो प्रचंड वृक्ष तिच्यासाठी साधारण ध्वजाएवढाच हलका झाला. हे बालकांनो, त्यामुळे नीट लक्षात ठेवा की अंबज्ञता हेच सर्व सुखांमागील रहस्य आहे. तीनही चण्डिकापुत्र सदैव अंबज्ञ असतात. मीही अंबज्ञच आहे व तिच्याच कृपेने अंबज्ञ आहे.’’ जो कोणी श्रद्धावान श्रीचण्डिकाकुलासमोर उभा राहून आपल्या चुकांबद्दल व पापांबद्दल पश्चात्ताप व्यक्त करतो, त्याला चण्डिकापुत्रामाफत आदिमाता क्षमा पोहोचवितेच. हे मध्यमा! माझ्या ह्या मातेची क्षमाही तिच्यासारखीच अनंत आहे व ही माझी लाडकी आई महारणरागिणी असूनही श्रद्धावानांसाठी मात्र अत्यंत साधी, सोपी व भाबड्या अंतःकरणाची आहे.’’ परशुराम काय सांगतो लक्षात घ्या. अध्याय 9व्यामध्ये मातृवात्सल्य उपनिषदाच्या- आदिमाता चण्डिकेने माझे नामकरण करीत असताना, माझ्या कानात उच्चारलेले शब्द ऐका, माझ्या आईचे शब्द होते ‘‘माझ्या बालका, मी तुझ्यावर निरंतर प्रेम करीत राहते.’’ (काय सुंदर शब्द आहेत ! ते ज्याने ऐकले आहेत ना, तो कधीच विसरू शकत नाही.) ‘‘माझ्या बालका, मी तुझ्यावर निरंतर प्रेम करीत राहते.’’ हे मित्रांनो, हे मी माझ्या आदिमातेचे ऐकलेले पहिले वाक्य आहे, तेव्हा त्या अर्भकावस्थेत मी बोलू शकत नव्हतो, फक्त ऐकू शकत होतो. आणि हेच तर महत्त्वाचे आहे. हे मित्रांनो, सतत ऐकत रहा, माझ्या आदिमातेचे हे आद्यवाक्य, तिच्या लाडक्या पुत्रासाठी उच्चारलेले, अर्थात् ह्या मातृवाक्याचे सदैव स्मरण असू द्या आणि मनन करीत रहा – ह्यालाच ‘ऐकणे’ असे म्हणतात. हाच तिचा सर्वोत्कृष्ट मंत्र आहे, हेच तिच्यासाठी सर्वोत्तम आमंत्रण आहे आणि हाच तुमच्यासाठी प्रारब्ध बदलण्याचा सर्वोत्कृष्ट उपाय आहे. परशुरामाने साद घातली, ‘‘आदिमाते तु प्रेमळ आहेस आणि मी अंबज्ञ आहे.’’ आणि अद्भुत घडले. कुणाही मानवासाठी अशक्य असणारी गोष्ट घडली, उत्तमाने त्या पंचम मंगलस्थानावरील मंदिरातील अक्षमूर्तितून सर्व आयुधे धारण केलेल्या आदिमाता महिषासुरमर्दिनीला परशुरामाकडे धावत येताना पाहिले. आदिमाता महिषासुरमर्दिनीने परशुरामास प्रेमाने आलिंगन दिले, व त्याच्या मस्तकाचे चुंबन घेतले व प्रत्यक्ष ती आदिमाता उत्तम व मध्यमाला म्हणाली, लक्षात घ्या हे वाक्य खूप महत्त्वाचे आहे. आदिमाता महिषासुरमर्दिनीने परशुरामास प्रेमाने आलिंगन दिले, त्याच्या मस्तकाचे चुंबन घेतले व प्रत्यक्ष ती आदिमाता उत्तम व मध्यमाला म्हणाली, ‘‘मी तुमच्यासाठीही अशीच धावत येईन.’’

  मग असं का लक्षात घेत नाही? आम्हाला प्रत्येक ठिकाणी हे वाक्य लक्षात का राहत नाही? की या माझ्या आईने वचन दिलंय उत्तमाला आणि मध्यमाला आणि पुढे विगत आहे जो अतिशय पापी होता, त्याला सुद्धा सुगत करून घेतलं ना? आणि त्याला काय प्रॉमिस दिलं आईने? कि जे जे उत्तमाला आणि मध्यमाला मी दिलंय ते सगळं तुलाही प्राप्त झालेलं आहे. मग तुम्हाला माहित पाहिजे, जर, ‘एक विश्‍वास असावा पुरता। कर्ता हर्ता गुरु ऐसा’ तर हे सगळं जर आम्ही श्रद्धावान आहोत, म्हणजे ही आई – ‘मी तुमच्यासाठीही अशीच धावत येईन.’ माझ्यासाठी! म्हणजे प्रत्येकाला खात्री पाहिजे की येस! माझी ही मोठी आई, माझी ही आजी माझ्यासाठी अशीच धावत येणार आहे. तीने दिलेला शब्द जर आम्ही खोटा म्हणणार असू, तर मग सगळंच संपलच. त्याला काही अर्थच नाही. कारण मी वारंवार सांगितलंय, कि ती आणि तिचा पुत्र एकदा शब्द दिला की कधीही परत घेत नाहीत. कधीच नाही. त्यात कधीही बदल होतंच नाही. मग कित्येक जन्म जावोत, प्रलय होवोत आणि महाप्रलय होवोत. आलं लक्षामध्ये? त्यानंतर बघा, परमात्मा काय सांगतोय, हे श्रद्धावाना, मी म्हणजे आदिमातेने तुझ्या जीवनात, (मी म्हणजे कोण हा परमात्मा सांगतोय) मी म्हणजे आदिमातेने तुझ्या जीवनात, सर्व काही चांगले पोहोचविण्यासाठी व त्याचे रक्षण करण्यासाठी नेमलेला तुमचा दास आहे. तिचा दास आहे, तुमचा दास आहे. त्याचाच अर्थ आदिमातेच्या कृपेच्या विहीरीचा मी चण्डिका पुत्र केवळ रहाट आहे. तुझ्याच उपयोगासाठी असणारा. मग बघ तुझ्या जीवनात अडचण नावालासुद्धा उरणार नाही. मात्र हा रहाट वापरण्यासाठी तुला प्रयास हे करावेच लागणार. आणि हा रहाट म्हणजे हे हिलींग कोड, हे गुह्य सुक्त. समजलं? हा रहाट जो लागतो ना आम्हाला, त्या आदिमातेच्या विहीरीतून औषधं बाहेर काढण्यासाठी, मदत बाहेर काढण्यासाठी, तो रहाट आम्हाला आज पूर्णपणे मिळणार आहे, श्रीश्‍वासम्च्या उत्सवामध्ये. आलं लक्षामध्ये? नक्की? आता रहाट आमच्याकडे नाही, दोरखंड नाही आणि पोहरा नाही, असं म्हणून चालणारंच नाही. आणि मग ते स्तोत्र येतं माझं आवडतं स्तोत्र आहे.

  चण्डिका प्रसाद स्तोत्र. ही प्रेमळ आदिमाता फक्त माझीच माय आहे. ही आदिमाताच माझ्या सप्तचक्रांची स्वामिनी आणि दोन सुप्त चक्रांची प्रेरणास्त्रोत आहे. ही माझी आदिमाता एवढी विलक्षण सुंदर आहे आणि म्हणूनच माझे जीवन खूप सुंदर आहे. ही माझी आदिमाता कधीच चुकत नाही आणि म्हणूनच माझे जीवन देखील कधीच व्यर्थ जाणार नाही. ही माझी आदिमाता कधीच विकृत होत नाही आणि म्हणूनच माझे जीवनदेखील कधीच विकृत होणार नाही. ही माझी आदिमाता सदैव उत्साहानेच भरलेली आहे आणि म्हणूनच माझे जीवनही सदैव उत्साहपूर्णच आहे. ह्या माझ्या आदिमातेची प्रत्येक रचना निर्दोष आहे आणि तिनेच माझीही रचना केलेली आहे. ह्या माझ्या आदिमातेनेच सूर्य चंद्र आणि पृथ्वीला उचित वजन दिले आहे आणि म्हणूनच ती माझ्या शरीराचे, मनाचे, बुद्धीचे वजन अर्थात ओझे उचितच ठेवते. ही माझी आदिमाता सदैव एवढी लवचिक आहे आणि म्हणूनच मी कधीही मोडणार नाही. ही माझी आदिमाता अंतःकरणाने एवढी कोमल आहे, आणि म्हणूनच मी कधीच दगड बनणार नाही. ह्या माझ्या आदिमातेला कुठलेही शस्त्र इजा करू शकत नाही, आणि म्हणूनच माझी वेदना कधी टिकू शकत नाही. ही माझी आदिमाता कधीच कुणाचे वाईट करू इच्छित नाही, आणि म्हणूनच कुणीही माझे वाईट करू शकणार नाही. ही माझी आदिमाता कधीच पराभूत होत नाही, आणि म्हणूनच माझे अपयशही मला अधिक संपन्न करेल. ही माझी आदिमाता ह्या विश्‍वातील प्रत्येक चूक दुरुस्त करीत असते, आणि म्हणूनच माझ्या त्रिविध देहातील विकृती तीच दुरुस्त करते, आणि मी अविकृत राहतो. ह्या माझ्या लाडक्या आदिमातेच्या प्रत्येक उच्छवासातून असंख्य अद्भुत चमत्कार बाहेर पडत असतात, आणि म्हणूनच तिचे नाम घेऊन जो श्‍वास मी आत घेतो, त्या श्‍वासाबरोबर माझ्या त्रिविध देहात अनेक चांगले चमत्कार घडत राहतात. आपण श्रीश्‍वासम्ची तयारी उपनिषदामध्ये केलेली होती, पण आम्ही विसरलो. बरोबर? नुसतं वाचायचं. अरे, प्रेमाने वाचा गधड्यांनो, खरंच सांगतो, श्रीश्‍वासम्ची तयारी इथे आहे. तुम्हाला- मला वाटतं, आयला हे काय बापू सांगताहेत, उपनिषद तर आहेच. पण नाही; बरोबर? लक्षात ठेवा राजांनो हे प्रॉमिस आहे. ह्या त्रिविक्रमाचं प्रॉमिस आहे, ह्या हनुमन्ताचं प्रॉमिस आहे, ह्या दत्तात्रयांच प्रॉमिस आहे. नित्यगुरुंच प्रॉमिस आहे. पंधराव्या अध्यायामध्ये बघा, डिस्कशन चालू आहे, त्रिविक्रम, परशुराम आणि मध्यम. मध्यम विचारतो, ‘‘हे त्रिविक्रमा! रोग व व्याधी ही पापांची किंवा अपराधांची शिक्षा असते काय?’’ त्रिविक्रम उवाचः ‘‘होय, श्रद्धाहीनांसाठी रोग व व्याधी ही अपराधांची शिक्षा व सजा असते, श्रद्धाहीनांसाठी! तर श्रद्धावानांसाठी ही ताकीद असते, स्वतःचे जीवन सुधारण्याची.’’ आम्ही हे कधी लक्षात घेणार? कधीही आजारी पडलं की… कशाला? आम्ही एवढे काय वाईट केलं म्हणून आम्हाला ही सजा झाली (अरे ती सजा नाही आहे!). त्यानंतर परशुराम म्हणतो, प्रिय मित्रांनो, ‘‘’शारीरिक रोगच काय परंतु मानसिक आजारसुद्धा मानवाला विदीर्ण करून टाकतात. व्याधी कितीही मोठी असो, आजार कुठलाही असो, काहीही फरक पडत नाही. जेव्हा तू पूर्णपणे अंबज्ञ राहून आदिमाता चण्डिकेची प्रार्थना करतोस, तेव्हा अक्षरशः अद्भुत घडते. हे मित्रांनो! आदिमाता चण्डिका काहीही करू शकते. काय दणदणीत प्रॉमिस आहे परमात्म्याकडून! हे मित्रांनो! आदिमाता चण्डिका काहीही करू शकते. रोगच काय, पण कुठल्याही संकटात कधीदेखील तिच्या कुठलाही चमत्कार घडवून आणण्याच्या सामर्थ्यावर शंका घेऊ नका. हे मित्रांनो, तुम्ही तिच्यावर व तिच्या कुलावर प्रेम केले नाहीत, तर कुणीही इतर मनुष्य तुमच्यावर कधीच खरे प्रेम करू शकणार नाही. आणि तुम्ही तिच्यावर विश्‍वास ठेवला नाहीत, तर इतर कुणीही मनुष्य तुमच्यावर खरा विश्‍वास ठेवणार नाही. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तुम्ही जर तिलाच सोडलेत, तर तुमच्या जीवनातील प्रत्येक चांगली गोष्ट आणि चांगली व्यक्ती तुम्हाला नक्कीच सोडून जाईल. ह्या आदिमातेला जो कुणी सोडतो, त्याचे सुदैवच त्याला सोडून जाते.’’ किती सोप्पी गोष्ट आहे! हे मित्रांनो, आदिमाता चण्डिका काहीही करू शकते. हे ज्ञान आपल्याला असायला हवं. आणि तिने सांगितलंय म्हणून तिचा पुत्र त्रिविक्रम तिच्यासाठी काहीही करू शकतो. ही माय-लेक काहीही करू शकतात. पण, आई ती आई अति मायाळू, लेकूरा लागी अति कनवाळू, परी लेकुरेच निघता टवाळू कैसा सांभाळू करी ती. तर हिलींग कोड देऊन. सगळी लोकं टवाळू निघाल्यानंतर ती म्हणाली, ‘‘ये बाबा आता, हे हिलींग कोड येऊ दे.’’ सगळे टवाळपणाच करताहेत. आलं लक्षामध्ये? म्हणजे टवाळ असली तरी माझी बाळं आहेत. बरोबर? जास्तीत जास्त थोडा कान पिळला, दोन कानफडात मारल्या, दोन फटके दिले, दोन तास उपाशी ठेवले – एकच्या ऐवजी तीनला जेवायला दिलं, ठिक आहे. पण त्याने त्यांचं भलं व्हायलाच हवं. बावीसाव्या अध्यायामध्ये त्रिविक्रम म्हणतो, ‘‘हे श्रद्धावानांनो! कुणाचा विश्‍वास असो वा नसो! परंतु चण्डिकापुत्र परमात्म्यानेच सर्व श्रद्धावानांसाठी असा वर मागून घेतलेला आहे कि तिचे प्रत्येक चित्र, तसबीर, व मूर्ति ही ती ‘ती’च असते. ‘ती’ तीच असते. ’’ आता इथे आपल्याला बघायचंय, ही एवढी प्रॉमिसेस आपल्याला मिळाली, बरोबर? तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला बघायचंय ह्याच्यामध्ये एक गोष्ट, ह्याच उपनिषदामध्ये 30व्या अध्यायामध्ये त्रिविक्रम म्हणतो त्रिविक्रम उवाचः आम्हां चण्डिकापुत्रांना माझी आई जो प्रश्‍न विचारते आणि विचारीत राहते; तोच प्रश्‍न आता मी तुला विचारतो आहे. हे विगता, ‘मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे’. अरे सुगति! तू विगती असतानाही मी तुझाच होतो, हे उत्तम, मध्यम व सुगति तुमच्यासाठीच तर मला माझ्या आईने घडवले आहे, तुमच्या सेवेसाठी, तुम्हाला सहाय्य करण्यासाठी आणि तुम्ही पाहिलेतच की मीही तुमच्याबरोबरच चालतो आहे.’’ मीही तुमच्याबरोबरच चालतो आहे. आणि म्हणून राजांनो, लक्षात ठेवायचं कि आदिमातेने आपलं हे प्रॉमिस दिलेलं आहे. हनुमन्ताचं प्रॉमिस आपण बघितलं, हनुमानचलिसा मध्ये ‘नासै रोग हरै सब पीरा, जपत निरंतर हनुमत बिरा। संकट ते हनुमान छुडावै मन क्रम बचन ध्यान जो लावै।’ पण मन-क्रम-बचन ध्यानात आणणार कसं? एका लाईनीमध्ये तुम्ही आणणार कसं. ‘द हिलींग कोड’. आम्हाला काय ध्यानात वगैरे बसण्याची जरुरत नाही. हिलींग कोड ऐकायचं आणि आपला श्‍वासोत्सवास नेहमीप्रमाणे ठेवायचा. जास्त नाही कमी नाही. आम्हाला काय त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करायचं नाही, काही नाही. फक्त ते गाणं प्रेमाने ऐकायचंय. गीत आहे ते. पण ते मंत्रमय आहे. त्यातला प्रत्येक शब्द हा आपल्या आत उतरणारा आहे. आणि हे जे वेद गीत आहे, हे वेद गीत जे आहे, हा हिलींग कोड जो आहे हा पहिल्यांदा संस्कृत, मराठी, हिंदी आणि इंग्लिश ह्या चार भाषांमधून ह्या हिलींग कोडचं गीत येईल. त्यानंतर प्रत्येक भाषेमध्ये लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न राहिल. मात्र ह्याचं भाषांतर प्रत्येक भाषेमध्ये करताना, नीट ताळतम्य ठेवून व्हायला पाहिजे. नुसतं मनाने करून, बुद्धीने करून होणार नाही. केवळ ती भाषा येते म्हणून करता येणार नाही. तर त्यासाठी तिकडे मला त्याच्याबरोबर बसायला लागेल, जो कोण करणार असेल त्याच्याबरोबर. आलं लक्षामध्ये? तर त्यामुळे पहिल्यांदा जरी हे चार भाषांमध्ये आलं तरी आपल्याला खूप चांगलं आहे. आलं लक्षामध्ये? क्लियर? आता त्यादिवशी उत्सवाच्या वेळीस इथे काय असणार आहे. ओके? तर इथे ज्या जागेत आपण बसलेलो आहेत सगळेजण आता, इथे या स्टेजवरती, आपल्या प्रथम पुरुषार्थधाम मध्ये जशी रचना असणार आहे, चण्डिकाकुलाची, तशा रचनेचं हुबेहूब तसबीर म्हणा, काहीही म्हणा, असं काहीतरी इथे असणार आहे. आणि त्याचं पूजन दररोज, माध्याह्न काळात मी नंदा आणि सुचित करणार आहोत आणि सायंकाळी समीरदादा करणार आहेत. आलं लक्षामध्ये? आणि त्या पूजनाचं तीर्थ आणि प्रसादच प्रत्येक भक्ताला मिळणार आहे लक्षात?ठेवायचं. आलं लक्षामध्ये? त्या नंतर इकडच्या ह्याचे तीन भाग केलेले आहेत. पार्ट वन, पार्ट टू आणि पार्ट थ्री. म्हणजे या मैदानामध्ये पार्ट वन, या मधल्या हॉलमध्ये पार्ट टू आणि त्याच्या बाहेर जिकडे गुरुपौर्णिमेला आपण प्रदक्षिणा घालतो तिकडे पार्ट थ्री. तर पार्ट वन मध्ये या ठिकाणी काय असेल? तर या ठिकाणी अवधूत चिन्तन चं लोकांना आठवत असेल की दत्तात्रेयांच्या 24 गुरुंच्या तसबिर ठेवल्या होत्या, तश्या इथे 24 तसबिरी असतील पण ती, एक दत्तात्रेयांची असेल, अश्‍विनीकुमारांची असेल आणि त्याच्यामध्ये आईच्या श्री रूपाच्या, ह्या चण्डिकेच्या श्री रूपाच्या विविध प्रतिमा असतील. त्या सुद्धा एका विशिष्ट क्रमाने. आलं लक्षामध्ये? कि ज्या क्रमाने त्या शक्तीचे वहन होतं, ती शक्ती आपल्याला इझीली मिळू शकते, अशा रितीने त्या प्रतिमा ठेवल्या असतील, त्याला आपण प्रदक्षिणा घालायची आहे. आलं लक्षामध्ये? आणि ती प्रदक्षिणा आपली चालू असताना…पहिल्यांदा सतत प्रत्येक तुकडीला…त्यावेळेस आपण गुरुगीता ऐकवायचो प्रत्येक ग्रुपला. तर प्रत्येक ग्रुपला श्रीमूलार्क गणेश मंत्र एकदा, त्यानंतर दत्तात्रेय स्तोत्र, त्यानंतर श्रीसुक्तम् जे आता ऐकलं ते, त्यानंतर हनुमतस्तोत्र, त्यानंतर अश्‍विनीकुमार स्तोत्र, त्यानंतर उषा स्तोत्र आणि त्रिविक्रम मंत्र. अशा सात गोष्टी ऐकत आपण ती प्रदक्षिणा घालणार आहोत. ही प्रदक्षिणा सगळ्यांना विनामुल्य आहे. एकही पैसा कोणाला खर्च करण्याची आवश्यकता नाही. मात्र ही प्रदक्षिणा करताना ज्यांना पूजनोपचार वाहायचे आहेत त्यांना मात्र त्याचे पैसे द्यावे लागेल. कारण त्या वस्तुकाही संस्थेला ङ्ग्री देणं आपल्याला परवडणार नाही. पण संपूर्ण क्रिया करणार्‍या व्यक्तिला आणि पैसे नाहीत म्हणून जो करू शकणार नाही 501 रुपये भरून, त्यांच्यामध्ये काही फरक पडणार नाही, त्याने ते पैेसे दिले नाहीत म्हणून त्याला ते मिळणार नाही असं मूळीच नाही. आलं लक्षामध्ये? ओके? क्लियर? म्हणजे ही प्रदक्षिणा घालण्यासाठी 501 रुपये देऊन जे पूजाद्रव्य…सूप असणार आहे. त्या सूपामध्ये अनेक गोष्टी असणार आहेत. आलं लक्षामध्ये? तर त्या सगळ्या गोष्टी फक्त नंतर, शेवटी तिकडे एक जलकुंड केलेलं असेल त्या जलकुंडात नेऊन अर्पण करायच्या. म्हणजे सगळ पाण्यात विसर्जन होणार…म्हणजे सूपात वाहाणार ते, आईला वाहाण्यासाठी. पण घरात दहा माणसातल्या एकाने केलं तरी चालेल, दहाजणांनी केलं तरी चालेल आणि एकानेही नाही केलं तरीही काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर आतमध्ये ते गुह्य सुक्ताचं वेदगीत असणार आहे. तिकडे आत शिरल्यानंतर पहिल्यांदा शांतचित्ताने…हनुमन्ताची मूर्ती असणार आहे, पंचमुखी हनुमंताची सुंदर मूर्ती तिकडे ह्या बाजूला, त्याच्याकडे सगळेजणं हात जोडून बघतील…बघताना डोळे बंद ठेवावेत, उघडे ठेवावेत काही प्रॉब्लेम नाही. आणि मग तेव्हा हे गुह्यसुक्त तुम्हाला ऐकवलं जाईल. आलं लक्षामध्ये? त्याची सगळी आवर्तन जेवढी आवश्यक आहेत तेवढी ऐकवली जातील. ते शांतचित्ताने ऐकायचं आहे. ते ऐकताना तुमचं जे ब्रिदींग होईल त्या ब्रिदींगमधून तुमची नाळ जोडली जाणार आहे, तुमचं कनेक्शन जोडले जाणार आहे. आणि मग प्रत्येकाला एक पाण्याने भरलेला कलश दिला जाईल. पाणी असेल साधंच पण ते पवित्र मंत्रांनी संतृप्त केलेलं असेल. ते पाणी घेऊन हनुमंताच्या समोर जाऊन हनुमन्ताला दाखवायचं, मग त्या टोकाला तिकडे अश्‍विनी कुमार असतील. अश्‍विनीकुमारांना जाऊन दाखवायचं ते पाणी. आणि ते कसं…तर डाव्या हातामध्ये तो कलश तांब्या धरायचा, उजवा हात त्याच्यावर धरायचा. तो घेऊन हनुमन्तासमोर जायचं. ओके? आणि म्हणायचं ‘जय हनुमन्त.’ तिथून अश्‍विनी कुमारांकडे जायचं आणि म्हणायचं ‘जय अश्‍विनीकुमार’. सिम्पल. जय हनुमन्त, जय अश्‍विनीकुमार. मला काय मोठ्या मंत्रांची आवश्यकता नाही. आणि तेवढं घ्यायचं आणि तिकडे बाहेर उषा पुष्करिणी असेल. उषा पुष्करिणी. उषस् ही वेदांमधली अतिशय महान देवता आहे. म्हणजे सकाळचा जो उषःकाळ असतो ना तो, पण ही अश्‍विनीकुमारांची माता आहे. आणि तिकडे ते पाणी आपण अर्पण करणार आहोत. आणि त्याचंच कारंज उडणार आहे. तुम्ही वाहिलेल्या पाण्याचंच कारंज उडणार. आणि त्या कारंज्यामध्येच त्रिविक्रम लिंगाला अभिषेक होत राहणार. आलं लक्षामध्ये? म्हणजे तुम्ही ते सगळं त्रिविक्रमाला अर्पण करताहात. आणि पुष्करिणी तिर्थ कोणाचं आहे? उषस् पुष्करिणी तिर्थ आहे. उषादेवीचं आहे. हे अश्‍विनी कुमार कोण? अश्‍विनीकुमारांची गोष्ट आपण वाचली होती ना, त्यांना घोड्याची तोंड होती. ते दोन जुळे भाऊ आहेत. आणि ते देवांचे वैद्य आहेत. आणि त्यांच्यामुळेच देवांना कुठलेही आजार होत नाहीत. म्हणजे अश्‍विनी कुमार म्हणजे काय हे आपण जाणून घेतलं पाहिजे. उषस् म्हणजे उषादेवी, ही नावं सुरुवंती… वगैरे अनेक नावं ठिकठिकाणी येतात पण एक मूळ नाव जे आहे ते आपण घ्यायचंय. ही उषा जी आहे, ती सूर्यपत्नी आहे. सूर्याचे तेज तिला सहन होत नसे. ती विश्‍वकर्म्याची कन्या होती. एकाच पुराण कथेत याचा उल्लेख आहे पण विश्‍वकर्मा ज्याला आपण म्हणतो. देवांचा इंजिनीयर. त्या विश्‍वकर्म्याची ही कन्या होती उषा. तिचा विवाह सूर्याशी मागणी घालून सूर्याने केला. पण त्याच्या तेजाने ती जळू लागायची. आणि त्याच्यापासून लांब गेली तरी त्याला प्रॉब्लेम. ते ही जमायचं नाही, पती आहे. पण तिला त्याचं तेजंच सहन होत नव्हतं. त्यामुळे त्यांच्यामध्ये वैवाहिक जीवन सुरू होऊ शकलं नाही. शेवटी ती घाबरून, एक दिवस सूर्य जवळ आल्यानंतर तिच्या अंगाचा एवढा दाह झाला, ती घाबरून पळाली. ही वेदांमधली कथा आहे. ॠग्वेदामधली लक्षात ठेवा. ती पळाली. आणि ती पळाल्यानंतर एका तिर्थावरती पुष्करिणी तिर्थावर लपून राहिली. तेव्हा विश्‍वकर्म्याने विचार केला की आपली मुलगी हे बरोबर करत नाहीये. एवढा श्रेष्ठ पती मिळालेला आहे. त्याचं तेज उग्र आहेच, पण तो आहेच तसा. त्याचं तेज तिने सहन करायलाच हवं. असा पती मिळणं हे भाग्याचं लक्षण. विश्‍वकर्मा तिच्याबरोबर खाली येतो आणि तिला म्हणतो, ‘‘बालिके असं करू नकोस. मी महाप्राणाचा मंत्र तुला देतो. त्या महाप्राणाचा मंत्र तू जप. हा महाप्राण कपीमुखाने नव्हे, तर पंचमुखाने तुझ्यासमोर प्रगटेल. हा पंचमुख रूपाने तुझ्यासमोर प्रकटेल.’’आणि त्याप्रमाणे पंचमुखी हनुमान तिच्यासमोर प्रगटतो. पंचमुखी महाप्राण तिच्यासमोर प्रगटतो. त्या मंत्राच्या जपानंतर, तपश्चर्येनंतर. आणि मग तो स्वतःचा श्‍वास सूर्याच्या श्‍वासामध्ये टाकतो. स्वतःचा श्‍वास सूर्याच्या श्‍वासामध्ये टाकतो. आणि तसाच तो स्वतःचा उच्छवास उषेच्या श्‍वासामध्ये टाकतो. उषेची तेज सहन करण्याची शक्ती वाढते, आणि सूर्याची तिच्याबरोबर वैवाहिक संबंध ठेवतानाची दाहकता मवाळ होते. म्हणजे सूर्याचे जे त्रासदायक किरण आहेत ते बाजूला सरले आणि जे हितकारक म्हणजे हिलींग म्हणजे निरोगीकरण करणारे जे सूर्याचे किरण आहेत जी सूर्याची एनर्जी आहे तीचं आणि उषेचं, उषा म्हणजे विकसणारे, प्रकाशणारी, बल देणारी, जागृत करणारी, ज्ञान देणारी देवता आहे. ह्यांचं मिलन झालं आणि त्या मिलनातून जुळे पुत्र उत्पन्न झाले; अश्‍विनीकुमार. आलं लक्षामध्ये? अश्‍विनीकुमार. इथे त्यांचं अश्‍वमुख काही ठिकाणी मानलं जातं का? कारण तिने घाबरून म्हणे घोडीचं रूप घेतलं होतं ओळखू नये म्हणून. आणि मग विश्‍वकर्म्याने ओळखलं. ही कथा आहे, ही कथा बेसिकली सांकेतिक आहे. तुम्हाला कळतं का कि सूर्याचं जे फक्त त्रास न देणार जे हितकारक तेज आणि उषा म्हणजे त्या सूर्याचे त्रास न देणारे अतिशय हितकारक किरण, ह्यांच्यामधून जी चुंबकिय शक्ती उत्पन्न झाली ती म्हणजे अश्‍विनीकुमार. म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, नासत्यौ अश्‍विनीकुमार. एक असल्याशिवाय दुसरा असतंच नाही. दोन्ही एकत्रच असतात. मात्र दोघांचे रंग वेगळे वेगळे आहेत. एक कसा आहे तर उगवत्या म्हणजे प्रार्त्यसंध्येसारखा आहे. तर दुसरा संध्याकाळच्या म्हणजे सूर्यास्ताच्या संधेसारखा आहे. हे दोन्ही एकत्रच राहतात. म्हणजे काय हे दोन्ही पोल्स आहेत, चुंबक क्षेत्राचे. साऊथ पोल आणि नॉर्थ पोल. एक आहे की दुसरा आहेच. एकाशिवाय दुसरा नाहीच. आणि हे जे सूर्याचं सकाळचं चुंबकीय क्षेत्र आहे त्यालाच अश्‍विनीकुमारांचा काळ म्हणतात. म्हणजे आपल्या भारत देशाच्या वेळेनुसार बघायचं झालं तर, सुर्योदयाच्या आधीचा अर्धातास आणि नंतरचा अर्धातास. सुर्योदयाच्या आधीचा अर्धातास आणि नंतरचा अर्धातास. म्हणजे उषेचा काळ. ओके? आणि त्याच्या आधीचा पाऊण तासाचा काळ म्हणजे अश्‍विनीकुमारांचा काळ. अश्‍विनीकुमार आधी आहेत लक्षात ठेवा. आई आणि मुलगा म्हणून असं उलट धरू नका. लक्षात आलं तुम्हाला? नक्की? सुर्योदयाच्या आधी अर्धा तास आणि नंतर अर्धा तास हा उषेचा काळ. हा तुमचा विकास घडवून आणण्याची शक्ती आहे. तर तुम्हाला निरोगी ठेवण्याची जी शक्ती अश्‍विनीकुमारांमध्ये आहे. तो वेळ कुठला आहे? त्याच्या आधीचा अर्धा ते पाऊण तास. आलं लक्षामध्ये? निश्चित? मात्र कसं आहे, माता असल्यामुळे मातेच्या काळामध्येही अश्‍विनीकुमारांची शक्ती असतेच. आलं लक्षामध्ये? म्हणजे ज्याला आधी उठून कसं जमणार बापरे बापू! तर नाही. सूर्योदयानंतरच्या अर्ध्या तासामध्ये सुद्धा उषेची शक्ती आहे आणि तिच्याच गर्भामध्ये राहणार्‍या अश्‍विनीकुमारांची शक्तीही आहेच. आणि हे अश्‍विनीकुमार आपल्या शरिरातले चुंबकीय क्षेत्र मॅग्नेटीक फिल्ड. म्हणजे आपण मॅग्नेटीक थेरपी वगैरे सगळं बघतो, आज आपण एम.आर.आय. वगैरे करतो तो पण मॅग्नेटीक रेझोनन्सच आहे. मॅग्नेटीक शक्तीची ताकद आपण बघतो. इलेक्ट्रोमॅग्नेटीक वेव्ज वरती प्रकाश आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटीक वेव्ज म्हणजे प्रकाश. आज आपली सगळी उपकरणे इनडायरेक्टली इलेक्ट्रोमॅग्नेटीक वेव्ज वरतीच चालताहेत. पटतंय? तर ही शक्ती आपल्या शरीरामध्ये निर्माण करून वापरण्याचं काम अश्‍विनीकुमार आणि हे मॅग्नेटीक म्हणजे चुंबकीय क्षेत्र म्हणजे अल्टीमेट ट्रीटमेंट. त्रिविक्रम हे करतो. आपल्या शरीराचे चुंबकीय क्षेत्र त्या सप्त चक्रांच्या सहाय्याने बदलून पाहिजे तसं, अ‍ॅप्ट म्हणजे उचित बनवणं, म्हणजे पूर्णपणे त्या रोगाचा नाश करणं हे काम कोण करतो? त्रिविक्रम. म्हणजेच तो दोन्ही अश्‍विनीकुमारांना वापरतो. म्हणून अश्‍विनीकुमारांना त्रिविक्रमाचं नाक मानलेलं आहे. दोन नाकपुड्या असतात नं, त्रिविक्रमाची एक नाकपुडी म्हणजे एक अश्‍विनीकुमार आणि दुसरी नाकपूडी म्हणजे दुसरा अश्‍विनीकुमार. अश्‍विनीकुमार म्हणजे काय त्रिविक्रमाचं नाक. आणि त्रिविक्रमाला काय मानलेलं आहे? आदिमातेचा श्‍वास. त्रिविक्रम हा आदिमातेचा श्‍वास आहे. आलं लक्षामध्ये? क्लियर? आणि म्हणून आपल्याकडे अश्‍विनीकुमारांच्या मुर्ती दोन असतील. त्याच्यावर आपण जल अर्पण करणार किंवा जल दाखवणार. चुकून हात उलटा ठेवल्याने पाप घडणार नाही. पण योग्य रितीने केलं त्याचा ङ्गायदा अधिक चांगला आहे. आलं लक्षामध्ये? आत जाण्यासाठी कुठलीही ङ्गी नाही. हिलींग कोड साठी कुठलाही पैसा कोणालाही लागणार नाही. प्रदक्षिणा घालताना तुम्ही पैसे दिलेले असतील किंवा नसतील तरी प्रत्येकाला समानपणे तिकडे जायचा अधिकार आहे. ते पाणी दाखविण्याचा आणि अर्पण करण्याचा अधिकार आहे. आलं लक्षामध्ये? क्लियर? त्याच्याबद्दल मला काहीही प्रॉब्लेम नाही. हे संपूर्णपणे जी महत्त्वाची गोष्ट आहे ती प्रत्येकाला सूर्यकिरणाप्रमाणे विनामूल्य आहे. अनकंडीशन्ल. फक्त प्रेम पाहिजे विश्‍वास पाहिजे. आर यु अंडरस्टँडींग? मात्र तिकडे दक्षिणा पेटी जरूर ठेवणार आहे मी, ज्यांना वाटेल त्यांनी इच्छेने आपल्याला काय वाटेल ते जरूर टाकावं. कारण एवढ्या ह्याचं भाडं देणं सात आठ दिवसांचं आणि गोष्टी याच्यासाठी खर्च येतोच आहे. पूजन आपण तिकडे करणार आहोत जे उत्तरभारतीय संघामध्ये ते ऐच्छिक आहे. पण ते पूजन खरोखरच खूप सुंदर आहे. त्याच्यामुळे अगदी सगळी बेस्ट सूत्र, बेस्ट सुक्त, बेस्ट. सगळी बेस्टच आहे. परंतु?ज्याला जमेल त्या घरातल्या एखाद्याने करावं नाहीतर मी हीही परवानगी दिली आहे कि एकदम पैसे भरणे शक्य नसेल तर नंतर भरा. तुमचं नाव लिहून ठेवलं जाणार नाही कि याच्या नावावर येवढे आहेत. असा हिशेब ठेवला जाणार नाही. तुम्ही या तुम्हाला आतापर्यंत आपली सवय सगळ्यांना माहिती आहे. एवढ्या वर्षाची. बरोबर? परंतु इथे सुद्धा प्रदक्षिणा घालायला एक पैशाची आवश्यकता नाही. पूजनद्रव्य जर का वाहायचं असेल तर त्यासाठी दक्षिणा द्यायला पाहिजे. आतमध्ये काहीही नाहीये. अगदी पूर्णपणेच्या पूर्णपणे जो हिलींग कोड आहे तो तुम्हाला मोफत मिळणार आहे. मात्र ज्यांना संग्रह म्हणून ठेवायचा असेल त्यांना मात्र त्याची कॅसेट विकत घ्यावी लागेल. मात्र कृपया तिकडे मोबाईल घेऊन ते रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करू नका. आलं लक्षामध्ये? तिकडे तुमचे रेकॉर्डर काही काढून घेणार नाही. पण तिकडचं मॅग्नेटीक फिल्ड तुम्ही दुषित करू नका. उद्या पाहिजे तर एका मित्राने सीडी घेतली आणि दहा जणांनी कॉपी केली मला काही प्रॉब्लेम नाही. मला काय पैसा कमवायची इच्छा नाहीये. किंवा संस्थेलाही नाहीये. पण तिकडे मात्र उगीच काहीतरी गडबड घोटाळा करू नका. ते वातावरण तिकडचं तसंच चार्ज राहू द्या. सुंदर राहू द्या. आलं लक्षामध्ये? आणि मग जाऊन पुष्करिणी मध्ये ते अर्पण करायचंय. तिकडे तुमच्या अंगावर ते पाण्याचे थेंब उडणारच आहेत. त्यानंतर तुम्हाला तीर्थ आणि प्रसाद मिळणारच आहे. तुम्ही एक दिवस या. दोन दिवस या. दररोज या. सकाळ संध्याकाळ या. मात्र रांगेतून या. आलं लक्षामध्ये? प्रेमाने हे सगळं, सगळ्यांच्यासाठी ही अगदी व्यवस्थित करायची गोष्ट आहे. मोकळेपणाने, कुठल्याही गोष्टी साठी एक महापूजन सोडलं तिकडे तर, पण ती पूर्ण वेगळी संकल्पना आहे.पण श्रीश्‍वासम् साठी कोणाला काही माझ्याकडे पैसा नाही म्हणून मला श्रीश्‍वासम् मिळू शकत नाही असं कधीही होऊ शकत नाही. आलं लक्षामध्ये? क्लियर? हां! तर मुंबईच्या कालगणनेनुसार हल्ली काही चांगल्या अभ्यास.. ह्यांनी केलाय की सकाळी 5 ते 7 हे टाईमींग जे आहे त्याच्यामध्ये अश्‍विनीकुमारांची स्पंदन आपल्या माणसांना मिळू शकतात. 5 ते 7 मध्ये आलं लक्षामध्ये? साधारणपणे 5 ते 7. आता इथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे की स्वस्तिक हे जे चिह्न आहे, हे चिह्नच आपल्याला दाखवतं की ह्याचे हे चार हस्त जे आहेत. हे चार हस्त मानले आहेत हे अनंत आहेत. हे वाढवू तेवढे वाढवले जाऊ शकतात. एकमेकांना छेद न करता. हे स्वस्तिक इज अ सिम्बॉल ऑफ हिलींग कोड. स्वस्तिक म्हणजे काय? आपण मागे अल्गोरिदम बघितलेले आहेत. आणि त्या सगळ्या अल्गोरिदम मधूनच हा हिलींग कोड बनलाय. तर ही चिह्न आहेत, स्वस्तिक के कसलं चिह्न आहे? सिम्बॉल कसला आहे? तर हिलींग पॉवरचा. तर निरोगीकरण शक्तीचा. आरोग्यदायिनी शक्तीचा, आपत्तीनिवारक शक्तीचा हा सिम्बॉल आहे. आणि हे जे चार हस्त जे आहेत तर हे चार हस्त म्हणजे आहार, विहार, आचार, विचार. आहार, निद्रा, भय, मैथून ह्या चारी गोष्टींवर काम करणारे आहेत. आणि म्हणून सगळ्या भारतीयांना जो अतिशय मानलेला प्रेमाने आदराने मानलेला मंत्र आहे त्याला स्वस्तिमंत्र म्हणतो आपण. त्यालाच दुसरं नाव आहे वेदांमध्ये ‘ख स्वस्तिक’, ख-स्वस्तिक म्हणजे कुठला?

  ‘ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः। स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः । स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः। स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु॥ आलं लक्षामध्ये? हा जो स्वस्तिमंत्र आपण अनेक ठिकाणी ऐकतो यालाच म्हणतात ख-स्वस्तिक. ख म्हणजे आभाळ, आकाश. खग म्हणजे पक्षी. खे गच्छति इति खगः। म्हणजे जो आकाशात उडी घेतो तो पक्षी आहे. आणि त्याचप्रमाणे खगात जो भ्रमण करतो, म्हणजे ख म्हणजे आकाशामध्ये, तो ही सूर्य. म्हणजे आकाशामध्ये तो ही सूर्य, म्हणजे खगच आहे. आलं लक्षामध्ये? तर हे स्वस्तिक, तेे ‘खग’ म्हणजेच सूर्याचं प्रतिक मानलं जातं. इथे इंद्र हा सूर्यच आहे. ह्यातला इंद्रः. त्यातली इंद्राची चार नावं आहेत. ती ह्या मूलाधार चक्रातील चार पाकळ्यावर कार्य करणारी शक्ती आहेत. म्हणजे स्वस्तिक चिह्न जे आहे, ते शुभ चिह्न का आहे, तर हे सगळ्या प्रकारच्य हेल्थचं सिम्बॉल आहे. चिह्न आहे. आलं लक्षामध्ये? समजलं? तर हे स्वस्तिक चिह्न खरोखरच म्हणून अत्यंत सुंदर आहे. त्यानंतर आपण त्रिविक्रमाचा दुसरा श्लोक मागे मी तुम्हाला सांगितला होता, रामराज्याच्या वेळीस. आठवतो का कुणाला?

‘ॐ त्रातारं इन्द्रं अवितारं इन्द्रं हवे हवे सुहवं शूरं इन्द्रम् । ह्वयामि शक्रं पुरुहूतं इन्द्रं स्वस्ति न: मघवा धातु इन्द्र:॥

त्रातारं इन्द्रं अवितारं इन्द्रं. त्रातारं इन्द्रं म्हणजे जो एकदा रोग झाला की त्याला त्यातून तारण करतो, वाचवतो. संकट आलं की वाचवतो तो त्रातारं इन्द्रं. अवितारं इन्द्रं म्हणजे संकट येण्याच्या आधीच जो वाचवतो, रोग येतायेताच जो थांबवतो तो अवितारं इन्द्रं. ‘ॐ त्रातारं इन्द्रं अवितारं इन्द्रं हवे हवे सुहवं शूरं इन्द्रम् । ह्वयामि शक्रं पुरुहूतं इन्द्रं स्वस्ति न: मघवा धातु इन्द्र: ॥ आंघोळ करताना म्हणायचा मंत्र होता. अनेकांनी आठ दिवस म्हटला. मग सोडून दिला. विसरलो. कोण कोण दररोज म्हणतात? आं हा हा हा (बापूंनी टाळ्या वाजविल्या) मी टाळ्या वाजविल्या प्रेमाने अतिशय कारण मला आनंद वाटतोय. कारण मला आनंद वाटतोय माझ बोलण चूक ठरल्याचा. आनंद आहे मला येस! बरोबर आहे. अरे डेफिनेटली बापाला ह्याचा आनंदच होणार, डेफिनेटली होणार. आय अ‍ॅम सो हॅप्पी हे म्हणत रहा. ह्या मंत्रामध्ये खूप मोठी ताकद आहे बाळानों! आज लाखो वर्ष…आपण आज इतिहास बघतोय प्रत्यक्षमधून, लाखो वर्ष म्हटले गेलेले मंत्र आहेत. अतिशय पवित्र मंत्र आहे. हा मंत्रसुद्धा आपल्या जीवनात आंघोळ करताना असेल. तर आता त्रिविक्रमाची नाव तुम्हाला सांगतो, ज्यांना पाहिजे लिहून घ्या. त्रिविक्रमाला कुठल्या कुठल्या नावांनी ओळखल जात तर – जातवेद:। जातवेद: हे एक नाव आहे. मघाशी श्रीसूक्तामध्ये तुम्ही ऐकल असेल ‘जातवेदो महावह:’ बरोबर – जातवेद. जातवेद हे एक नाव आहे. दुसर नाव आहे समाग्नि. शरीरामधला अग्नि सम असणं म्हणजे जास्तही नाही आणि कमी ही नाही. व्यवस्थित असणं, ही स्थिती म्हणजे आरोग्य स्थिती म्हणून ह्याच नाव आहे – समाग्नि. ह्याचं तिसरं नाव आहे – मित्राग्नि. म्हणजे अग्नि जो मैत्रीपूर्ण आहे. जो दाहक ठरत नाही, त्रासदायक ठरत नाही. जातवेद, समाग्नि, मित्राग्नि. चौथं नाव आहे – श्रीशब्द. श्रीशब्द म्हणजे मातेचा शब्द, आदिमातेचा शब्द. त्यानंतर – अंबज्ञ हे सुद्धा त्रिविक्रमाचं नाव आहे. अंबज्ञ म्हणजे त्रिविक्रम. त्यानंतर – क्षमेन्द्र. क्षमेन्द्र – त्रिविक्रमासारखा कोणीच सापडणार नाही म्हणून त्याला क्षमेन्द्र दिलेलं नाव आईने. आणि सातवं नाव आहे – श्रीश्‍वास. सातवं नाव आहे – श्रीश्‍वास. आणि आठवं नाव आहे – इंद्रनाथ. इंद्राचा नाथ जो आहे तो. ओ.के. तर ही त्रिविक्रमाची आठ नाव प्रमुख नाव मानलेली आहेत. ओ.के. आता इथे जे आपण पहिल दाखवल ती हाताची क्लिप दाखवा जरा बाळानों अगदी पहिली, आईच्या नंतरची- जल, पृथ्वी, आकाश, वायु, अग्नी हे लक्षात घ्यायचं हे का दाखवलं बापुंनीं आम्हाला? उगीचच्या उगीच तर नाही. आपल्या हातांमध्ये जबरदस्त पॉवर आहे. आपली सप्तचक्र, आणि आपल्या निरनिराळ्या नाड्या ह्याच्यामध्ये केवळ आपल्या हाताच्या मुद्रा जर आपण शिकलो…आज मी तुम्हा दाखवणार नाही, कॉपी-बीपी करू नका. पुस्तिकेमध्ये तुम्हाला मिळतील. व्यवस्थित काढून मिळतील. इकडे चुकीचं काढलं तर त्याचा काही उपयोग होणार नाही. त्रास काही होणार नाही. पण हाताची पाच बोट ह्या पंचमहाभूतांची असल्यामुळे, त्यांच्या विशिष्ट हालचालींमुळे आपल्या शरीरातला इलेक्ट्रोमॅग्नेटिक चार्ज उचित दिशेने प्रवाहित करण सोप पडत. आलं लक्षामध्ये, त्यामुळे ह्यातली कुठली मुद्रा कशासाठी वापरायची वगैरे मी पुस्तिकेमध्ये सगळ देईन. ते आता मला सांगत बसणं शक्य होणार नाही. पण ही अवधूत मुद्रा आहे. आलं लक्षामध्ये. ही एका हाताने करायची, दोन हाताने करायची ते मी सगळ सांगीन. अवधूत मुद्रा आहे, आलं लक्षामध्ये? अवधूत शब्द खूप महत्त्वाचा आहे. आपण ‘अवधूत चिंतन’ केलं, मग ‘प्रसन्नोत्सव’ केला आणि आता ‘श्रीश्‍वासम्’ करतोय. आणि आपण नेहमी काय म्हणतो – ‘अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त।’ तर ही ‘अवधूत मुद्रा’ आहे लक्षात ठेवा. नेस्क्ट. ही ‘अंबा मुद्रा’ आहे. त्या आईची मुद्रा आहे ही. ओ.के? हे बोटाचे वेडेवाकडे चाळे नाही आहेत काही. आलं लक्षामध्ये? हे आपल्या शरीरातली शक्ती केंद्र नीट जागृत करण्याची गोष्ट आहे, आणि हे तुम्हाला शिकवण्याची सुद्धा व्यवस्था केली जाईल. काही शिक्षक तयार होतील. ते तुम्हाला इथेही शिकवतील. केंद्रावर येऊन पण शिकवतील. लांब-लांबच्या गावातील केंद्रावर पण येऊन शिकवतील ह्याच्याविषयी. आलं लक्षामध्ये? पण उगीच कोणी आलाय कोठून आणि शिकवतोय असं पण होणार नाही. समजलं? प्लीज. तर ही अंबा मुद्रा. त्यानंतर नेस्क्ट आंजनेय मुद्रा. दत्तात्रेय मुद्रा, अंबा मुद्रा, आंजनेय मुद्रा. बापू ही अशी बोट केल्याने काय होतं? ते काय होत ती जेव्हा एकत्रित येतात तेव्हाच कळत. आलं लक्षामध्ये? आणि कमीतकमी सात मिनीट ठेवायची असतात. जास्तीत जास्त किती वेळ, ते सगळ शास्त्र तुम्हाला शिकवल जाईल. डू नॉट वरी. बाकीचे म्हणतील बापू आम्ही एवढे लांबून आज आलेलो आहोत. तुम्ही ज्या गावाला असाल त्या गावाला येऊन ते शिकवल जाईल. तसच्या तसं निर्धास्त रहा. काळजी करू नका. आलं लक्षामध्ये? कारण एक महत्त्वाची गोष्ट नेहमी मी ऐकतो – ‘बापू तुमची मुंबईची माणस’. मुंबईची माणस जेवढी माझी, तेवढी रत्नागिरिची माणसही माझी, तेवढीच कोल्हापूरची माणस माझी, तेवढीच कर्नाटकातली माणस माझी, तेवढीच उत्तर प्रदेशमधली माणस माझी, तेवढीच तामिळनाडू मधली माणस माझी. ओ.के. सिंपल. त्यानंतर आंजनेय मुद्रा म्हणजे हनुमंत मुद्रा. त्यानंतर त्रिविक्रम मुद्रा. त्यानंतर शिवलिंग मुद्रा इथे शिवलिंग आपोआप तयार होतय आपोआप अंगठ्याद्वारे तुमच्या, डाव्या हाताच्या अंगठ्यामध्ये शिवलिंग तयार होतय ओके? ही शिवलिंग मुद्रा जी आहे ती सुद्धा खूप महत्त्वाची आहे. ह्या शिवलिंग मुद्रेतून काय काय होत ते शिकवताना समजावल जाईल ते प्रशिक्ष्क प्रत्येकाला नीट जमतय की नाही ते बघतील. काळजी करू नका. त्यानंतर नेक्स्ट रसमुद्रा, रसमुद्रा. शरीर आणि मन, जीवन रसरशीत करणारी मुद्रा आहे. नेस्क्ट. स्वतिमुद्रा किंवा हिला अरुला मुद्रा सुद्धा म्हणतात. अशा एकंदर सोळा मुद्रा आहेत. ह्या मुद्रासुद्धा तुम्हाला शिकवल्या जाणार आहेत. तुम्ही म्हणाल ह्या मुद्रांचा आणि श्रीश्‍वासमचा संबंध काय? तर म्हटल तर संबंध आहे. पण्अ क्करायलाच पाहिके असं काहे आवश्यक नाही. पण ह्या मुद्रा म्हणजे काय आहे? तर आपल्या हातामध्ये जी पंचतत्तव आहेत…दुसरा फोटो काढ…ही पंचमहाभूतांमधूनच सर्व वस्तू बनलेली आहे ना? प्रत्येक शरीर काय, प्रत्येक वस्तू काय, पृथ्वी काय, आकाश काय, ग्रह काय, तारे काय, हे सगळे कशा पासून बनलेले आहेत, पंचमहाभूतांपासूनच बनलेले आहेत. त्यांच्या विविध मिश्रणांपासून हे मूल घटक आहेत सृष्टीचे आणि त्या मूलघटकांची स्थान आपल्या ह्या पाच-पाच बोटांमध्ये आहेत. मनुष्य डावरा असो की उजवा असो त्याने प्रॉब्लेम नाही. पण दोन्ही ह्याच्यामधल्या निरनिराळ्या मुद्रांमध्ये बोटं वेगळी वेगळी जी एकत्र आणली जातात ज्या पोझिशनमध्ये केल्या जातात त्यामुळे बॅलन्स तयार होतो. आजार कधी उत्पन्न होतो जेव्हा ह्या पंचमहाभूतांमध्येच प्रॉब्लेम तयार होतो तेव्हा. आलं लक्षामध्ये? हे कसं हिलिंग कोड तुम्ही ऐकणार…त्यासाठी शांती पाहिजे. पण बसमध्ये बसल्या बसल्यासुद्धा…आलं लक्षामध्ये…त्यातली एखादी जरी मुद्रा तुम्ही कुठली शिकलात…कुठली मुद्रा शिकायची वगैरे तुम्हाला कळेलच…सगळ्या मुद्रा शिकल्यात तर चांगलच आहे. ती मुद्रा करत तुम्ही बसलात बस मध्ये शांतपणे डोळे बंद करून त्याचा फयदा तुम्हाला ़़होणारच आहे, अगदी कानाशी श्रीश्‍वासम असेल चांगल आहे नसेल चांगल आहे पण वाईट नाही. नामस्मरण करत असाल चांगल आहे, नामस्मरण करत नसाल चांगल आहे. पण ह्या मुद्रा तुमच जीवन पालटवू शकतात. ह्या मुद्रा तुमच्यावर येणार्‍या ज्या वाईट शक्ती असतात बाहेरच्या, जी वाईट स्पंदन असतात त्यांना परतवून लावू शकतात. आलं लक्षामध्ये? तर शिवलिंग मुद्रेचा एवढा प्रखर परिणाम अनेकांना माहित होता, पण आजच्या काळात…ते जर लोकांना जाहिरपणे सांगितल तर मी जर ताईत विकत असेन, आणि जादू आणि भूत काढण्याचे प्रयोग करत असेन तर माझा धंदा चालणार कसा? म्हणून हे योग्य ज्ञान सामान्य गरीब, साध्याभोळ्या माणसांपर्यंत पोहोचवल जात नाही. पण इथे जे सगळ आहे ते आईच आहे. एव्हरी थिंग बिलाँग्ज टू हर. तिच्या मालकीचं, म्हणजे आपल्या तिच्या प्रत्येक नातवंडाला ते मिळणार आहे. आलं लक्षामध्ये अतिशय शांतपणे सांगतो, ह्या मुद्रा ज्या काही आहेत त्या शिकण्यामध्ये खूप काही सौंदर्य आहे. खूप काही पवित्रता आहे, खूप काही चांगल आहे. आपण साधी माणस आहोत. दहा चुका होत असतात, दिवसाला शंभर होत असतात. वारंवार होत राहतात पण त्यातूनही मार्ग काढून पुढे जायच आहे. अडायच नाही, आयला मी हे केलं, असं झाल. आणि त्यांव झाल, तस झाल, तमुक झाल अरे काय मोठी गोष्ट आहे एवढी? काही नाही. यापुढे बाहेर या, तिच नाव घ्या, तिच्या पुत्राचं नाव घ्या. आणि पुढे चालायला लागा. कशाला मागच्या गोष्टी उगाळत बसता? काय उपयोग आहे त्याचा, काही नाही. काहीही उपयोग नाही. तुमचा भूतकाळ जर बदलायाचा असेल तर त्रिविक्रम समर्थ आहे तो जाईल तुमच्या भूतकाळामध्ये आणि रिपेयर कधी करून टाकेल तुम्हाला कळणार पण नाही. आयला रिपेअर झाला! येस रिपेअर झाला! आलं लक्षामध्ये त्यामुळे आम्हाला माहिती पाहिजे की हे जे हिलिंग कोड आम्हाला मिळालं आहे, हा हिलिंग कोड आम्हाला त्यादिवशी प्रकट होणार आहे. त्याच्यामागे 2011 पासूनची जी मी तपश्‍चर्या करतोय ती संपूर्ण तपश्चर्या, त्याच्याबरोबर आपले सगळे जप, त्यानंतर तुम्ही हे सर्व पठण वगैरे जे काय करता त्यातून तुम्हाला तो जो दसपट फळ देतो, त्याच्यानंतर सुद्धा तो जो व्याज देऊ इच्छितो हे त्याने व्याज बाजूला काढून ठेवलेलं होतं म्हणजे एक पटीच त्याने तुम्हाला दसपट दिल दररोज, ताबडतोब त्याच्याकडे रोकडा व्यवहार असतो. तुम्ही एकदा वाचल रामरसायन खाली बसून दसपट फळ मिळत आम्हाला माहिती आहे पण बसायचे कष्ट घेतो कोण? रात्री जागणार कोण? दिवसा आम्हाला झिंगल्यासारखी परिस्थिती होते दॅट इज बॅड. दॅट इज नॉट करेक्ट बरोबर की नाही? तर आपल्यला ते दहापट मिळत त्याच्याशिवाय तो एक्स्ट्रा जे काढून ठेवतो ते सगळ जमा करून त्यातून हे निमार्ण केल जातय आणि दिल जातय अखंडपणे कारण सांगू, प्रॉब्लेम कसा झला माहितय का? की मी तुम्हाला ते पाच शब्द सांगितले होते नं? आठवतात का? मला माहिती आहे, मी हिन्दी प्रवचनात सांगितले होते त्यामुळे जे नसतील त्यांना माङ्गी आहे. अरुला म्हणजे ग्रेस – आईचा अनुग्रह – आईचं अन मेरिटेड फेव्हर. आईने आपली लायकी नसताना केलेला अनुग्रह आपल्यावर म्हणजे अरुला. इरूल म्हणजे डार्कनेस – अंध:कार किंवा भय बरोबर, मारुल म्हणजे भ्रम म्हणजे चूकीची समजूत होणं बरोबर? मारूल म्हणजे भ्रम आणि थिरुला पण एक शक्ती आहे म्हणजे द पॉवर ऑफ नथिंगनेस. दारुलचा अर्थ आहे दारुल म्हणजे ब्लासफेमी म्हणजे देवाला शिव्या घालणं, देवाला नाकारण बरोबर म्हणजे दारुल. आणि थिरुल म्हणजे पॉवर ऑफ नथिंगनेस. म्हणजे तुमच्याकडे काहीही नसतानासुध्दा, तुमच्याकडे पाप असतानासुद्धा, तुम्ही काहीही केललं नसतानासुद्धा म्हणजे तिच नाव घ्यायची तयारी नसतानासुद्धा नास्तिकांकरता सुद्धा ती जी पॉवर रिझर्व्ह मध्ये ठेवते आई बाजूला ठेवते ती पॉवर- ती शक्ती म्हणजे थिरुला. ह्या पाच गोष्टी आपण समजावून घेतल्या की आपल्याला कळत त्या आईची महत्ता काय आहे? सगळी रोगराई निर्माण होते ह्या इरूल, मारूल आणि दारूलमुळे आणि त्याचा जो उपाय जो आहे – तो अरुला आणि थिरुला. आपण श्रद्धावान आहोत आपल्याला थिरुला वापरायची गरजच नाही पडली पाहिजे. आपल्यासाठी अरुलाच पुरेशी आहे. आर यु गेटींग? नक्की? निश्‍चितपणे किती टक्के? 108%. तर देवाचा शब्द, आदिमातेचा शब्द, आदिमातेचा श्‍वास हाच बेसिक उपचार आहे हे लक्षात ठेवून मग बाकीची औषध करायचीत. सर्जरी करायच, सगळं करायच आलं लक्षामध्ये. पण काळजी करायच कारण नसत. सगळ्या गोष्टी ठीक होऊ शकतात पण कधी? जेव्हा आमचा ठाम विश्‍वास असतो की देव बदलत नाही. कुठल्याही युगामध्ये आणि म्हणून देवाचा शब्द बदलत नाही. बाबा रामाने वचन दिल एवढ्यावर्षांपूर्वी, बरोबर? दत्तमहाराजांनी मेलेल्याला जिवंत केलय एवढ्या काळामध्ये, आजारी पडलेल्या, एकोणीस वर्ष आजारी पडलेल्या माणसाला जिवंत केल तेव्हा द्वापार युगामध्ये बरोबर, आता आम्ही कलियुगात आहोत. अरे,बाबा तर किती, अजून शंभर वर्ष नाही झालीत बाबांना देह त्यागून. शंभर वर्षापूर्वी जो बोलून गेला ते तरी विश्‍वास ठेवा. ‘माझा जो जाहला काया वाचा मनी। तयाचा मी ऋणी सर्वकाळ।’ ‘नवसास माझी पावेल समाधी। धरा दृढबुद्धी माझ्या ठायी।’ बरोबर ही वचन आपल्याला आठवली पाहिजेत. त्यामुळे आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे की, ‘हे गुह्यसुक्त म्हणजे हिलिंग कोड आहे. हे गुह्यसुक्त आहे, ही गुप्त किल्ली आहे. ही गुप्त चावी आहे आपल्याला…का मिळतय बीकॉज ऑफ हर ग्रेस, आपल्या आईच्या आपल्यावरच्या अनावर प्रेमामुळे मिळत आहे आणि ह्याचा उपयोग होणारच आहे. आपण नीट करून घ्यायला हवा. आलं लक्षामध्ये. उद्या कोण म्हणेल बापू सगळे अमर होणार की काय? नाही, नाही, अमर-बिमर काय नाही. प्रत्येकाला जन्माला आलेल्याला त्याला जायाचच असत. मी तुम्हाला ङ्गालतु आश्‍वासन देत नाही कारण ते खोट आहे. तो खोटारडेपणा आहे. देवानांसुद्धा, सगळे 33 कोटी देव जे तुम्ही म्हणता नं, त्यांनासुद्धा प्रयलामध्ये बुडावच लागत आणि त्यांना परत निर्मांण व्हाव लागत. एक लक्षात ठेवा. त्यालाही किती दु:ख असेल नं, पेन नसेल? डुबवायला काय आनंद होत नाही त्याला. लक्षात ठेवा बरोबर. आणि त्यासाठी हा हिलिंग कोड आहे बेसिकली, शारिरीक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या, सांपत्तिक दृष्ट्या, जीवनी दृष्ट्या, किर्तीच्या दृष्टीने, अनुभवाच्या दृष्टीने, सुखाच्या दृष्टीने आपल्याला सदैव आरोग्य संपन्न राहायचं आहे. आणि त्यासाठी देव आतुर आहे. तो त्रिविक्रम आतुर आहे आणि ती आदिमाता आपली सगळ्यांची जी मोठी आई ती खरच तयार आहे प्रत्येकाला, प्रत्येक गोष्ट आपल्याला देण्यासाठी. ‘उतुन चालला आहे खजिना….. खरा मायेचा पूत असावा’ साईबाबानीं स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे ते आपण लक्षात घ्यायला पाहिजे एन्ड व्हाय हि व्हील हिल मी? तो मला का दुरुस्त करेल? ती आई मला का बरं करेल?तिची इच्छा तशीच आहे म्हणून! हे लक्षात घ्या. आईची इच्छा मुलांनी आजारी पडाव आणि रोगाने तडफडावं अशी कधीच नसते. पण प्रारब्धानुसार जे काही येत, त्यातून मार्ग काढायाचाच प्रयत्न तिचा आणि तिच्या पुत्राचा असतो लक्षात ठेवा. आणि त्यासाठी श्रीस्वतिक्षेम संवाद आहे. तशीच हा काय आहे – ‘वैश्‍विक निरोगीकरण गुह्यसूक्तम’म्हणजेच ‘स्वस्तिकविद्या’! म्हणजेच काय ‘स्वस्तिकविद्या’ समजल? ही स्वस्तिकविद्या म्हणजे मोठी-मोठी अशी ह्यानीं भरलेली नाही आहे. ही प्रेमाने भरलेली आहे आईच्या, आशीवार्दाने भरलेली आहे. ही कुठल्या धनामध्ये तोलली जाऊ शकत नाही. हिची किंमत कसलीच करायची नाही. जशी ‘हरि अनंता। हरि कथा अनंता’ तशी आपली आदिमाता अनंत आहे आणि तिची क्षमाही अनंत आहे. तिला का क्षमा करावीशी वाटते? त्या त्रिविक्रमाचं नाव क्षमेन्द्र का आहे? त्याला क्षमा करायची इच्छा आहे. म्हणून जर त्याने मानव बनवला त्रिविक्रमाने, तर त्याला माहित नाही का की, हा मानव चुकू शकतो. त्याला कर्मस्वातंत्र्य दिल्यानंतर तो गैरवापर करू शकतो. तुम्ही तुमच्या मूलाच्या हातामध्ये, लहान मूलाच्या- दोन-तीन वर्षाच्या हातामध्ये तुमचा मोबाईल खेळायला दिलात आणि त्याच्यानंतर तो पडला आणि टला, त्याने त्याच कर्मस्वातंत्र्य वापरल. त्याने चेंडू सारखा फेकला, तुम्ही त्या मुलाचा गळा दाबणार आहात का? नाही, कधीच नाही बरोबर. म्हणजेच काय जे हे आपल्या साध्या मानवांना कळत तर त्या मोठ्या आईला, तिच्या लेकरला, त्या त्रिविक्रमाला, त्या परमात्म्याला कळत नाही का? की ह्या मानवांना आपण कर्मस्वातंत्र्य दिलयं, त्यांच्या हातून चूकीचा वापर होऊ शकतो. ते चूका करू शकतात, पापं करू शकतात. आणि म्हणूनच त्यांनी क्षमा ओपन ठेवलेली आहे. पण कधी? क्षमा तेव्हाच मिळते जेव्हा आपल्याला चूक पकडल्या गेल्याबद्दल वाईट वाटत तेव्हा नाही, तर आपण चूक करतो तेव्हा जे वाईट वाटत. बस! तेवढ पुरेस आहे, की क्षमा मिळालीच कळलं. ही क्षमा प्रत्येकासाठी आहे. आईचे ते उपनिषदातले शब्द लक्षात ठेवायचेत ‘मी तुमच्यासाठी देखील अशीच धावत येईन’ ओ.के. आणि आज पासून एक निश्‍चय आपण करायचा आहे. टाळ्या वाजवायच्या मी सांगीन तुम्हाला तेव्हा. आपल्या आनंद झाल नं, की आपण काय म्हणतो, ऊंऽऽऊंऊं करतो, बरोबर की नाही येस चांगली गोष्ट आहे आणि नवीन पद्धतीनुसार जे करायचय ते जरूर करा. पण त्याऐवजी जोरात आज सगळे जण ओरडायच आनंदाने ‘जग जगदंब । जय दुर्गे।’ समजल. कधी आनंद झाला की काय आलं पाहिजे, अरे मुलगा पहिला आला……जय जगदंब। जय दुर्गे।, मॅचमध्ये मस्त सिक्सर मारली….जय जगदंब। जय दुर्गे।, एक मस्त गोल केला….जय जगदंब। जय दुर्गे। आलं लक्षामध्ये, कळतय? नक्की. तर आज पासून जसे आपण ‘अंबज्ञ’ शब्द वापरायला लागलो, तस आपण ‘जय जगदंब। जय दुर्गे’ म्हणणार. आपल्याला अतीव आनंद झाला, ऊंऽऽऊंऊं जरूर करा पण ते ‘जय जगदंब। जय दुर्गे’ म्हणा नं काय बिघडल. स्टाईल काहीही असो, व्हॉट इज द प्रॉब्लेम? मी काळानुसारच बदलणारा माणूस आहे. आता सगळ्यांनी म्हणायच एकदम ‘जय जगदंब। जय दुर्गे’ तुम्हाला पाहिजे तसे हात करून म्हणायच हं. नक्की, मी बोलणार नाही तुम्ही सगळ्यांनी म्हणायच आहे. मी म्हणणारं वन-टू-थ्री की तुम्ही म्हणायच. वन-टू-थ्री ‘जय जगदंब। जय दुर्गे’ ‘जय जगदंब। जय दुर्गे’ ‘जय जगदंब। जय दुर्गे’ येस ओ.के.! कधी दर्‍याखोर्‍यात फिरायला गेलात नं तर आकाशाकडे बघून अशी जोरात हाक मारा, जोर जोरात ओरडत फिरा. अरे काय मजा येईल तुम्हाला सांगतो. निसर्गातून अष्टधा प्रकृती तीच आहे. ती वनस्पतींमधून, झर्‍यामंधून, डोंगरांमधून, पर्वतांमधून, आकाशामधून सगळीकडे तिची ऊर्जा तुम्हाला पाठवेल आणि आज मला खात्री आहे की माझं प्रत्येक बाळं वाचणारच आहे.

ll हरि ॐ ll ll श्रीराम ll ll अंबज्ञ ll