श्रीगंगा त्रिवेणी Algorithm (Shree Ganga Triveni-algorithm)

रवा म्हणजे १९ सप्टेंबर २०१३ रोजी सद्‌गुरू बापूंनी ’श्रीगंगा त्रिवेणी Algorithm’ सर्व श्रध्दावानांना समजावले. ह्या वेळेस बापूंनी Pascal Triangle चा देखील या algorithm शी असलेला संदर्भ दिला. श्रीगंगा त्रिवेणी algorithm बद्दल बोलताना बापू म्हणाले, “गंगा – यमुना – सरस्वती या तीन नद्यांचा जेथे संगम होतो त्याला त्रिवेणी संगम म्हणतात. गंगा, यमुना व सरस्वती ह्या नद्या आपल्या देहात इडा, पिंगला व सुषुम्ना नाड्यांच्या रूपात असतात”. मनुष्याच्या कपाळाच्या मध्यभागी म्हणजेच आज्ञाचक्रामध्ये ह्या तीन नाड्यांचा त्रिवेणी संगम होतो. सुषुम्नेमध्ये हनुमंताचा संचार असतो म्हणजेच तिच्यात महाप्राणाचे साम्राज्य असते.

आमच्या मनातील गंगा, यमुना सरस्वतीचा संगम आम्हांला माहिती असणे आवश्यक आहे. ह्या तीन नद्यांच्या त्रिवेणी संगमात स्नान केली की आपल्या सगळ्या पापांचं क्षालन होतं असा सिध्दांत आहे. पण त्रिवेणी संगमात खरे स्नान करणे म्हणजे आपल्या मनातल्या गंगा, यमुना सरस्वतीच्या संगमात म्हणजेच इडा, पिंगला व सुषुम्नेच्या संगमात स्नान करणे; व ही संधी प्रत्येकाला मिळणे शक्य आहे.

वरील आकृति आपल्या देहातील इडा, पिंगला व सुषुम्ना म्हणजेच गंगा, यमुना व सरस्वतीचे कार्य दर्शविते. या त्रिकोनात १ ते ९ व ० हे अंक एका ठराविक क्रमाने येतात. फक्त सुषुम्ना नाडीवर आपल्याला शून्य दिसतो. ही शून्यावस्था म्हणजेच शांत-तृप्त अवस्था म्हणजेच पूर्णत्व. हनुमंत पूर्ण आहे. म्हणून त्याचा सुषुम्ना नाडीमध्ये संचार असतो. ह्या सुषुम्नेलाच ’ज्योतिषमति’ देखील म्हणतात कारण ही पुढचे जाणते.

पण या गंगा-त्रिवेणीच्या त्रिकोणात स्नान कसं करायचं? आपल्या आवडत्या देवाच्या प्रतिमेला (मुर्ती / फ्रेम) अभिषेक करताना ताम्हणाखाली हा श्रीगंगा त्रिवेणी algorithm काढलेला कागद ठेवावा. यामुळे गंगा-त्रिवेणी संगमाचे पावित्र्य अभिषेकाच्या तीर्थात अवतरते. त्यानंतर देवाच्या अभिषोक्त प्रतिमेला अत्यंत प्रेमाने व काळजीपूर्वक पुसावे. अभिषेक केल्यावर हे तीर्थ गंगा, यमुना, सरस्वतीचे स्मरण करत आपण प्राशन करावे. हे जल गंगा, यमुना, सरस्वतीचेच आहे, हा भाव ठेवावा. त्याचबरोबर आपल्यावर जे कोणी खरंखुरं प्रेम करतं त्या प्रत्येकासाठी हे तीर्थ आपण प्राशन करत आहोत हा भाव सुध्दा असावा. तीर्थ घेतल्यावर तो ओला हात आपले दोन्ही डोळे, आज्ञाचक्र व डोक्याच्या मागे म्हणजे Circle of Willis च्या ठिकाणी लावावे. असा अभिषेक जर आपण रोज केला तर ते आपल्याला ह्या त्रिवेणी संगमात स्नान करण्याप्रमाणेच आहे.

हे चिन्ह काढताना वरती श्रीगंगा त्रिवेणी लिहावे. त्याच्याखाली मध्यभागी algorithm चे चिन्ह काढावे. चिन्हाच्या खाली आपल्या आवडत्या देवाचे नाव लिहावे. कागदावर, कपड्यावर लिहून देव्हार्‍याच्या खाली हे algorithm ठेवले तर श्रेयस्कर. समजा चुकून आपण ह्या प्रतिमेला हळद-कुंकू लावायला विसरलो तरीही चालेल. फक्त आपण जे करु ते प्रेमाने करावे. ह्या algorithmची प्रतिमा आपल्या गाडीत ठेवली तरी चालेल कारण, यात या प्रतिमेवर सूर्यकिरणांचा अभिषेक होतो. भारतीय संस्कृतीत सूर्यकिरणांचा अभिषेक हा अतिशय पवित्र व सर्वोत्तम मानला जातो. हे algorithm आपण रांगोळीमध्येही काढू शकतो व ह्यात कुठलेही रंग वापरले तरी चालतात. हे गंगा-त्रिवेणीचे चिन्ह आपण ज्या वस्त्रावर देव ठेवतो, त्या वस्त्राखाली ठेवले तर देवपूजेच्या वेळी आपल्या हातून काहीही चुका झाल्यास त्याची भिती बाळगायचे कारण नाही.

தமிழ் ಕನ್ನಡ

Related Post

5 Comments


  1. Hari Om. Dear Samir Dada, Thanks for a clear, concise, and to the point summary of “Shri Ganga Triveni”. Appreciate it very much. Hari Om.


  2. Hari Om Samirdada. Lots of AMBADNYA !!!! I was eagerly waiting for this article to appear on your blog. Finally because of your fastest mail on this blog, we are able to have bath in this holy SHREE GANGA TRIVENI SANGAM, from today. Really BAPU teaches us in an unique way to co-relate spiritualism and Science in day to day life. On every step of life we get so many promises from Bapu to have steadfast devotion , trust at HIS lotus feet and Dada you gave us this assurance again and again and guide us how to hold Bapu’s hand with complete trust and love…
    We are AMBADNYA and we are fortunate to have this PARMATTRAYI in our life.
    AMBADNYA!!!


  3. Hari Om DADA ! Ambadnya,These article is really an helping hand for to understand the Thursday course by P.P.BAPu much well and in better and perfect way.I rem.once in pravachan P.P.Bapu had said to imagine how would it be when your mother holding your hand and taking you to school till your classroom and when the lecture starts you find your mother standing and teaching you in class and further again mother at home helping you with your Homework.Same is with these Blog article.Trying to make us aware of FACT.to know the Good things to be Good.The combination of science and Adyatma is really interesting .AMBADNYA. Right from GURUKUL To HARI GURU GRAM.journey is very interesting.And above all Again our P.P.BAPU is with us when we think in mind “is it I have understood properly” The rythem of words flow through ears” I’am with u my child do not worry.”Ambadnya.

Leave a Reply