श्रीसूक्तम्‌ मनाला स्पर्श करते (Shree Suktam touches the mind) - Aniruddha Bapu‬ ‪

परमपूज्य सद्‍गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २८ मे २०१५ च्या मराठी प्रवचनात ‘श्रीसूक्तम्‌ हे मनाला स्पर्श करते' (Shree Suktam touches the mind) याबाबत सांगितले.

हे श्रीसूक्तम्‌ (Shree Suktam) मनाला स्पर्श करते. महालक्ष्मी आणि लक्ष्मी या मायलेकींचे एकत्रित सूक्त असणारे असे हे श्रीसूक्तम्‌ आहे, ते आपल्या मनाला स्पर्श करते, अगदी अर्थ नाही कळला नाही तरीही. अर्थ कळला नाही म्हणून देवाच्या आणि आपल्या नात्यामध्ये बिघाड येत नाही असेही त्यांनी सांगितले.

एखाद्या व्यक्तीला संस्कृत येत नाही त्या व्यक्तीला जर संस्कृतमधील शिवी त्याला मंत्र म्हणून म्हणण्यास सांगितली आणि त्या व्यक्तीने जर ती शिवी भक्ती भावाने म्हटली तर त्याला त्या भक्तीचेच पुण्य लागेल. आणि मला म्हणजे ज्याने त्याला शिवी दिली त्याला मात्र त्याला चुकीचे सांगितल्याबद्दल शंभर पट पाप लागेल. हे उदाहरण देऊन त्यांनी देवाच्या आणि भक्ताच्या मध्ये कोणीही येऊ शकत नाही हे आपल्याला कळले पाहिजे असे स्पष्ट केले.

प्रार्थनेचा अर्थसुद्धा आपण आणि आपल्या परमेश्वराच्या मध्ये येऊ शकत नाही. एवढी खात्री आपण लक्षात ठेवली पाहिजे. ‘अर्थ - अर्थ’ आपणे एवढे पाठी लागतो पण नाही. प्रार्थना प्रेमाने म्हणायची असते आणि अर्थ प्रेमाने समझून घ्यायचा असतो. जास्त चिकित्सा केलेली चांगली नसते बापुंनी जे सांगितले, ते आपण या व्हिडिओ मध्ये पाहू शकता.

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥