हा खजिना लुटण्यासाठी बापूंनी (अनिरुध्दसिंह) गाडी सुरु केली आहे पंचशील पारिक्षांच्या मार्गाने. आता प्रयत्न आम्हा सगळ्यांनाच करायचे आहेत, कारण साद्गुरूंना प्रत्येकाने “जोर काढावे” अशी इच्छा असते, आणि म्हणूनच साईनाथ पुढे म्हणतात
बापूंनी त्यांच्या २ ऑगस्ट २०१२ च्या प्रवचनातून साईसच्चरित परिक्षेला का बसावे ते सांगितले होते. बापू (अनिरुद्धसिंह) म्हणाले होते, “साईसच्चरित पंचशील परिक्षा आम्ही का द्यायची? कारण जेव्हा आम्ही अभ्यास करतो तेव्हा ह्या कथा आम्हांला अधिक चांगल्या प्रकारे समजतात. आज प्रत्येक भाषेत साईसच्चरित उपलब्ध आहे. ही परिक्षा आमची भक्ती अधिक चांगली होण्यासाठी असते. पूर्वीच्या काळी संध्याकाळच्या वेळी मंदिरात कीर्तन व भजन करणे दैनंदिन दिनक्रमाचाच भाग असायचा. आज हे सर्व नाहीसे झाले आहे. पूर्वी दरवर्षी प्रत्येक तिथीप्रमाणे मग ती रामनवमी असो की आषाढी एकादशी असो त्या दिवसाच्या महात्म्यानुसार कीर्तने व्हायची. ज्यांनी हीच दरवर्षी होणारी कीर्तने नव्याने ऐकली त्यांचे आयुष्य बदलली. पंचशील परिक्षा म्हणजे श्री साईनाथांचे गुणसंकिर्तनच. तसेच साई – द गायडिंग स्पिरीट हा फोरम म्हणजे देखील गुणसंकिर्तनाची संधी आहे. वरील प्रवचनात बापूंनी (अनिरुद्धसिंह) सांगितले आहे की, किर्तन व भजन हा दैनंदिन जीवनाचा भाग असायचा. हा फोरममधील गुणसंकिर्तन आपल्या नित्यक्रमातील एक भाग झाला तर आपली देखील आयुष्ये नक्की बदलतील.
ह्या फोरमसाठी मला आलेल्या प्रतिसादावरुन एक गोष्ट कळली ती म्हणेज, आपण साईसच्चरित आणखीन आनंद घेऊ शकू.
बापू श्रीसाई सच्चरितच्या पंचशील परिक्षांसाठी शिकवताना |
आज मला जुन्या दिवसांची आठवण झाली जेव्हा बापूंनी (अनिरुद्धसिंह) पंचशील परिक्षा सुरु केल्या. तेव्हा बापू (अनिरुद्धसिंह) स्वतः शिकवित असत आणि परिक्षेच्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना भेटही देत असत. तेव्हाची बापूंची (अनिरुद्धसिंह) साईसचरितावरील श्रद्धा आणि त्यांच्या लेकरांनी परिक्षेला बसावे यासाठीची कळकळ अगदी तशीच नित्यनूतन आहे… हे तुम्हाला देखील जाणवेल. त्यासाठी २ ऑगस्टला २०१२ ला झालेल्या प्रवचनाची छोटीशी क्लिप पोस्टच्यावर दिली आहे. तसेच पंचशील परिक्षा ऑगस्ट २०१२ च्या प्रश्नपत्रिका देखील देत आहेत.ज्या तुम्ही खाली दिलेल्या लिंक्स्वर वाचू शकता.
Prathama%20to%20Pancham%
20Question%20Papers%20Aug%
202012.pdf
Practical%20Exam%20Aug%202012.
करितां माझिया कथांचे श्रवण । तयांचे कीर्तन आणि चिंतन । होईल मद्भक्तीचें जनन । अविद्यानिरसन रोकडें ॥८२॥
जेथें भक्ती श्रद्धान्वित । तयाचा मी नित्यांकित ।ये अर्थीं न व्हावे शंकित ।इतरत्र अप्राप्त मी सदा ॥८३॥
सद्भावें कथा परिसतां । निष्ठा उपजेल श्रोतयां चित्ता । सहज स्वानुभव स्वानंदता । सुखावस्था लाधेल ॥८४॥ …अध्याय २
Permalink
Hari Om!
It was lovely to read Kalpanaveera's description on the first exam. Wow….what lucky guys whom Bapu taught Himself. But we (the latecomers) are no less lucky as wee too now have an opportunity to loot the treasure which Bapu is willing to offer without any restrictions.
Shree Ram Kalpanaveera
Shree Ram Dada
Regards,
Sandeepsinh
Permalink
साई सतचरीताकडे एक पोथी म्हणूनच पाहिले जाई किंवा आजही बापूंकडे न येणारे त्याच्याकडे पारायण करण्याची पोथी म्हणूनच बघतात. परंतु प. पु. बापुंमुळे लोकांची दृष्टी बदलली आणि श्रद्धावान त्याचा अभ्यास करू लागले, त्यातील गर्भितार्थ शोधू लागले. ज्याला त्याला त्याच्या भावानुसार त्याचा अर्थ उमगला. हे शक्य झाले फक्त पंचशील परीक्षांमुळे! बापूंच्या नजरेतून ह्या अपौरुषेय ग्रंथाकडे आपण बघू लागलो, आणि त्याचा भावार्थ आपले जीवन बदलून गेला. साई सतचरीताचा अभ्यास तुकोबांच्या ओवी सार्थ ठरवितात.
II असाध्य ते साध्य करीता सायास कारण अभ्यास तुका म्हणे II
Permalink
हरी ओम दादा, अजूनही तो दिवस आठवतो जेव्हा परम पूज्य बापूंनी साई सत्चरितावर परीक्षा घेण्याची घोषणा केली. सगळ्यांच्या चेहऱ्यावर अनोखे कुतूहल. तोपर्यंत आमच्या घरी साई सत्चारित्र नव्हते. मी आणि आमचे पपा त्यावेळी दोघे नियमित प्रवचनांना यायचो. बापूंनी या परीक्षेबद्दल इतकी काही सुंदर संकल्पना आमच्यासमोर उभी केली की आम्ही दोघांनीही लगेच परीक्षेसाठी नावे देऊन टाकली. त्यानंतर सुंदर प्रवास सुरु झाला. दोन साई सत्चारित्र आणली, त्यावर बापूंची सही घेतली. मला बापूंनी नवविधा भक्तीच्या पानावर ( सौदागराच्या घोड्याच्या नऊ लेंड्या ) सही दिली. आमच्याबरोबरीने कितीतरी लहान, तरुण, वयस्कर, वृद्ध अशी अनेक मंडळी होती. किती भन्नाट उत्साह प्रत्येकाच्या चेहऱ्यावर! ती आय ई एस ची राजा शिवाजी शाळा, ते वर्ग. आम्ही पुन्हा पुन्हा साई सत्चारित्र ( पहिले दहा अध्याय) चाळत होतो. मला तर अर्धे डोक्यावरूनच गेले होते पण पपा समजावून सांगायचे आणि बापू स्वतः अनेक दाखले प्रवचनांतून द्यायचे. त्या नोटस त्यावेळी नव्याने कळल्या.
पहिला पेपर हाती आला आणि गाळलेल्या जागा भरा, जोड्या लावा, एका शब्दात उत्तरे लिहा, एका वाक्यात उत्तरे लिहा असा सोप्पा सोप्पा पेपर पाहून आम्ही खरोखरच लहान मुलांसारखे (एकदम पहिलीत असल्यासारखेच वाटत होते) खुश झालो होतो. पहिलाच पेपर असल्याने बापूंनी तो एकदमच सोप्पा काढला होता. पेपर लिहितानाही खूप आनंद, उत्साह होता. वातावरणात चैतन्य होते. आणि वर्गात आई बापू दादा आले आणि काय तो आनंद वर्णावा. बापूंनी आत शिरताच विचारले काय मग कसं वाटतंय? आणि बघता बघता जी काही चार पाच वाक्य बोलले त्यातून पेपर कसा लिहायचा आणि बापूंना काय अपेक्षित आहे हे प्रत्येकाला उमजले. बापूंनीच चक्क उत्तरे सांगितली म्हणा ना. जगातला एकमेव परीक्षक जो स्वतः पेपर देतो आणि स्वतः उत्तरेही फोडतो आमच्यावरील प्रेमासाठी हो ना. आम्हाला गोळ्या दिल्या. चहा पाणी होतेच. एकदम तैनात. रविवारी परीक्षा झाली आणि सोमवारी हाती रिझल्ट तोही स्वतः बापूंनी पहिले दहा ( top ten ) जाहीर केले. बापूंच्या हस्ते पेपर घ्यायचे. आम्ही तर ढगातच तरंगत होतो. माझ्या अगोदर एक बाई होत्या त्यांचा पेपर देताना बापू बोलले अगं तुला हे लिहायचा होतं न मग का नाही लिहिलंस? काही काळजी करू नकोस, त्याचेही मार्क दिलेत मी तुला. अगं ही भक्तीची, प्रेमाची परीक्षा आहे बुद्धीची नाही. पुन्हा असं करू नकोस, लिहायचं छान प्रेमाने. ते ऐकून इतकं मन भरून आलं, अजूनही तो प्रसंग डोळ्यांसमोर आहे. असे आमचे बापू भरभरून प्रेम लुटत आलेत सातत्याने, काय वर्णू त्याचा महिमा. काय गोड गुरूची शाळा, सकळ जनक जननींचा लळा.
Permalink
This comment has been removed by a blog administrator.
Permalink
Hari Om!
We had heard about Parampujya Bapu's statements on Panchasheel Exams but to see the video and hear His own voice is totally a different experience. Sagun roopachi tarhacha nyaaari…. and Shree Ram for giving this clip to us. Like chakor we are always hungry for the the cooling dew thats our Bapu.
Also got to see the papers. This exam will sure be different…..
Shree Ram
Permalink
हरि ओम. आज दादा आपल्य़ा सर्वांच्या लाडक्या बापूरायाचा आवाज ऐकायला , तेही प्रत्यक्ष घरी बसुन मिळाला, खूप खूप आनंद झाला. तुम्ही CD येण्या पूर्वीच बापूंचा आवाज ऐकविलात. खरेच आजि सोनियाचा दिनु वर्षे अमृताचा घनु , हरि पाहिला रे हरि पाहिला ….ह्या गाण्यातील आनंद , नाही नाही आनंदाचा खजिनाच लुटविलात. खूप खूप श्रीराम !!! पंचशील परिक्षेला परत परत बसण्याने खरोखरी अवर्णनीय आनंद लुटता येतो, प्रत्येक खेपेस नव्यानेच साईसच्चरितातील कथा उमगतात, माझ्या साई-अनिरुद्धाचे नवनवीन रुप अनुभवता येते, नित्यनूतन लीला न्याहाळायला मिळतात. बापूंचा आवाज ऐकुन परिक्षेला बसण्याची मनाला नव्याने उमेद मिळाली, उभारी आली. साक्षात, बापू सांगतात हे ऐकुन कोठे तरी परिक्षेला घाबरणार्या जीवांना हुरुप आला आहे. सतत त्याच त्याच परिक्षा परत परत देण्यामागचा माझा भाव मी शब्दांतुन सांगु शकत नव्हते, पण आज माझ्या बापूंमुळे ते अशक्य सहजप्राय शक्य झाले.गुणसंकीर्तनाचा हा महिमा, वारंवार श्रवण केल्याने होणारे आपल्यातील बदल , दर वर्षी मिळणारा नित्यनूतन जन्म हे बापूंच्या मुखातुन ऐकुन खूप धन्य धन्य वाटले.
खूप खूप श्रीराम !!!
सुनीतावीरा करंडे
Permalink
हरी ॐ दादा,
पंचशील परिक्षा प्रत्येक वेळी नव्याने आपल्याला भक्ती कशी करायची हे शिकवते.
श्री साई सच्चरित ह्या ग्रंथाची खरी ओळख बापूंकडे आल्यावरच झाली. प्रायमरी शाळेत असताना पहिल्यांदा शिर्डिला जाण्याचा मला योग आला होता ..तेव्हा बाबांबद्द्ल विशेष काही कळले नाही.पण तिथे श्री साईनाथांच्या वाचलेल्या गोष्टी आणि तिथले वातावरण ह्या सर्वांमध्ये एक वेगळंच प्रेम जाणवले. त्यानंतर अनेक वेळा शिर्डिला जाउन आले.तरी प्रत्येक वेळी एक नवा आनंद मिळाल्यासारखेच वाटायचे.
श्री साई सच्चरित ग्रंथ वाचताना्सुद्धा नेहमी त्या कथा आपल्यासमोर घडत आहेत असेच कायम वाटत राहते.
मला आठवतेय एकदा पंचशील परिक्षा बक्षिस समारंभानंतर प.पू.बापुंनी सर्व विद्यार्थ्यांना भेटल्यावर सांगितले होते की,”हे जे पेपर येतात ते तुमच्या मागच्या सहा महिन्यातील आयुष्याशी निगडीत असतात.आणि सर्व विद्यार्थ्यांचे पेपर मी (प.पू.बापू) स्वत: वाचतो.”
पंचशील परिक्षा म्हणजे माझा व माझ्या कुटुंबियांचा अत्यंत आवडीचा विषय. हा पेपर लिहिताना मिळणारा आनंद खरच खुप वेगळा असतो.
सर्वांना पेपर लिहिता यावा म्हणुन बापूंनी ह्या परिक्षेचे स्वरुप पण बदलले आहे ..आता कोणीही श्रद्धावान घरी बसुन हे परिक्षा देऊ शकतो …खरंच सद्रुरुमाऊलीच्या ह्या अकारण कारुण्यासाठी खुप खुप श्री राम.
Permalink
Shreeram Dada.P.P.Bapu again reminded the importance of reading and writing Panchsheel exams. Your blog keeps us updated and keep walking on the devyanipanth.We wait for update on the blog everyday.Dada Shreeram once again.