श्रीअश्‍वत्थमारुती पूजन ( Shree Ashwattha Pujan )

श्रीअश्‍वत्थमारुती पूजन, Hanuman, Hanumant, Aswattha, Bajrangbali, Bheem, Chhota Bheem,  Maruti, Pavansut, Hanuman Chalisa,  God, prayer, Lord, devotion, faith, teachings, Bapu, Aniruddha Bapu, Sadguru, discourse, भक्ती, बापू, अनिरुद्ध बापू, अनिरुद्ध, भगवान , Aniruddha Joshi, Sadguru Aniruddha, Aniruddha Joshi Bapu, Aniruddha Bapu Pravachans, Bandra, Mumbai, Maharashtra, India, New English school, IES, Indian Education Society, Vedic, Hinduism, Hindu, mythology, Indian mythology
संत तुकारामांनी एका अभंगात म्हटल्या प्रमाणे “भक्तीचिया वाटा मज दाखवाव्या सुभटा”. बापू (अनिरुद्धसिंह) नेहमी सांगतात की प्रत्येक भक्ताची भक्तीमार्गाची सुरुवात हनुमंतापासूनच होते. बापूंनी (अनिरुद्धसिंह) म्हणूनच सर्व श्रध्दावान मित्रांकरिता चालू केलेला भक्तीचा जल्लोष म्हणजेच श्रीअश्‍वत्थमारुती पूजन. बापूंनी  (अनिरुद्धसिंह) पहिला चालू केलेला उत्सव म्हणजे श्रीरामनवमी उत्सव, जो १९९६ साली सुरु झाला व त्यानंतर १९९७ साली श्रीअश्‍वत्थमरुती पूजन उत्सव बापूंनी (अनिरुद्धसिंह) सुरु केला.
श्रीअश्‍वत्थमारुती पूजन, श्रीअश्‍वत्थमारुती पूजन, Hanuman, Hanumant, Aswattha, Bajrangbali, Bheem, Chhota Bheem,  Maruti, Pavansut, Hanuman Chalisa,  God, prayer, Lord, devotion, faith, teachings, Bapu, Aniruddha Bapu, Sadguru, discourse, भक्ती, बापू, अनिरुद्ध बापू, अनिरुद्ध, भगवान , Aanjaneya, Aanjaneya publications, Aniruddha Joshi, Sadguru Aniruddha, Aniruddha Joshi Bapu, Aniruddha Bapu Pravachans, Bandra, Mumbai, Maharashtra, India, New English school, IES, Indian Education Society, Vedic, Hinduism, Hindu, mythology, Indian mythology
बापूंच्या देवघरातील हनुमंताची मूर्ती
उपासनेची माहिती:
* ह्या उत्सवामध्ये बापूंनी (अनिरुद्धसिंह) स्वत:च्या हाताने पाषाणातून घडविलेली हनुमंताची मूर्ती स्थापन केली जाते. ही मूर्ती बापूंनी (अनिरुद्धसिंह) स्वत: छिन्नी-हातोडी हातात घेऊन घडवलेली आहे. बापू (अनिरुद्धसिंह) स्वत: उत्कॄष्ट मूर्तीकार आहेत. “मूर्ती घडवणे हा त्यांचा स्वभाव आहे” ह्या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे या हनुमंताच्या मूर्तीचे दर्शन सर्व श्रध्दावानांना घेता येते. पंचमुखहनुमानस्तोत्रामध्ये हनुमंताचे जसे वर्णन केलेले आहे त्या लक्षणांनी युक्त अशी ही हनुमंताची मूर्ती आहे.
* ह्या मूर्तीच्या पुढे एका परातीमध्ये हनुमंताची छोटी मूर्ती ठेवली जाते.
* मूर्तीच्यामागे अश्‍वत्थ वृक्षाचे प्रतिक म्हणून पिंपळाचे रोप ठेवले जाते.
* मूर्तीच्या भोवती उसाच्या कांड्यांनी सजावट केली जाते.
* हनुमंताच्या मूर्ती समोर धुनीमातेची स्थापना केली जाते. ही धुनी म्हणजेच भगवान हनुमंताची अंजनीमाता. ह्या दिवशी तिचेही पूजन केले जाते. ह्या धुनीमातेच्या बाजूला बसून प्रपाठक मंडळी श्रीहनुमानचलिसाचे अखंड पठण करतात.
* श्रीहनुमंताचे षोडषोपचारे पूजन झाल्यानतंर पाच अविवाहीत पुरूष हनुमंताच्या मूर्तीला शेंदुरचर्चन करतात आणि मग सर्व श्रद्धावान भक्त ह्या मूर्तीला शेंदुर लावून दर्शन घेऊ शकतात.
* सकाळचे पूजन झाल्यावर संपूर्ण दिवस श्रीपंचमुखहनुमत कवच, श्री संकटमोचन हनुमानस्तोत्र आणि “ॐ श्रीरामदूताय हनुमंताय महाप्राणाय महाबलाय नमो नम:” हा जप ५४ वेळा, असे सतत आवर्तन चालू राहते.
* रात्रौ ९ वाजता पूर्णाहूती होते.
* प्रत्येक श्रध्दावान भक्ताला ह्या दिवशी हनुमंताच्या मूर्तीवर अभिषेक करता येतो.

बापू (अनिरुद्धसिंह) हनुमंताचा उल्लेख “माझा रक्षकगुरु” असाच करतात व म्हणूनच,

श्रीअश्‍वत्थमारुती पूजन, श्रीअश्‍वत्थमारुती पूजन, श्रीअश्‍वत्थमारुती पूजन, Hanuman, Hanumant, Aswattha, Bajrangbali, Bheem, Chhota Bheem,  Maruti, Pavansut, Hanuman Chalisa,  God, prayer, Lord, devotion, faith, teachings, Bapu, Aniruddha Bapu, Sadguru, discourse, भक्ती, बापू, अनिरुद्ध बापू, अनिरुद्ध, भगवान , Aanjaneya, Aanjaneya publications, Aniruddha Joshi, Sadguru Aniruddha, Aniruddha Joshi Bapu, Aniruddha Bapu Pravachans, Bandra, Mumbai, Maharashtra, India, New English school, IES, Indian Education Society, Vedic, Hinduism, Hindu, mythology, Indian mythology
१) श्रीअनिरुध्द गुरुक्षेत्रम्‌मधील श्रीमद्‌पुरुषार्थ पुरुषोत्तम यंत्र (क्षमायंत्र) ह्याच्या केंद्रस्थानी पंचमुखीहनुमंतच आहे.
२) श्रीअनिरुध्द गुरुक्षेत्रम्‌ येथे वर्षातून एकदा श्रीहनुमानचालिसा पठणाचा सप्ताह केला जातो. ह्या सात दिवसात दररोज कमीतकमी १०८  जपकांकडून कमीतकमी १०८ वेळा श्रीहनुमानचालिसाचे पठण केले जाते.
३) श्रीअश्‍वत्थमरुती पूजन हा उत्सव श्रावण महिन्यात श्रीगुरुकुल येथे साजरा केला जातो.
४) श्रीहरिगुरुग्राम येथे दर गुरुवारी व प्रत्येक उत्सवाला मेन स्टेजवर बापूंच्या (अनिरुद्धसिंह) मागे त्यांच्या “रक्षक गुरुंची” म्हणजेच हनुमंताची तसबीर स्थापन केलेली असते.
५) रत्‍नागिरीच्या तीर्थक्षेत्राचे नाव ’अतुलितबलधाम’ आहे आणि ह्याही ठिकाणी परमपूज्य बापूंच्या (अनिरुद्धसिंह) घरातील पंचमुखीहनुमंताची मूर्ती स्थापन केलेली आहे. म्हणूनच ह्या ठिकाणी दर वर्षी हनुमान पौर्णिमा उत्सव साजरा केला जातो.
६) बापू (अनिरुद्धसिंह) स्वत: नित्य सुंदरकांडाचे पठण करतात.
७) बापू (अनिरुद्धसिंह), नंदाई व सुचितदादा स्वत: वर्षातून कमीतकमी एकदा १०८ वेळा हनुमानचलिसा पठण करतात व त्यांच्या नित्य उपासनेमध्ये हनुमान चलिसा, भीमरूपी महारुद्रा स्तोत्र आणि पंचमुखीहनुमत्कवच ह्या स्तोत्रांचे पठण होते. आपल्या श्रद्धावान मित्रांनीही अशा प्रकारे पठण करावे अशी बापूंची (अनिरुद्धसिंह) इच्छा असते.
८) वटपौर्णिमा ते गुरुपौर्णिमा ह्या काळास बापूंनी (अनिरुद्धसिंह) ’श्रीगुरुचरणमास’ असे नाव दिले आहे व ह्या एक महिन्याच्या काळामध्ये सर्व श्रध्दावान मित्रांनी कमीतकमी एक दिवस तरी हनुमान चलिसाचे १०८ वेळा पठण करावे असे बापू (अनिरुद्धसिंह) सांगतात.
९) श्रीहरिगुरुग्राम येथील नित्य उपासना जेव्हा सुरु झाली व सुरुवातीस बापू (अनिरुद्धसिंह) आणि त्यानंतर सूचितदादा स्वत: उपासनेला बसावयाचे तेव्हा नित्य उपासनेमध्ये श्रीपंचमुखीहनुमत्कवच म्हटले जायचे व आता त्या ऎवाजी “ॐ श्रीरामदूताय हनुमंताय महाप्राणाय महाबलाय नमो नम:” हा जप घेतला जातो.
१०) काही वर्षांपूर्वी श्रीहरिगुरुग्राम येथील उपासनेच्या वेळी प्रपाठक मंडळी स्टेजवर बसून “भीमरूपी महारुद्रा” ह्या स्तोत्राचे पठण करत असत.
११) श्रीहरिगुरुग्राम येथे आराधनाज्योती उपासना काळामध्ये बापूंनी (अनिरुद्धसिंह) हनुमंताच्या अनेक उपासना श्रध्दावान मित्रांकडून करून घेतल्या होत्या.
१२) बापूंच्या (अनिरुद्धसिंह) हॅपीहोममधील दुसर्‍या मजल्यावरील ऑफिसमध्ये पंचमुखीहनुमंताचा व दास हनुमंताचा फोटॊ लावलेला आहे.
१३) श्रीहरिगुरुग्राम येथे दर गुरुवारी प्रवचन व सत्संगानंतर बापूंचे (अनिरुद्धसिंह) दर्शन घेण्याच्या कालावधीमध्ये गजर घेतले जातात व त्याची सुरुवात श्रीहनुमानचलिसेनेच होते.हा हनुमंत हे एकमेव असे दैवत आहे जो आम्हा सर्व श्रध्दावानांचा देवही आहे आणि श्रीरामाचा भक्तही आहे; हे समजानून सांगण्यासाठी परमपूज्य बापूंनी (अनिरुद्धसिंह) श्रीरामरक्षेच्या प्रवचनांमध्ये श्रीहनुमंताची भक्ती का व कशी करायची हे ही समजावून सांगितले.म्हणून बापू (अनिरुध्दसिंह) म्हणतात की हनुमंत व हनुमंताचा महाप्रताप विषद करणार्‍या सुंदरकांडाएवढं सुंदर ह्या जगात दुसरं काहीही नाही.
अतुलितबलधामं हेमशैलाभदेहं
दनुजवनकॄशानुं ज्ञानिनामग्रगण्यम्‌ l
सकलगुणनिधानं वानराणामधीशं
रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि ll

For English version of this please click here

Related Post

8 Comments


  1. हरी ओम दादा,

    खूपच छान माहिती मिळाली. तुम्ही घढवलेली मूर्ती अप्रतिम आहे. दादा, घरातील देवघरात श्री हनुमंरायाची कोणत्या प्रकारची मूर्ती ठेवणे योग्य आहे?

    कृपया मार्गदर्शन करा.


  2. hari om dada,

    khup sunder mahiti dilit. Thanks a lot.

    hari om.


  3. हरी ओम दादा,

    खरच खूप सुंदर माहिती आज आम्हाला मिळाली.

    बापू हे स्वत: उत्कॄष्ट मूर्तीकार आहेत. बापूनी आम्हाला हनुमाताची उपासना कशी करायची हे सांगून ते आम्हाला ही आकार देत आहेत. स्वतः हनुमंताची उपासना करून आमच्या समोर खूप सोपा भक्ती मार्ग त्यांनी दाखवून दिला. म्हणूनच म्हणतात 'बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले'. बापू, नंदाई आणि सूचित मामा स्वतः सर्व हनुमंताच्या उपासना करतात आणि म्हणूनच आपण ही अशा प्रकारे पठण करावे अशी बापूंची नेहमी इच्छा असते.

    हनुमंत हा महाप्राण आहे, भक्ती चे प्रतिक आहे, आपल्या आयुष्यात हा रक्षकगुरु येण्यासाठी बापूनी आपल्याला अनेक मार्ग दाखवले त्या पैकी एक म्हणजे श्रीअश्वत्थमरुती पूजन. बापूंची मी शतशः ऋणी आहे कारण गेल्या वर्षीच्या श्रीअश्वत्थमरुती पूजनाची संधी आम्हा नवविवाहित जोडप्याला दिली. तो आनंद केवळ अवर्णनीय आहे.


  4. हरी ॐ दादा,
    हा लेख वाचुन आमच्या जीवन विकासासाठी श्री हनुमंताच्या उपासना करणे का आवश्यक आहे, ह्याची समग्र माहिती मिळाली.

    श्री हनुमंताच्या उपासनेमधुनच आमचा भक्तीमार्गावरचा प्रवास सुरु होऊ शकतो ह्याविषयी प.पू.बापुंनीही वारंवार सांगितले आहे. श्री अश्‍वत्थमरुती पूजन आधीही मी अनेक वेळा केले आहे पण आज ही माहीती वाचुन श्रावण महीन्यातील ह्या उत्सवाचे आणि श्री हनुमंताचे महात्म्य मनामध्ये आणखीनच खोलवर रुजले..श्री राम.


  5. हरि ॐ दादा,
    श्रीअश्‍वत्थमरुती पूजन मला माहीतच होते खूप वेळा आम्ही श्रीगुरुकुल येथील उत्सव श्रावण महिन्यातील श्रीअश्‍वत्थमरुती पूजन हा उत्सव पाहीलेला आहे. दादरलही गेलेलो आहेत पण तरीही आज तुम्ही टाकलेल्या माहीतीमुळे श्रीअश्‍वत्थमरुती पूजन ह्या उत्सवाची आणि हनुमंताची महती आंणखीनच दृढ झाली…श्री राम…..

    संगितावीरा वर्तक


  6. हरी ओम दादा,
    आपल्या बापूंच्या पंचपुरुशार्थ उपासनेमध्ये सुद्धा “ओम श्री रामदुताय हनुमंताय महाप्राणाय महाबलाय नमो नमः” हा जप आहेच.जुने photos बघून जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.सगळी माहिती एकदम मस्त आहे.वर्षातून एकदा १०८ वेळा हनुमान चालीसा पठण आणि रोज तीन वेळा हनुमान चालिसा का म्हणायची ह्या माहिती जी गुरुक्षेत्रमच्या फळ्यावरती लिहिलेली होती ती पण खरोखरच महत्वाची आहे.


  7. हरि ओम, दादा.
    “भक्तीचिया वाटा मज दाखवाव्या सुभटा”.संत तुकारामांच्या अभंगातले हे बोल आणि त्याचे Practical म्हणजे हा श्री अश्वत्थ मारुती पूजना वरिल हा लेख!!!!! दादा, खरोखर १९९७ पासूनच्या प.पू. बापूंनी करवून घेतलेल्या सर्व श्री अश्वत्थ मारुती पूजनांच्या स्मृतींना उजाळा मिळाला, एवढी समग्र हनुमंतबाप्पाची ओळ्ख एकत्रितपणे तुमच्याच समर्थ लेखणीतूनच घडू शकते.
    प्रबिसि नगर कीजे सब काजा | हृदय राखि कोसलपुर राजा |
    गरल सुधा रिपु करहिं मिताई | गोपद सिंधु अनल सितलाई || २९ ||
    हे लंकिनीचे उदगार आणि
    कहेहु तात अस मोर प्रनामा | सब प्रकार प्रभु पूरनकामा |
    दीन दयाल बिरिदु संभारी | हरहु नाथ मम संकट भारी || १५५ ||
    ही माझ्या नंदाईने उर्फ जानकीमैयाने अखिल जगताला दिलेली सर्वश्रेष्ठ प्रार्थना –
    ह्यांचा अर्थ, त्यातील वर्म आणि मर्म जाणुन घेण्यासाठी हनुमंताची दास्यभक्ती समजणे नितांत आवश्यक आहे, आणि त्यात हा अमुल्य साठा मोलाची भर घालतो. बापूंनी वेळोवेळी प्रवचनांतून, कृतीतुन ह्या त्यांच्या पंचगुरुपैकीच्या रक्षकगुरुचे माहात्म्य दाविले आहे. मला एक गजराची ओळ येथे खूप आठवते कि गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई, गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई , वेगी आणावा तो हरी,आणावा तो हरी …
    दादा, तुम्ही हया विविध लेखांतुन जी भकीची वाट दावता त्यातुच आम्हांला आमच्या बापूंच्या चरणी सत्वर वेगी वेगी जाता येईल हा दृढ विश्वास वाढु लागला आहे कारण तुम्हीच लिहिलेल्या आद्य पिपांच्या पिप्पलिका पांथस्थांच्या लेखातुन ही खूण पटली आहे..
    श्रीराम!!!!!!!!!!!


  8. हरी ओम दादा,
    बापूंकडे आल्यापासून अश्वथ मारुती पूजानांसाठी दरवर्षी नियमितपणे जात आलो आहे. पण आज हि माहिती वाचून हे सुद्धा समजले की
    हनुमंत जे बापूंचे रक्षक गुरु आहेत, त्यांचे स्थान आपल्याही आयुष्यात तितकेच बळकट असायला हवे,
    श्री हरीगुरुग्राम येथे उपासनेला हनुमंताच जप; बापूंच्या मागे हनुमंताचा फोटो; गुरुक्षेत्राम मध्ये महिनाभर चालू असलेला हनुमान चालीसा पठण;
    गोविद्यापीथम येथे उभारलेला स्तंभ आणि त्यावर कोण – तर हनुमंतच!!!
    ह्या माहिती मधली सर्वात आवडती ओळ
    म्हणजे “हा हनुमंत हे एकमेव असे दैवत आहे जो आम्हा सर्व श्रध्दावानांचा देवही आहे आणि श्रीरामाचा भक्तही आहे;' आणि ह्याच हनुमंताला, महाप्रणाला आपल्या जीवनात आण्याची सुवर्ण
    संधी म्हणजेच 'अश्वथ मारुती पूजन'.

Leave a Reply