बापूंच्या आगमनाने श्रद्धावानांना पुन्हा प्रवचनांचा नित्य आनंद ( Shraddhavans enjoying Bapu’s presence during Pravachan)

Shraddhavans enjoying Bapu’s presence during Pravachan

बापू
ज दसरा. आज विजयोपासनेला बापू स्वत: श्रीहरिगुरुग्राम येथे हजर असतील व सर्व श्रद्धावानांना बापूंच्या दर्शनाचा लाभ होईल.
माझ्या सर्व मित्रांना दसर्‍याच्या हार्दिक शुभेच्छा. दसर्‍याच्या निमित्ताने प्रत्येक श्रद्धावानाचा सद्‌गुरु चरणी “विश्वास” दृढ व्हावा हीच सदगुरु बापूचरणी प्रार्थना.
बापू
या आश्र्विन नवरात्रीमध्ये आपण अनेक गोष्टी घडताना बघितल्या. या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, म्हणजेच प्रतिपदेला पहाटे श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम येथे श्रीशिवगंगागौरीच्या स्नानाचा सोहळा होवून नवरात्रीला सुरुवात झाली. अनेक श्रद्धावान या नवरात्रीच्या काळामध्ये श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम व जुईनगर येथे दर्शनासाठी आले. या नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी, श्रद्धावान आतुरतेने वाट बघत असलेल्या ‘पिपासा‘, ‘पिपासा २’ व ‘पिपासा पसरली’ ह्या सीडीजचे पुन:प्रकाशन झाले. तसेच श्रीआंजनेय प्रकाशनची अधिकृत ई-कॉमर्स वेबसाईट www.aanjaneyapublications.comसुरु करण्यात आली. ह्या नववरात्रीच्याच काळात, म्हणजे शनिवार दि. २० ऒक्टोबर रोजी श्रीअनिरुद्ध चलिसा अखंड पठणाचा कार्यक्रम अतिशय भक्तिपूर्ण वातावरणात श्रीहरिगुरुग्राम येथे पार पडला. त्याचप्रमाणे नवरात्रीच्या काळामध्ये सप्तमीच्या दिवशी बापूंच्या घरी श्रीपरांबा पूजन संपन्न झाले.
आज दसर्‍याच्या दिवशी सकाळी आपण बापूंनी लिहीलेली दोन पुस्तके; “आवाहनम न जानामि” व “तदात्मानं सृजाम्यहम” पुर्नप्रकाशित केली व आज सर्व श्रद्धावानांसाठी ती उपलब्ध आहेत. ही पुस्तके लवकरच श्रीआंजनेय प्रकाशनच्या अधिकृत ई-कॉमर्स वेबसाईटवर (www.aanjaneyapublications.com) उपलब्ध होतील.
आजपासून बापू गुरुवारीही श्रीहरिगुरुग्रामला यायला सुरुवात करतील. त्यामुळे सर्व श्रद्धावानांना पुन्हा एकदा बापूंच्या प्रवचनाचा आनंद नित्य घेता येईल..

Related Post

10 Comments


 1. हरि ॐ पूज्य दादा,
  या तुमच्या एकाच पोस्टमधून किती तरी गोष्टी आम्हाला मिळाल्या….. खूप खूप श्रीराम…… पहिल्याच दिवशी पहाटे श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम येथे श्रीशिवगंगागौरीच्या स्नानाचा सोहळा….. आम्ही सर्व श्रद्धावान अतिशय आतुरतेने वाट पाहात असलेल्या 'पिपासा', 'पिपासा २' व 'पिपासा पसरली' या सीडीज्‌चे पुन:प्रकाशन झाले…… आणि खूप दिवसांनी परत ती सर्व गाणी आणि अभंग ऐकायाला खूप आनंद वाटला…..
  शिवाय श्रीआंजनेय प्रकाशनची अधिकृत ई-कॉमर्स वेबसाईट http://www.aanjaneyapublications.com सुरु करण्यात आली…. खूप छान आहे वेबसाईट… आता सर्व श्रद्धावानांना मग ते कितीही दूर राहणारे असो वा काही कामानिमित्ताने दूर जाणारे असो सर्वांना internet द्वारे आपल्या श्रीआंजनेय प्रकाशनाने प्रकाशित केलेली पुस्तके वाचायला मिळतील…. इतकेच नाही तर प्रवासात मोबाईल वरूनही वाचता येतील…… सर्वच खूप खूष झाले असणार….. अनिरुद्ध चलिसाचे पठणही खूप मस्त झाले……. दसर्‍याच्या दिवशी “आवाहनम न जानामि” व “तदात्मानं सृजाम्यहम” ही दोन्ही पुस्तके पुर्नप्रकाशित केली हे म्हणजे दुधात साखर टाकल्यासारखेच झाले……. मस्तच….
  आणि या सर्व आनंदावर कळस म्हणजे दसर्‍याला आणि तेव्हापासून गुरुवारीही बापू येणार….. काय आनंदाच्या या बातम्या…… खरचं जेव्हा कळले की आज बापू येणार तेव्हा काय आनंद होता सर्व श्रद्धावानांच्या चेहर्‍यावर…… श्रीराम…… दसर्‍याच्या दिवशी जेव्हा चालू असलेला अभंग बंद झाला तेव्हा सर्व श्रद्धावान कान टवकारून एकाग्रतेने काय लावले जाते ते ऐकत होते….. आणि लगेचच ‘हरि आला रे’ सुरू झाले आणि काय….. सर्वांनी आनंदाने टाळ्याच वाजविल्या…… खूप आनंद झाला सर्व श्रद्धावानांना…. तो आनंद शब्दात मांडू शकत नाही….. खूप खूप श्रीराम…..


 2. It was a evening every shraddhavan was waiting for, longing for. It was an evening wherein emotions flowed in everyone's heart. The reason being simple….they were hearing the voice of their Beloved Sadguru after a very long time. Yes, this made Dasara so very special for every shraddhavan present at Shri Harigurugram on the day. For me, it was a moment of bliss, pure pleasure and also with memories flooding back again. The wait, the anxiety, the excitement of hearing my Sadguru, seeing him after a long period made me remember my hostel days wherein we used to wait for our parents, to see them, hear them after a long period. It was more than a touching moment for me. On Dasara, it was just love, love and only love which Bapu imparted to us.


 3. हरी ओम दादा, काल म्हणजे विजायोपासानेच्या वेळी बापूंचे सर्व श्रद्धावान मित्र बापूंची आतुरतेने वाट पाहत होते. आणि …….. बापू आले…. बापूंनी पुन्हा एकदा सगळ्या श्रद्धावान मित्रांना सद्गुरूवरील विश्वास अधिक दृढ करावा असे कळकळीने सांगितले. त्यांना ही गोष्ट पुन्हा पुन्हा सांगावीशी वाटते …. याचाच अर्थ….आम्ही पुन्हा पुन्हा चुकतच आहोत… आणि एवढं असूनही…. “तरी कसा बापू माझा येताची राहतो?”. ह्याला एकच उत्तर असू शकतं…. ते म्हणजे …. अकारण कारुण्य आणि अकारण कारुण्य आणि अकारण कारुण्य आणि अकारण कारुण्य आणि…………. हरी ओम.


 4. खरोखरच हि नवरात्र अतिशय सुंदर होती. अगदी पहिल्या दिवसापासून काही न काही मंगलमय आणि सुखकारक घडत होते. आणि दुग्धशर्करा योग म्हणजे बर्याच दिवसांनंतर प. पु. बापू श्री हरीगुरुग्राम येथे दसर्याला आले. सर्वच श्रद्धावान अगदी चातकाप्रमाणे सदगुरूंची वाट बघत होते. बापुंबरोबर शुभंकारा स्तवन, स्वामींचा गजर, साक्षात मोठ्या आईचा गजर आणि बापूंच्या अमोघ वाणीतून भक्त कल्याणाकरता आलेले शब्द सर्वच काही सुंदर. श्री राम!


 5. Hariom Dada, Vijayadashmi this year was a great day for all the shraddhaavaans. Our beloved Bapu again reminded us the PROMISE which HE had given in the beginning of this year, “EK VISHWAS ASAAVAA PURTAA, KARTAA HARTAA GURU AISAA.” He had said, just have shraddhaa and faith in HIM and HE will make you cross this very difficult times just as if it was a cake walk. Yesterday he also said give PRIORITY TO YOUR SADGURU and the rest will happen on its own. IT WAS A MINDBLOWING AND EYE OPENER WHERE WE SHRADDHAAVAANS HAVE TO JUST REMEMBER HIS PROMISE AND DO OUR NITYA KARMA REST HE WILL TAKE CARE..


 6. हरि ओम. दादा. आज विजयादशमीच्या अत्यंत शुभ दिनी परम पूज्य बापूंनी सर्व श्रद्धावानांना दर्शन दिले . ही खरोखरीच आम्हा सर्वांसाठीच खूपच मोठी आनंदाची पर्वणी ! जणु काही आज खर्या अर्थाने आज सोनियाचा दिनु वर्षे अमृताचा घनु हरि पाहिला रे हरि पाहिला ह्या ओवीची प्रचिती मिळाली. ह्या अश्विन नवरात्रीत घडलेल्या सर्व्च कल्याणप्रद घट्नांचा तुम्ही घेतलेला आढावा आमच्या बापूरायाची आम्हांसाठी चाललेली अटाटीच दाखविते. अनिरुद्धा तुझा मी किती ऋणी झालो,अनिरुद्धा तुझा मी किती ऋणी झालो !!! बापू पुन्हा गुरुवारी प्रवचन सुरु करणार म्हणजे दुग्ध-शर्करा योगच !!!


 7. Shree Raam for Sharing this wonderful news dada! We all were eagerly waiting for our bappa's darshan and his words. It feels like it has been so long that i heard my bapu's pravachan, was missing bapu a lot.
  Today will be a great day for all of us to feel bapu once again after a long gap.

  Lots and lots of shree raam
  hari om


 8. We were eagerly waiting for 'Avahanam Na Janami' and 'Tadatmanam Sujamyaham'. Lots of Shreeram for republishing that books again and through Aanjaneya Publications, overseas Shraddhavans can also read the E-Copy of that books.

Leave a Reply