मानवाने स्वत:ची परीक्षा घेणे थांबवून स्वत:चा शोध ( Self Discovery ) घ्यायला हवा. स्वत:त काय चांगले आहे याचा शोध घेताना माणसाला स्वत:ची ओळख पटते. स्वत:तील उत्तम व्यक्तिमत्व शोधण्यासाठी त्या भगवंतावर विश्वास ठेवा, त्याची भक्ती करा. भगवंताच्या कृपेने मानव खर्या ‘स्व’चा शोध घेऊन जीवनविकास साधू शकतो, असे परम पूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक ३० जानेवारी २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे सांगितले, ते आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥