सरस्वती पूजन (दसरा/विजयादशमी)

सरस्वती पूजन (दसरा/विजयादशमी)

हरि ॐ, दिनांक १० ऑक्टोबर २०१९ रोजी झालेल्या पितृवचनात सद्‌गुरु श्री अनिरुद्धांनी ’या कुन्देन्दुतुषारहारधवला' या प्रार्थनेबद्दल सांगताना दसर्‍याच्या दिवशी घरी सरस्वती पूजन कसे केले जाते याची माहिती माझ्या ब्लॉगवरून देण्यात येईल असे सांगितले होते. त्याप्रमाणे या पूजनाची माहिती खाली देत आहे.

पूजन साहित्य 

१) हळद, कुंकू, अक्षता २) निरांजन ३) नारळ - २ ४) गुळ-खोबर्‍याचा नैवेद्य ५) फूले, सोने (आपट्याची पाने) ६) सरस्वती - पुस्तके आणि चित्र ७) सुपारी - २ ८) विड्याची पाने - २ ९) मांडणीत सर्वात मागे महापूजनाची (वरदाचण्डिका प्रसन्नोत्सवातील) किंवा ती नसल्यास मोठी आई (महिषासूरमर्दिनी) व सद्‌गुरुंची एकत्रित तसबीर ठेवावी.

मांडणी 

१) एक चौरंग किंवा पाट घ्यावा व त्यावर वस्त्र अंथरावे.

२) त्यावर खाली चित्रात दाखविल्याप्रमाणे मांडणी करावी.

 

पूजन विधी 

१) प्रथम निरांजनास हळद-कुंकू वहावे. २) त्यानंतर ‘वक्रतुंड’ स्तोत्र म्हणावे.

‘वक्रतुंड’ स्तोत्र

प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ।। भक्तावासं स्मरेन्नित्यमायु:कामार्थसिद्धये ।।१ ।।

प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् ।। तृतीयं कृष्णपिगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ।।२ ।।

लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च ।। सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् ।।३ ।।

नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् । एकादशं तु गणपतिं द्वादशं तु गजाननम् ।।४ ।।

द्वादशैतानि नामानि त्रिसंध्यं य: पठेन्नर: । न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो ।।५ ।।

विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् । पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् ।।६ ।।

जपेत् गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासै: फलं लभेत् । संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशय: ।।७ ।।

अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा य: समर्पयेत् । तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत: ।।८ ।।

इति श्री नारदपुराणे संकटविनाशनं श्रीगणपतिस्तोत्रं संपूर्णम् ।

३) स्तोत्र म्हटल्यानंतर तसबीरीस **हार घालावा. ४) त्यानंतर **विड्यावर, **नारळावर, पुस्तकांवर आणि आयुधांवर हळद-कुंकू व अक्षता वहाव्यात.

५) त्यानंतर खालील श्लोक म्हणावा.

शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्ण शुभाङ्गम्। लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्।।

६) त्यानंतर ’’या कुन्देन्दुतुषारहारधवला’ हे स्तोत्र / ही प्रार्थना म्हणत **फूले**सोने (आपट्याची पाने) अर्पण करावे.

या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता । या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ॥ या ब्रह्माच्युत शंकरप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता । सा माम् पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥

७) त्यानंतर २४ वेळा ’ॐ कृपासिंधू श्रीसाईनाथाय नमः’ हा जप करावा. ८) जप म्हणून झाल्यावर निरांजन ओवाळावे व गुळ-खोबर्‍याचा नैवेद्य अर्पण करावा. ९) त्यानंतर ’विजयमंत्र’ म्हणावा. इथे पूजन संपन्न होते.

ll हरि ॐ ll श्रीराम ll अंबज्ञ ll ll नाथसंविध् ll

English      हिंदी