साई म्हणे तोचि तोचि झाला धन्य | झाला जो अनन्य माझ्या पायीं ||

ज मागची दीड दोन वर्ष बापूंची “श्रीसाईसतचरित्रावर” हिंदीतून प्रवचनं चालू आहेत. त्याआधी बापूंनी श्रीसाईसच्चरित्रावरील “पंचशील परीक्षा” सुरू केल्या (फेब्रुवारी १९९८) व त्या परिक्षांच्या प्रॅक्टिकल्सची लेक्चर्सही घेतली. त्यावेळेस आम्हा सर्वांना श्रीसाईसच्चरित्राची नव्याने ओळख झाली. ११ फेब्रुवारी १९९९ मध्ये बापूंनी पंचशील परीक्षांना का बसायचं हे समजावून सांगितलं.

बापू म्हणतात, “आपल्याला प्रत्येकाला ओढ असते की मला माझं आयुष्य चांगलं करायचं आहे, जे काही कमी आहे ते भरून काढायचय, पण हे कसं करायचं हे मला कळत नाही. मग आम्ही नानाविध चुकीच्या मार्गांनी जात राहतो आणि म्हणूनच हेमाडपंतांसारख्या श्रेष्ठ भक्ताने साईनाथांच्या उपस्थितीत हे श्रीसाईसच्चरित्र लिहीलय; आम्हाला मार्ग दाखवण्यासाठी.

बापू पुढे सांगतात, “आम्हाला पारायणाच्या वेळेस ते संपवण्याची घाई असते व आमचं म्हणावं तसं लक्ष कथेमध्ये जसं असायला हवं तसं राहत नाही व आम्हाला अर्थ म्हाणावा तसा कळत नाही; आम्ही साईनाथांनी काय चमत्कार केला एवढंच फक्त बघतो; व बाकीचा शब्दन शब्द आम्ही विसरून जातो. त्यामुळे आमच्या आयुष्यात चमत्कार घडत नाहीत. कारण मला पहिलं समजलं पाहिजे की चमत्कार कसा घडलाय, कधी घडलाय, आणि कोणासाठी घडलाय. साईनाथांची करुणा मला प्राप्त करून घेण्यासाठी, त्यांची करुणा मला झेपता यावी यासाठी मी कसं वागलं पाहिजे हे मला त्या घटनांमधून कळतं. बाबांनी ( साईनाथांनी ) जो चमत्कार केला, घडवला, हा त्या गोष्टीतील result आहे, इतिवृत्त आहे.

ह्या चमत्कारांचं महत्त्व विषद करताना बापू पुढे सांगतात, “म्हणून आम्हाला चमत्काराची पहिल्यापासूनची कथा काय आहे हे माहित पाहिजे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक कथेमध्ये हेमाडपंतांनी फक्त चमत्कार सांगितलेला नाही तर त्या कथेमध्ये त्या त्या भक्ताची स्थिती, त्या भक्ताची वृत्ती आणि त्या भक्ताची “कृती” ह्याचं सुंदर विवेचन केलेलं आहे आणि या सर्वांमधून मला जाणवत राहतं की ही सद्गुरु माऊली आपल्या जीवनात कशी संपूर्णपणे आणि समानपणे पसरलेली असते.”

परवाच्या गुरुवारी साईनाथांच्या ११ वचनांनंतर प्रवचन करताना बापू म्हणाले की श्रीसाईसच्चरित्रातील सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर हेमाडपंत, ज्यांनी श्रीसाईसच्चरित्र लिहीलं, ज्यांच्यामुळे आज आपण साईनाथांना जाणू शकतो, ज्यांच्या हातात साईनाथांनी सर्व चाव्या दिल्या होत्या. अशाच हेमाडपंतांच्या घरी साईनाथांची पहिली घडवलेली मूर्ती आली; आणि कशा प्रकारे तर साईनाथांनी स्वप्नात येऊन हेमाडपंतांना सांगितलं की मी तुझ्याकडे उद्या (होळी पौर्णिमा १९११) जेवायला येतोय; दुपारच्या जेवणाच्या वेळेस येतोय व तशाप्रकारे साईनाथ (हेमाडपंतांकडॆ) आले.

आपण ह्या नव्या वर्षात आपल्या या साईनाथांच्या, साईबाबांच्या, श्रीसाईसच्चरित्राच्या, साईंच्या फोरमची सुरुवात हेमाडपंतांपासूनच करूया.

या फोरमच्या निमित्ताने दर पंधरवड्यात मी एक “Article” पोस्ट करीन; जे कंटिन्यु होत राहील. आपण प्रत्येकजण; जो साईनाथांवर, श्रीसाईसच्चरित्रावर मनापासून प्रेम करतो, सद्गुरुतत्वावर प्रेम करतो, त्या प्रत्येकाने या फोरममध्ये सहभागी व्हावं हेच उचित होईल.

परमपूज्य अनिरुद्ध (बापू) त्यांच्या श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराज (द्वितीय खंड – प्रेमप्रवास) मध्ये श्रीसाईबाबांचा अतिशय प्रेमपूर्वकपणे उल्लेख “माझ्या अन्नमय कोशाचा स्वामी व माझा दिग्दर्शक गुरु” असाच करतात. आणि म्हणूनच त्यांच्या कार्यांच्या दोन मंत्रजपांपैकी एक जप हा “ॐ कृपासिंधु श्रीसाईनाथाय नम:” हाच आहे व हाच जप श्रीहरिगुरुग्राम येथे दर गुरुवारी उपासनेला घेतला जातो.

ह्या आजच्या पोस्टने आपण आपल्या फोरमची पुन्हा सुरुवात करत आहोत.

श्रीराम – हरि ॐ – अंबज्ञ

English

Related Post

5 Comments


 1. हरि ओम् !!!!
  अंबज्ञ!!!! श्री साईसचित्र च्या फोरम मध्ये मी नक्कीच सहभागी होणार आहे.


 2. हरि ओम. दादा. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच श्रीसाईसच्चरितावरील हा फोरमची सुरुवात करून तुम्ही आम्हांला एक अत्यंत दुर्मिळ अगम्य खजिन्याची गुप्त किल्लीच जणू हाती सोपविली आहे. त्यात ह्या फोरमची सुरुवात हेमाडपंतापासून करणेच अगदी उचित आहे. बापू नेहमी प्रवचनात हेमाडपंताविषयी खूपच प्रेमाने ओथंबून बोलतात. त्यांचा प्रत्येक शब्द हा कसा APT असतो ह्याचे अत्यंत उद्बोधक मार्गदर्शनही करतात, त्यामुळेच पंचशीलची परिक्षा ही “त्या” एकाशी परमात्म्याशी, सद्गुरुतत्वाशी नाळ घट्ट्पणे जोडून देणारी पर्वणीच ठरते.
  हेमाडपंतानी अगदी प्रत्येक कथेत खूपच मधुर , रसाळ वाणीद्वारे, सोप्या प्रकारे साईनाथांची करुणा मला प्राप्त करून घेण्यासाठी, त्यांची करुणा मला झेपता यावी यासाठी मी कसं वागलं पाहिजे ह्याचा आढावा घेतला आहे असे त्या घटना वाचताना जाणवते.
  बाबांनी ( साईनाथांनी ) जो चमत्कार केला, घडवला, हा त्या गोष्टीतील result आहे, इतिवृत्त आहे हे जरी सत्य असले तरी ह्या चमत्कारांचं महत्त्व विषद करताना बापूंचे बोल “म्हणून आम्हाला चमत्काराची पहिल्यापासूनची कथा काय आहे हे माहित पाहिजे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक कथेमध्ये हेमाडपंतांनी फक्त चमत्कार सांगितलेला नाही तर त्या कथेमध्ये त्या त्या भक्ताची स्थिती, त्या भक्ताची वृत्ती आणि त्या भक्ताची “कृती” ह्याचं सुंदर विवेचन केलेलं आहे आणि या सर्वांमधून मला जाणवत राहतं की ही सद्गुरु माऊली आपल्या जीवनात कशी संपूर्णपणे आणि समानपणे पसरलेली असते.” सतत आठवण देत राहतात.

  हेमाडपंताचा जीवन प्रवास पाहताना हा फरक स्पष्ट जाणवतो की सदगुरु साईनाथ जीवनात येण्याआधीचा त्यांचा प्रवास व साईनाथांच्या परीस स्पर्शाने घडविलेला संपूर्ण कायापालट….पण त्याकरिता भक्ताची मनोभूमिकाही तेवढीच निरंहकार , निर्भिमानी असावी हे ही जाणवते. साक्षात परमात्मा साईनाथांनी केलेले नामकरण हेमाडपंतानी जीवनभर अत्यंत अभिमानाने मिरविले. श्रीसाईसच्चरित ग्रंथात वारंवार ह्याचा उल्लेख आढळतोच. “मी तो केवळ पायांचा दास l नका करू मजला उदास l जो वरी देही श्वास l निजकार्यासी साधुनि घ्या ll ” हे केवळ मुखाने न उच्चारता सदैव त्याच दासाच्या भूमिकेतच ते आजीवन जगले हे आढळते. सदगुरुसमोर त्यांनी अत्यंत प्रांजळपणाने आपल्या स्वभावाची कबूली दिली एवढेच नव्हे तर कोठेही आडपडदा न ठेवता वाचकांच्या समोरही ते उघडपणे मांडले…
  आधीं हा लेखक खट्याळ l जैसा खट्याळ तैसा वाचाळ l तैसाचि टवाळ आणि कुटाळ l नाहीं विटाळ ञानाचा l l ९८ l l
  नाहीं ठावा सदगुरुमहिमा l कुबुद्धी आणि कुतर्कप्रतिमा l सदा निज शहाणीवेचा गरिमा l वादकर्मा प्रवृत्त l l ९९ l l
  परि प्राक्तनरेषा सबळ l तेणेंचि साईंचे चरणकमळ l दृष्टीसी पडलें अदृष्टे केवळ l हा तों निश्चळ वादनिष्ठ l l १०० l l
  – (अध्याय २)
  म्हणजेच हेमाडपंत स्वानुभवातून सांगतात की भक्ताने सदगुरुच्या चरणीं शरण जाताना पूर्णपणे आपली स्थिती, वृत्ती ह्यांची कबूली द्यावी. लपवाछपवी करू नये. आपले दुर्गुण मान्य करावे मग त्याच्या कृपेला विलंब लागत नाही आणि “तो” सद्गुरु तात्काळ , क्षणाचाही विलंब न लावता आपला उद्धार करतोच, करतोच …पुढे ते ११व्या अध्यायांत वाचकांना स्पष्ट्च सांगतात की
  कोणी म्हणोत भगवद्भक्त l कोणी म्हणोत महाभागवत l परि आम्हांसी ते साक्षात भगवंत l मूर्तिमंत वाटले l l २५ l l
  म्हणजेच लोकांना काय म्हणायचे ते म्हणो की साईनाथ मोठे भगवंताचे भक्त आहे की ते महाभागवत आहेत, पण माझ्यासाठी मात्र तो माझा देवच आहे, भगवंतच आहे. आणि विशेष म्हणजे हेमाडपंत कधीही तसूभरही ह्या स्वमतापासून ढळले देखिल नाहीत… बापूराया अशीच तुझ्या चरणांशी घट्ट बांधिलकी आजन्म राहू दे आणि तुझी दासभक्तीची आंस हीच माझी आमरण पिपासा राहू दे….
  अंबज्ञ ,अंबज्ञ,अंबज्ञ …अनिरुध्दा तुझा मी किती ऋणी झालो अनिरुध्दा तुझा मी किती ऋणी झालो !!!
  मी अंबज्ञ आहे अनंत वेळा ह्या गुरुमाऊलीच्या पायीं !!!


 3. HariOm
  Dada Ambadnya for starting this forum. So nice of you to give us an opportuinity to share our love for the Shri Sai Satcharita.

  Ambadnya to the krupa of Bapu that He has given each of us this very golden opportuinity of life to study the Shri Sai Satcharita and learn from the bhaktas of Shri Saibaba these important points of life :-

  1. As to how each of the lives of the bhaktas of Shri Saibaba’s was transformed as per the wish of Shri Sainath.
  2. Also these stories teach as how the bhaktas adhered / try to adhere to the Word of Shri Sainath.
  3. Each one of them teaches us that it is Sadguru our Parmatma who comes first and rest everything else.
  4. The stories of the Shri Sai Satcharita teaches us the most important point and that is about having Strong Faith in the Lotus Charan of the Sadguru – the Parmatma . This Strong Faith is the source of then the real wonders happening in the life of the bhaktas. As one of the Vachans of Shri Saibaba says “Sharan Maza Aala Ani Vaya Gela Dakhva Dakhva Aisa Koni”. One we accept His Sharanya which is one step towards our Parmatma with Love and Devotion and rest 107 steps He walks towards us. He is already with us and takes care of us, it is only we who have to accept His Sharanya and be His. Even we are not aware most of the coming problems in our lives due to our prabrabdh, at times we are unable to take His name / do the Upasana when compounded with heavy problems, but He rushes and is already there by our side to protect us.
  4. The stories show us as to how the Parmatma for His Akaran Karunya for His Bhaktas / His Children takes their problems on Himself. He also helps them to come out of thier problems by helping them fight their prabadh too.
  5. The stories guide us as to how the Parmatma takes care of the Prapanch as well as of the Parmartha of His Bhaktas.
  6. We get to learn about how Sadguru’s Gunsankirtan from a bhakta can become an indirect cause (nimitta) for bringing the other new person to the Lotus Charan of the Parmatma.

  Ambadnya Bapuraya. I Love You My Dad Forever.
  HariOm


 4. दादा हि संकल्पना मला खूप आवडली. बापूंनी सांगितलेला दृष्टीकोन लक्षात ठेऊन साईचरित्र वाचणे हे खरोखर खूप सुंदर असते. साईचरित्रासारखा इतर कुठलाही पवित्र ग्रंथ कसा वाचावा ही जाणीव आम्हाला बापूंनी करून दिली. आपण सुरु केलेल्या या फोरममुळे साईंच्या भक्तांचे चरित्र पुन्हा एकदा नव्याने उलगडता येईल. आपले मार्गदर्शन मोलाचे आहेच आणि त्यासोबत अनेक श्रध्दावान मित्रांचा अभ्यास आणि त्यांना उलगडलेला साईंचा प्रत्येक भक्त याचा न भूतो न भविष्यती अनुभव या फोरम द्वारे मिळेल यात शंकाच नाही. या उपक्रमास मनःपूर्वक शुभेच्छा आणि मी या उपक्रमात सहभागी व्हायला जरूर प्रयास करेन.

Leave a Reply