परमपूज्य बापूंना सद्गुरुनारायणानन्दतीर्थसेवा ट्रस्ट, औदुंबरद्वारे दिले गेले सन्मानपत्र( Sadguru Aniruddha Bapu was given a honorary letter by Sadguru Narayanand Tirth Seva trust, Audumber)

Sadguru Aniruddha Bapu was given a honorary letter by Sadguru Narayanand Tirth Seva trust, Audumber

एप्रिल-मे महिन्यात बापूंचा सांगली दौरा झाला. ह्या दौर्‍या दरम्यान १ मे २०१३ रोजी बापूंनी श्रीक्षेत्र औदुंबर येथे श्रीदत्तात्रेयांचे दर्शन घेतले. त्यानंतर औदुंबरमध्येच असलेले सद्गुरुनारायणानन्दतीर्थ सेवा ट्रस्टच्या http://narayanswami.org/english/audumber_mandal.html आमंत्रणाचा मान राखून त्यांनी ट्रस्ट तर्फे चालविल्या जाणार्‍या आश्रमाला भेट दिली. येथे ट्रस्टचे मठाधीपति व प्रधानविश्वस्त श्री. वेंकटरमण दिक्षित शास्त्री यांनी बापूंचे सन्मानपत्र व मानचिन्ह देऊन स्वागत केले.

श्री. वेंकटरमण दिक्षित शास्त्री यांची माहिती:
श्री. वेंकटरमण दिक्षित शास्त्री हे सद्गुरु स्वामी नारायणानंद तीर्थ सेवा ट्रस्ट, औदुंबर येथील मठाधीपति असून त्या मठाचे प्रधानविश्वस्त ही आहेत. ’न्यायविद्वान, ’न्यायचुडामणी’, ’न्यायवेदांतचार्य’अशा अनेक उपाधी त्यांना प्रदान केलेल्या असून ते स्वत: संस्कृत व तत्वज्ञानामध्ये (philosophy) एम.ए. आहेत. गेली २५ वर्षं आश्रमाचे गौरवस्थान व गौरवाध्यक्ष म्हणून ते सेवा करीत आहेत. त्याचप्रमाणे आश्रमात विद्यार्थ्यांना विनामूल्य अध्यापनाचे कार्य करीत आहेत.

.

सन्मानपत्र

सन्मानपत्र

परमपूज्य बापूंना ट्रस्टद्वारे दिल्या गेलेल्या सन्मानपत्राचा अर्थ मराठीत असा आहे.

नमो भगवते दत्तात्रेयाय ।
दिव्य भगवान श्रीदत्तात्रेयांच्या सान्निध्यात, श्रीक्षेत्र औदुम्बर येथे, सद्‌गुरु नारायणानन्दतीर्थस्वामी गुरुंच्या सन्निध, आपल्या शुभ आगमनप्रसंगी हे सन्मानपत्र दिले जात आहे.
(परमपूज्य बापूंच्या सन्मानार्थ सन्मानपत्रात म्हटलं आहे की)

हे प्रचंड तेज:संपन्न, महान, समर्थ विभूते!

आपल्याकडून अखंडपणे, श्रद्धावानजनांच्या समाजासाठी, निग्रह-अनुग्रह-शक्तिद्वारे केले जात असलेले उद्धार कार्य, जनता जनार्दनाची सेवा, या भावनेने केले जात आहे. आपण मानवरुपाने भूतलावर अवतरून, अनिरुद्ध नामाने किर्तिमान झाला आहात. आम्हां देहधारी मानवांसाठी, आपले दर्शन होणे, हे त्रिकालांचा उद्धार करणारे आहे. श्रद्धावानांचे कल्याण करण्याच्या आपल्या कार्यक्षेत्रात, आपण ईश्वरी लीला, आणि अनेकविध गुणांनी शोभून दिसत आहात. आणि आपले दिगन्त यश. असेच सदैव आम्ही ऐकत रहावे.

अशा प्रकारच्या ईश्वरी रमणीय गुणगणांनी विभूषित असणार्‍या आपणास, ‘भक्तकामकल्पद्रुम’, या पदवीने सन्मानित करण्यात येत आहे, आणि मन:सामर्थ्यदाता परमपूज्य अनिरुद्ध बापूंच्या पूज्य चरणी, आम्ही गौरवपुरस्काराने विभूषित असे हे सन्मानपत्र, सदर अर्पण करत आहोत.

आपले सत्कृपाभिलाषी,

विश्‍वस्त मंडळ
विकास जगदाळे
सद्‍गुरुनारायणानन्दतीर्थसेवा ट्रस्ट
दत्तक्षेत्र, औदुम्बर, जिल्हा सांगली, महाराष्ट्र

गौरवाध्यक्ष
आत्माराम एन्‌. नाडकर्णी
अ‍ॅटर्नी जनरल, सिनियर अ‍ॅडव्होकेट हायकोर्ट, गोवा

बुधवार दिनांक १ मे २०१३

Published at Mumbai, Maharashtra.

Related Post

5 Comments


 1. AMBADNYA KHARACH AMACHA (MAZA) BAPU KITI GR8 AHE HE YATUN SAMAJATA…
  KHUP CCHHAN KI AMHI BAPU BHAKT AHOT..
  “AMACHA (MAZA) BAPU LAI BHARI AHE!!!!!!”


 2. हरि ॐ पूज्य दादा,
  “परमपूज्य सद्‌गुरू बापूंना सद्गुरुनारायणानन्दतीर्थसेवा ट्रस्ट, औदुंबरद्वारे सन्मानपत्र मिळाले….” वाचून खूप आनंद झाला….. हा आनंद बापूंना सन्मानपत्र मिळाले यासाठी तर आहेच…. पण आपल्या बापूंना या सन्मानपत्राची काही गरज नाही….. आणि अपेक्षाही नसते त्यांना…. पण आपल्या बापूंचे जे अफाट कार्य चालू आहे, त्याची दखल कोणीतरी घेतली याचा जास्त आनंद झाला… अर्थात त्या दखलीचाही बापूंना काही फरक पडणार नाही…. पण एक श्रद्धावान म्हणून आपल्या सारख्यांना ते खूप अप्रूप व सुखदायी वाटले…..
  पत्रक संस्कृतमध्ये असल्याने ते काही वाचून कळत नव्हते…. पण त्याच्या खाली दिलेल्या मराठीतील भाषांतरामुळे त्या पत्रकात काय लिहीले आहे ते समझले आणि जाणवले खरचं किती छान आणि अ‍ॅप्ट शब्दात मांडले आहे….. अजुन काही यावर लिहीणारी मी कोण….
  पण एवढे मात्र नक्कीच बोलू शकते की, पुज्य दादा तुम्ही ही पोस्ट टाकल्याने आम्हा सर्वांना ह्या पत्रकाची माहीती मिळाली…. मी अंबज्ञ आहे….. हरि ॐ


 3. श्री दत्तगुरू यांचे देवस्थान औदुंबर येथे कार्यरत असलेल्या सद्गुरुनारायणानन्दतीर्थ सेवा ट्रस्ट, औदुंबरद्वारे परमपूज्य बापूंना दिले गेले मानाचे आणि भावपूर्ण सन्मानपत्र पाहून मन अतिशय उल्हसित जाहले. बापूंचे कार्य, त्यांची त्यांच्या प्रत्येक मित्राच्या प्रगतीसाठी असलेली तळमळ आणि त्याच अनुषंगाने अविरत चालू असलेले प्रयास यांचे विषयी आपण सर्वच जण वाकीब आहोत. हे सन्मानपत्र पाहून मनात ग. दि. माडगुळकर लिखित ‘गीत रामायण’ या महाकाव्यातील एक ओळ आठविली… ” ज्योतीने तेजाची आरती…. ” दत्तगुरू हे प. पू. बापूंचे आराध्य दैवत. बापूंनी आपले पंचगुरू याविषयी अनेकदा भरभरून कौतुक केलेच आहे. परंतु ‘दत्तगुरू’ हे आपल्या बापूंचे सर्वात लाडके दैवत आणि त्यांच्या या लाडक्या दैवताचे जागृत स्थान म्हणजे ‘श्री क्षेत्र औदुंबर’. पुज्य बापू सांगलीच्या दौर्यावर येणार हे कळताच, तेथील सद्गुरुनारायणानन्दतीर्थ सेवा ट्रस्ट या न्यासाने पुज्य बापूंना भेटीचे आणि आग्रहाचे निमंत्रण दिले होते. बापूंनी अतिशय आनंदाने आणि सन्मानपूर्वक या न्यासाच्या पदाधिकाऱ्यांचे निमंत्रण स्वीकारले होते आणि बापूंनी आपल्या अतिशय व्यस्त अश्या दिनचर्येमधूनही या न्यासास भेट देऊन काही काळ तेथे व्यतीत केला. आपले बापू आणि त्यांचे चतुरस्त्र व्यक्तिमत्व व दिमाखदार शैली याने औदुंबरवासियांनाही जिंकून घेतले…याचीच हि प्रेमाची पोचपावती.


 4. हे फक्त सन्मानपत्र नसून परमेश्वरांनी केलेला फुलांचा आणि त्यांचा आनंदाचा अखंड वर्षाव आहे. जसे कृष्ण जन्माच्या वेळी सर्व देव देवतांनी प्रसन्न होऊन देवकी वासुदेव आणि भगवान श्रीकृष्ण ह्याच्यावर केलेला प्रेमाचा, फुलांचा वर्षाव.

  दादा, तुम्ही केलीली पोस्ट वाचताना आणि मला माझे मनातले विचार लिहिताना अक्षरशः अंगावर काटे येत आहेत. शब्दात वर्णन करता येणे कठीण असे मनातले भाव.. केवढे हे आपले भाग्य समजावे कि आपल्याला बापूंचे खर तर परमेश्वराचेच प्रत्यक्षात दर्शन झाले. त्यांच्या विचारांचा प्रभाव, ते करत असलेले कार्य आणि आपल्या सारख्या सामान्य माणसात आणत असलेले माणूसपण आणि देवपण, आपल्याकडून करून आणि करवून घेत असलेले कार्य.. देवापासून दूर जात असलेली आपण सर्व हि कलयुगातली माणसे.. पूजा-पाठ, मंत्र, सेवा, धर्म, कर्त्यव्य, निष्ठा, आपुलकी, आणि भावना ह्या सगळ्यांचा मेळ शक्य नसलेल्या सामान्य माणसाला आपल्या मनःसामर्थ्यदाता परमपुज्य अनिरुद्ध बापूंनी सहज घालून दिला आहे.

  बापूंनी सांगितलेले वचनाचा अर्थ क्षणा-क्षणाला दृढ होऊन खुलत जात आहे. “एक विश्वास असावा पुरता करता हरता गुरु ऐसा”.

  श्रीराम आणि हरी ओम.
  अंबज्ञ.

Leave a Reply