श्रध्दावानांकडून ’प्रेमयात्रा – न्हाऊ तुझिया प्रेमे’ संबंधी आलेल्या प्रतिक्रीया ( Responses on NTP )

Responses on NTP 

॥ हरि ॐ ॥

‘न्हाऊ तुझिया प्रेमे’ एक आगळा वेगळा कार्यक्रम. तो होणार असं जाहीर झालं आणि श्रद्धावानांनी प्रवेशपत्रिकेसाठी नावं नोंदवायला सुरुवात केली. शेवटच्या दिवसापर्यंत प्रवेश पत्रिकांची मागणी होतच होती. हळूहळू कार्यक्रमाचे एकेक promos एफ.बी. वर यायला लागले. उत्सुकता वाढू लागली. नुसता उत्साह, आनंद, अनिवार ओढ आणि बरचं काही…

न्हाऊ तुझिया प्रेमे’ संबंधी आलेल्या प्रतिक्रीया - Mugdhaveera Durveशेवटी एकदाचा ‘२६ मे’ उजाडला. रविवार असूनही कोणाला आळस नाही. प्रत्येकजण कार्यक्रमाला निघायची तयारी करायला लागला. जणू काही picnic ची तयारीच. ११ वाजल्यापासून दाही दिशांहून माणसं येत होती, पण सगळ्यांचं पोहोचण्याचं ठिकाण एकच. D.Y. Patil Stadium. चहूकडून बसेस, कार, सुमो येत होत्या. पण DMV’s कडून होत असलेल्या उत्कृष्ट मार्गदर्शनामुळे पार्किंगलाही काही अडचण आली नाही. मेन गेटमधून आत शिरल्यावरही कसलाच गोंधळ नाही. ३५-३६ हजार श्रद्धावान असूनही खाणे-पिणे, toilets कशाचीच गैरसोय नाही. गेटमधून आत शिरण्यापूर्वी दिले गेले अप्रतिम बॅजेस. प्रत्येकजण आपल्या लाडक्या बापूला आपल्या अंगावर अभिमानाने मिरवत आत शिरला या बापूंचे प्रेम जे ह्याआधी हातातून निसटतं होतं (शिर्डी, आळंदी, गोवा रसयात्रा) आणि थोडंफार जे हातात गवसलं (अवधूत चिंतन, वरदाचण्डिका प्रसन्नोत्सव) ते समोर screen वर अनुभवता येत होतं.

बरोबर पावणे तीन वाजता ह्या आपल्या प्रेमळ बापू, जगतमाता नंदाई आणि त्याचा परमबंधू परममैतर अर्थात आमचे लाडके सुचितदादा.

पहिले श्लोकी ने कार्यक्रमाला सुरूवात झाली त्या ‘हरिरुप अनिरुद्धे पृथ्वीतत्त्वासी आले’ ही श्लोकी प्रत्यक्षात ‘त्याच्या’ समोर साकार होताना अंगावर शहारा आला. निवेदक श्री.गौरांगसिंह निवेदन करताना ‘बापू’ हा शब्द ज्या आर्ततेने उच्चारत होते ती आर्तता काळजात भिडत होती. प्रत्येक अभंगाच्या आधी होणारं निवेदन ऐकताना असं वाटत होतं की अरे, निवेदनातून जे आपण ऐकतोय ते तर आपण आपल्या आयुष्यात अनुभवलेलं आहे. आणि तिथे असणार्‍या प्रत्येकाला १०८% असचं वाटलं असेल. त्यामुळे प्रत्येक अभंग ऐकताना हा माझ्या आयुष्याला लागू आहे असं वाटून त्या बापूवरच्या प्रेमाने अखंड डोळ्यातूना पाणी वहातच राहिलं आणि ‘न्हाऊ तुझिया प्रेमे’ चा अर्थ कळला. अगदी खर्‍या अर्थाने कळला. प्रत्येक गायकाच्या आवाजातली आतपर्यंत भिडणारी आर्तताही ह्याला कारणीभूत होती. सर्व गायक व वाद्यवृंदाला दाद देतानाही बापूंच्या नजरेत प्रत्यक्ष पाठ थोपटण्याइतकं कौतुक भरलेलं होतं.

बापूंच्या प्रेमरसात चिंब होत जाण्याचा अनुभव फक्त तिथे उपस्थित असणार्‍यांनीच घेतला नाही, तर आपल्या I.T. Team च्या अथक प्रयत्नांमुळे जगभरातल्या श्रद्धावानांनी घेतला. अध्यात्म आणि विज्ञान हातात हात घालून एक इतिहास त्यादिवशी घडवत होते.

कार्यक्रमातील एक एक अभंग ऐकून धन्य होत होतो आणि कार्यक्रम हळू हळू पुढे सरकत होता पण वेळेचं बंधन असल्याने प्रेमाची ही शिदोरी बरोबर बांधून घेणं इतकचं हातात होतं. कार्यक्रम संपला तरी उठायचं भानच राहिलं नाही आणि अचानक त्या देवाने पावसाचा शिडकावा केला आणि ‘थेंब एक हा पुरे अवघे नाहण्या’ चा आनंद अनुभवला.

ह्या कार्यक्रमाला दोन दिवस झाले पण त्याचा जेटलॅग अजून उतरत नाही. ती तर पुन्हापुन्हा ऐकायला मिळाले तर काय पर्वणीच नाही का? असे वाटायला लागले. हा कार्यक्रम सादर करण्याचं ज्यांना सुचलं त्या समीरदादांना ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी धडपडणार्‍या team ला, गाण्यातून तो प्रत्यक्ष साकार करणार्‍या फाल्गुनीवीरा आणि गौरांगसिंहना एक कळकळीची विनंती की आमच्यावर अफाट प्रेम करणार्‍या बापूंवरील अभंगात ऐकायला देऊन आम्हाला परत परत त्या थेंबात नहायला लावायची जादू तुम्हीच प्रत्यक्षात आणू शकता.

आमच्यावर लाभेवीण प्रेम करणारा, आमच्यातलाच एक होऊन राहणारा, आमच्याच सेवेसाठी धावून येणारा (देवाघरची उलटी खूण) आमचा ‘बापू’ आहे. म्हणून त्याला एकच मागणं. मागायचं आहे. 

सब सौंप दिया है जीवनका । अब भार तुम्हारे हाथों में ।

चाहे हार मिले, या जीत मिले, उपहार तुम्हारे हाथों में ।

‘सद्‌गुरुदारीचा आहे मी हो श्वान’ हा अभंग ऐकताना घरच्या श्वानाच्या, एका मुक्या प्राण्याच्या आठवणीने व्याकुळ झालेली परमात्मत्रयी बघितली आणि जाणवलं की खरोखर आम्हा पामरांसाठी तर – ‘एक थेंब हा पुरे अवघे नाहण्या’

॥ हरि ॐ ॥

मुग्धावीरा नंदकुमारसिंह दुर्वे,
कल्याण(पश्चिम)

(एडिटेड कॉपी)

Published at Mumbai, Maharashtra – India

Related Post

4 Comments


 1. Hari Om, It has been great treat for us on 26th may on DY Patil Stadium. We all are truly lucky for this rare moment. We sincerely thanks all satsanga team for their great effort. At satsanga progresses, we fill better and better and then even better. Darshan sohala for continuously 7 hrs.of Bapu, Aai and dada is main aspect of this satsanga. If possible, Kindly arrange the same satsanga again in konkan region please.

  ( Dada, kindly forgive me for my weak english.)

  Ambadnya Charudatta Alawani
  Devrukh Upasana Kendra


 2. Hari Om
  Khup chan vatat sarvanche abhipray aikun, mala ha satsang anubhavata nahi aala. pan mala te baghayala milech hi khatri aahe.
  Bapu la aaplya saglyanchich kalji aahe.
  Mi AMBADNYA aahe.
  SARV JAGI YA BAPU CHA AADHAR , NAHI MODNAR SANKATAT.


 3. मी अंबज्ञ आहे,मी अंबज्ञ आहे,मी अंबज्ञ आहे. हरि ओम. दादा, केवळ आणि केवळ तुमच्या अथक परिश्रमातून आणि अमूल्य मार्गदर्शनामुळे ,स्व्प्नीलसिंहाच्या आणि I.T. Team members, तसेच फाल्गुनीवीरा पाठक आणि समस्त संगीतवृंदाच्या प्रयासांतून ,आज “न्हाऊ तुझिया प्रेमे” ह्या प्रेमयात्रेत आम्हां सर्वच श्रद्धावानांना आपल्या लाडक्या बापूरायाच्या प्रेमवर्षावात मनसोक्त न्हाऊ माखू घातले आणि “न्हाऊ तुझिया प्रेमे अनिरुद्ध प्रेमसागरा माझ्या भक्तनायका थेंब एक हा पुरा अवघे नहाण्या ओले चिंब मन हे झाले अंग अंग शहारले कातद्यातुनी आतुडे शिरले प्रेम सावळे ह्या आद्यपिपांच्या अभंगाची जिंवत प्रचिती “ह्याचि देही ह्याचि डोळा” अनुभवता आली.बापू, नंदाई आणि सुचित दादांच्या सहवासात पिपासा ऐकता यावी , खरेतर पिता यावी आणि ती अवघ्या जीवनाला व्यापून उरावी ही मनीची तळंमळ खर्‍या अर्थाने सत्यात साकारली. पिपासा, वैनी म्हणे, बोल बोल वाचे , ऐलतीरी मी पैलतीरी तू आणि अशा अनेक सुंदर भावपूर्ण अभंगाना ऐकताना, नजरेसमोर बापूंच्या तेवढ्याच प्रेमळ , कारुण्याने ओतप्रोत भरलेल्या भावमुद्रा काळजाचा ठेका चुकवित होत्या , जणू काळ-वेळ त्या ठिकाणी स्व:तचे अस्तित्वच हरवून बसले होते. सदगुरुरायाचे जीवनातील आगमन हा जणू मानवी जीवनाला झालेला परीस स्पर्शच असतो जो अवघ्या आयुष्याचाच कायापालट करतो, जणू तो एक नवा पुनर्जन्मच असतो जो फक्त आणि फक्त “त्या” एकाच्या साठी ,”त्या” एकाच्या साठीच जगायचा असतो , पण कुठेतरी माशी शिंकावी तसे घडते आणि विश्वास डचमळू लागतो , हा प्रवास प्रत्येकाच्याच आयुष्यात सतत घडतच असतो, त्याचे एवढे सुंदर,सहज प्रतिबिंबच जणू प्रत्येक श्रद्धावान न्याहाळत होता ह्या संपूर्ण प्रेमयात्रेत.. सब सौंप दिया हैं जीवन का अब भार तुम्हारे हाथों में … हेच अंतिम सत्य आहे !!!

  मुग्धावीरांनी खूप सुंदररित्या ह्यातील अगदी प्रत्येक काना-कोपर्‍याचा आढावा घेतला आहे. जरी ह्या महासत्संगाची २६ मेला सांगता झाली तरी देखिल प्रत्येकाच्या तना-मनात, रोमारोमांत हीच पिपासा नुसती जागृतच झाली नाही तर अखंड , चिरंतन रुपाने सळसळत वाहात आहे , ओतप्रोत भरभरुन आणि प्रत्येकाला “त्या” एकमेवाद्वितीय माझ्या बापूरायाच्या चरणी समर्पित करीत ……

  मी अंबज्ञ आहे,मी अंबज्ञ आहे,मी अंबज्ञ आहे.

Leave a Reply