ज्या मानवाच्या जीवनात राम राजा नसतो, ज्याच्या जीवनात राम वनवासात असतो, त्याच्या जीवनातून ओज, बल, तृप्ती निघून जाते. पूर्ण अविद्या असणारी मन्थरा रामाला वनवासात जायला लावते. रामराज्य जीवनात येण्यासाठी माणसाच्या जीवनाची सूत्रे मन्थरेच्या हाती नसून रामाच्याच हाती असणे आवश्यक आहे. सर्व स्तरांवर आनंदीआनंद असण्यासाठी म्हणजे रामराज्य येण्यासाठी जीवनात राजारामाचे सक्रिय असणे आवश्यक आहे, याबद्दल परम पूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी त्यांच्या १० मार्च २००५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.
॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥