कार्यकर्त्यांसाठी झालेल्या ’प्रेमयात्रा – न्हाऊ तुझिया प्रेमे’च्या स्क्रीनिंगवर प्रशांतसिंह तळपदे( Prashant Talpade on NTP) यांचा अभिप्राय

२६ मे २०१३ – न्हाऊ तुझिया प्रेमे या कार्यक्रमाच्या दिवशी पद्म्श्री डॉ. डी. वाय पाटील स्टेडियममध्ये प्रसादालयात सेवा असल्याने कार्यक्रम पूर्णपणे पाहता आला नाही. मात्र ९ जून रोजी श्रीहरीगुरुग्रामच्या प्रांगणात हा कार्यक्रम चुकलेल्या सर्व कार्यकर्त्यांसाठी हा कार्यक्रम पुन्हा दाखविण्यात आला. बापू ज्याठिकाणी प्रवचन करतात त्या स्टेजवर त्या स्टेजच्याच आकाराएवढ्या भल्या मोठ्या LED Screen वर कार्यक्रम दाखविण्याची व्यवस्था केली गेली. पाऊस मोठ्या प्रमाणावर पडत होता यासाठी प्रांगणात छप्पर बांधण्यात आले. चहा-कॉफी, नाश्‍ता व जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आली होती. ‘बापू करतो अमुची सेवा’ या आद्यपिपांच्या उक्तीची राहून राहून आठवण येत होती. पावसामुळे झालेल्या थंड वातावरणात न्हाऊ तुझिया प्रेमे कार्यक्रम समीरदादा यांच्यासोबत पुन्हा एकदा पाहण्याची संधी मिळाली यासाठी मी अंबज्ञ आहे.कार्यक्रम सुरु होण्याआधी सद्गुरु अनिरुद्धांनी ‘मी तुमच्या मागे व पुढे आहेच’ हे दिलेले वचन गहिवरून टाकणारे होते. कार्यक्रमाची सुरुवात सुचितदादा विरचित ‘श्लोकी’ने झाली. ‘भयदु:ख अनिरुद्धे सज्जनांचे पळाले, बोल बोल वाचे श्री अनिरुद्ध आले’ yes!!! माझे सद्गुरु श्री अनिरुद्ध आले… फक्त माझ्यासाठी….माझ्यावर अखंड प्रेमाचा वर्षाव करण्यासाठी…  आणि कसे तर “तिमिरातुनी पसरुनी यावा हो, आले ते उजळीत, भक्तीरसाने प्रगटीत होऊनी येती अनिरुद्ध”. हा अनिरुद्ध आला व माझ्या मनाच्या सिंहासनावर स्थानापन्न झाला आणि सोबत होते नंदाई आणि सुचितदादा.


कार्यक्रमाची सुरुवातच एवढी दमदार व सुंदर झाली व त्यानंतर गायला गेलेला प्रत्येक अभंग म्हणजे असे वाटत होते की या अनिरुद्धाच्या दिशेने टाकलेले पाऊलच आहे. आद्यपिपा, मीनावैनी, श्रीकृष्णशास्त्री इनामदार, सुशीलाताई, साधनाताई, योगीन्द्र्सिंह, पुर्वावीरा इत्यादींनी रचलेले हे अभंग व गीते ऐकताना फक्त त्याचे, त्या अनिरुद्धाचे प्रेम भरभरून वाहत होते. 
 
‘नाम घ्यावे म्हणुनी मिटता रे डोळे, नाम थबकले दिसता तुचि’ कितीतरी वेळा झाली आहे आपली ही अवस्था. बापू समोर आले की काय बोलायचे ते कळत नाही. फक्त त्यांच्या रुपाकडे पाहावेसे वाटते. आजदेखील असेच घडत होते, प्रत्येक अभंग ऐकताना व त्याचबरोबर त्याचे ते रूप पाहताना… आयटी टीमचे मनापासून अभिनंदन. अंबज्ञ. ज्यांनी खूप सुंदर Wallpapers बनवली व जी अभंगासोबत दाखविण्यात आली. हे परमात्म्याचे रूप पाहून मन पूर्णपणे त्याच्याच रुपात विरघळून जात होते. 
 
याच वेळेस गौरांगसिंहांनी सादर केलेले निवेदन जणू प्रत्येक भक्तमनाचाच ठाव घेत होते. बापूंचा विरह जाणवायला लागला व मन अधिक वेगाने… अनिरुद्ध वेगाने त्याच्या चरणांना मिठीत घेण्यासाठी धावू लागले… येस अनिरुद्ध वेगानेच… कारण माझ्या मनाची ही गती माझी नव्हतीच. अनिरुद्धानेच माझा हात घट्ट पकडला होता व तोच मला चरणांजवळ खेचत होता.
 
हा कार्यक्रम संपूच नये असे वाटत होते व सर्वात शेवटी स्तब्ध केले ते शेवटच्या प्रार्थनेने – सब सौंप दिया है बापू तेरे हाथों मे… या पुढच्या जीवनातील प्रत्येक क्षण बापुराया फक्त तुझ्याच इच्छेने व्यतित होऊ दे रे… 
 
न्हाऊ तुझिया प्रेमे कार्यक्रम यशस्वी करण्यात मोलाचा सहभाग असणाऱ्या गायक – गायिका, वाद्यवृंद, आयटी टीम व सर्व कार्यकर्त्यांना मनापासून अंबज्ञ.  
 
२६ मे रोजी प्रसादालयात सेवेला असल्यामुळे सलग कार्यक्रम पाहता नाही आला.  हा कार्यक्रम झाल्यावर श्रद्धावानांनी त्यावर दिलेल्या प्रतिक्रिया वाचून व पाहून कुठेतरी, काहीतरी ‘मिस’ झाले आहे असे राहून राहून वाटत होते. मात्र ९ जूनला समीरदादांनी सर्व कार्यकर्त्यांसाठी केलेली ही व्यवस्था म्हणजे एक पर्वणीच होती. ज्या ज्या कार्यकर्त्यांना हा कार्यक्रम सेवेमुळे पाहता आला नव्हता त्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर निरतिशय आनंद दिसत होता व ओठांवर फक्त हेच शब्द होते –  ‘मी अंबज्ञ आहे’. ब्रेकमध्ये केली गेलेली नाश्त्याची सोय व रात्री कार्यक्रम संपण्यास १० वाजणार म्हणून केलेली जेवणाची सोय पाहून हा देव खरंच आपली किती काळजी घेतो हे पाहून प्रत्येकाचे मन अधिकाधिक अंबज्ञ होत होते. कार्यक्रम संपल्यानंतर स्वत: समीरदादा  सर्व कार्यकर्त्यांची विचारपूस करत फिरत होते. कार्यक्रम संपल्यावर खुर्च्या ठेवण्यासाठी व इतर Winding up करण्यासाठी कार्यकर्ते सरसावले असता सीईओंनी सर्वांना अडवले… जणू हे सर्व कार्यकर्ते त्यादिवशी VIP झाले होते पण प्रत्येकाच्या मनात एकच भावना होती – इतुके अनंत प्रेम फक्त त्याचे… 
 
अंबज्ञ,
प्रशांतसिंह तळपदे
प्रशांतसिंह तळपदे यांच्या फेसबुक प्रोफाईलची लिंक:
http://www.facebook.com/prashant.talpade?fref=ts

Related Post

3 Comments


 1. हरी ओम ,

  न्हाऊ तुझिया प्रेमे…. एक अविस्मरणीय असा आनंद सोहळा!! एकी कडे आनंदाचा वर्षाव तर दुसरीकडे त्या सावळ्याच्या प्रेमात न्हाताना अंतर्मुख करणारा. सुरुवातीला ह्या कार्यक्रमाची व्याप्ती लक्षात येत नव्हती पण जेव्हा पुज्य सामिरदादांनी एका मीटिंग मध्ये हा आनंद सत्संग, ही प्रेम यात्रा काय आणि का आहे हे सांगितले तेव्हा जाणीव झाली की हा खूप वेगळ्या पातळीवर जाणारा महासत्संग असणार अहे. तेव्हा पासून वाट बघणे सुरु झाले. हळूहळू व्याप्ती वाढत जात होती. आणि ‘तो’ महादिवस उजाडला.

  रसयात्रा व भाव यात्रा ह्यांच्या clippings मुळे ज्यांना त्यात सहभागी होता आले नव्हते त्यांच्या साठी ती पर्वणीच होती. तसेच जे सहभागी झालेले होते त्यांच्या साठी त्या आठवणीना आणि तेव्हाच्या आपल्या बापुंसाठी असणारे प्रेम आणि भाव याचे सुखद क्षण जिवंत झाले.

  दुपारी सत्संग सुरु झाला आणि पूर्ण वेळ फक्त बापूंचा स्क्रीनवर दिसणारा चेहरा, त्यांचा भाव त्यांचे डोळे, चेहऱ्यावरचे हास्य, मधेच कधीतरी गंभीर. काही वेळेला तर ते अभंगात इतके समरसून जात होते की एकदम still दिसायचे. कळायचेच नाही की live आहे की फोटो दाखवत अहेत. पूर्ण सत्संगात भाव वाढवत जाणारे अभंग व त्यांना मिळणारी आई, बापू, दादांची दाद. आई आणि दादा तर सगळे अभंग म्हणत पण होते. बापुसाठी असणारा त्यांचा भाव आम्हाला खूप खूप काही शिकवत होता. सगळे बापूंचे अभंग सुरु असताना मधेच नंदाई वर रचलेले ‘सांज वेळेच्या रे वाऱ्या’ ह्या अभंगामुळे आम्हा सर्व लेकींना पुन्हा एकदा आत्मबल वर्गात भेटणारी व प्रेमाने आम्हाला न्याहाळणार्या आईची आठवण येत होती.

  हा सत्संग खरच अंतर्मुख करणारा होता. सुरुवातीला बापूंकडे यायला लागलं असताना असणारी ती ओढ, तेव्हाची निरागसता, बापूंकडे संकटातून वाचवण्यासाठी केलेल्या प्रार्थनेतील आर्तता ही आज सुद्धा तशीच आहे का? वाढली कि कमी झाली? हा प्रश्न खरच विचार करायला लावणारा आहे. आज बापू आपल्यासाठी आहेतच हा विश्वास वाढला की त्यांना मी taken for granted घेत आहे हा प्रश्न पडला.

  बापू आपल्या बाळांना नेहमीच bestest देत असतो. प्रत्येकवेळी संस्थेचा कुठला ही कार्यक्रम झाला की वाटते हाच bestest आहे पण next येणारा कार्यक्रम सुद्धा bestest च असतो. हा सत्संग होण्याआधी खूप वेळा वाटायचे की बापुना डोळे भरून बघता यवे. त्यांचे expressions बघायला मिळावेत. आणि ह्या सत्संगाने ही इच्छा सुद्धा पूर्ण केली. पूर्ण केली म्हणण्यापेक्षा अजून वाढवली.

  webcasting मुळे तर सगळ्यांनाच बापू pc वर बघायला मिळाले. नवीन technology चा उचित वापर कसा करायचा हे देखील बापू शिकवतात. नाहीतर नवीन technology चा दुरुपयोग जास्त होताना दिसतो.

  तसेच बाहेरगावाहून आलेले कार्यकर्ते सुद्धा बापूंच्या प्रेमा पोटी इतर भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून कार्यक्रम न बघायला मिळूनसुद्धा त्यांना दिलेल्या सेवेत आनंदी होते. पण बापुना कसे राहवेल आपल्या बाळांचा कार्यक्रम चुकलेला त्यांना कसा चालेल? त्यांनी सर्व कार्यकर्त्यांसाठी पुन्हा संपूर्ण सत्संगाचे स्क्रीनिंग ठेवलं. श्री हरीगुरुग्राम येथे पूर्ण स्टेज भरून LED लावून त्यावर सत्संग दाखवण्यात आला. सर्व कार्यकर्त्यांचे मन आनंदाने भरून गेले. इतकेच नाही तर त्यांच्यासाठी नष्ट व जेवणाची सोय सुद्धा केली होती ती पण विनामूल्य.

  शेवटी हेच खरे – बापू करितो आमची सेवा. ही जाणीव कायम ठेऊन त्याच्या कार्यात सहभागी होऊन आपला खारीचा वाटा उचलून त्याच्या चरणांशी कायम अम्बज्ञ राहावे हीच बापुंचारणी प्रार्थना.


 2. Hari Om,

  It was very enjoyable . The right ambiance for such event. Light drizzle , some times heavy . The sound of rain lashing mingled with the sound of abhangs. Also we were relaxed as no pressure of crowd control or crowd movement etc. I suggest such screening of various events like Avdhoot chintan for volunteers since we can enjoy peacefully.

  Ambadnya


 3. खरच ….बापू करितो आमुची सेवा…..सुंदर अभिप्राय!

Leave a Reply