रुद्रास आवाहन : बापूंनी (अनिरुद्धसिंह) केलेले कविता वाचन (Poem Recited by Aniruddha Bapu-Rudras Avahan)

श्रावण महिन्यातील शिवरात्री पूजनाच्या दिवशी परमपूज्य बापूंनी विचारले की, "कविश्रेष्ठ, श्री. भा. रा. तांबे ह्यांची श्रीरूद्रावरील खूप छान कविता आहे; ती कविता आज मिळाल्यास खूप चांगले होईल. हे ऎकताच सूचितदादांनी बापूंना ही कविता इंटरनेटवरुन डाऊनलोड करुन दिली. त्यानंतर बापूंनी आम्हा सर्वांना ही कविता म्हणून दाखविली व ती मला मोबाईलवर रेकॉर्ड करण्याची संधी मिळाली. We really enjoyed it. It is special for everyone of us.
सर्वांसाठी बापूंनी म्हणलेल्या त्या कवितेची ऑडिओ क्लिप व टेक्स्ट येथे देत आहे. मला खात्री आहे माझ्या सर्व मित्रांना ती नक्कीच आवडेल.
(ऑडिओ क्लिप डाऊनलोड करण्यासाठी वर क्लिक करा)
२) टेक्स्ट
रुद्रास आवाहन
डमडमत डमरु ये, खण्‌खणत शूल ये,
शंख फुंकत ये, येइ रुद्रा ।
प्रलयघनभैरवा, करित कर्कश रवा
क्रूर विक्राळ घे क्रुद्ध मुद्रा ।। ध्रु०।।
कडकडा फोड नभ, उडव उडुमक्षिका,
खडबडवि दिग्गजां, तुडव रविमालिका,
मांड वादळ, उधळ गिरि जशी मृत्तिका
खवळवीं चहुंकडे या समुद्रां ।। १ ।।
पाड सिंहासनें दुष्ट हीं पालथीं,
ओढ हत्तीवरुनि मत्त नृप खालती,
मुकुट रंकास दे करटि भूपाप्रती,
झाड खट्‌खट् तुझें खड्‌ग क्षुद्रां ।। २ ।।
जळ तडागं सडे, बुडबुडे, तडतडे
'शांति ही !' बापुडे बडबडति जन-किडे !
धडधडा फोड तट ! रुद्र, ये चहुंकडे,
धगधगित अग्निमंधि उजळ भद्रा ।। ३ ।।
पूर्विं नरसिंह तूं प्रगटुनी फाडिले
दुष्ट जयिं अन्य गृहिं दरवडे पाडिले,
बनुनि नृप, तापुनी चंड, जन नाडिले
दे जयांचें तयां वीरभद्रा ।। ४ ।।
- कविश्रेष्ठ. श्री.भा. रा. तांबे