अनिरुद्ध प्रेमसागरा – २५ फेब्रुवारी २०१८ – नाशिक
हरि ॐ, २६ मे २०१३ रोजी ’न्हाऊ तुझीया प्रेमे’ हा भव्य सत्संगाचा कार्यक्रम मुंबईत डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये झाला होता. आजही श्रद्धावानांच्या मनात या कार्यक्रमाच्या गोड आणि सुमधुर आठवणी रुंजी घालत आहेत. या कार्यक्रमाच्या वेळेस सद्गुरु श्री अनिरुद्ध म्हणाले होते, “मित्रांनो, चार रसयात्रा झाल्या. शिर्डी, अक्कलकोट, आळंदी आणि मंगेश शांतादुर्गा. त्यानंतर भावयात्रा झाल्या. परंतू सगळ्याच्या बरोबर कायम चालू असते, आणि कायम चालू रहावी तुमच्या प्रत्येकाच्या जीवनात, ती ’आनंदयात्रा’. अवघाची