महाशिवरात्रीचा संपूर्ण दिवस प्रदोष काल मानला जातो (The whole day of Mahashivaratri is considered as Pradosha Kaal)
सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या २७ फ़ेब्रुवारी २०१४च्या मराठी प्रवचनात ‘महाशिवरात्रीचा संपूर्ण दिवस प्रदोष काल मानला जातो’ याबाबत सांगितले. म्हणजेच काय, देवाला सूचना करण्यात उपयोग नसतो, का? कारण तो तुमचं मुळीच ऐकत नाही. जर तुमची श्रद्धा खरी असेल, तर तो तुमचं ऐकत नाही. तो तुमचं मुळीच ऐकत नाही. म्हणून तुमचं भलं होतं. ज्यांची श्रद्धा नसते त्यांना सांगतो कर्मस्वातंत्र्य आहे, घ्या, करा जे पाहिजे ते करा. मी त्याच्यात बदल करणार नाही.